IPL 2022 : आयपीएलचा टीआरपी घसरला, चाहत्यांनीच दिला झटका

आता पर्यंत आयपीएलचे (IPL 2022) सोळा सामने झाले आहेत. 26 मार्चला आयपीएलचा शुभारंभ करण्यात आला. तेव्हापासून आत्तापर्यंत टीआरपीमध्ये (TRP) 33 टक्क्यांनी घसरण झाली आहे. पूर्वी इंडियन प्रीमियर लीगची चाहते आतुरतेने वाट पाहत असायचे. स्टेडियम, टीव्ही, मोबाईल, सगळीकडे मॅच पाहण्याची उत्सुकता असायची.

IPL 2022 : आयपीएलचा टीआरपी घसरला, चाहत्यांनीच दिला झटका
आयपीएलचा टीआरपी घसरलाImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 1:06 PM

मुंबई – आता पर्यंत आयपीएलचे (IPL 2022) सोळा सामने झाले आहेत. 26 मार्चला आयपीएलचा शुभारंभ करण्यात आला. तेव्हापासून आत्तापर्यंत टीआरपीमध्ये (TRP) 33 टक्क्यांनी घसरण झाली आहे. पूर्वी इंडियन प्रीमियर लीगची चाहते आतुरतेने वाट पाहत असायचे. स्टेडियम, टीव्ही, मोबाईल, सगळीकडे मॅच पाहण्याची उत्सुकता असायची. पण आयपीएलच्या 2022 मोसमात आतापर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) मोठा झटका बसला आहे. विशेष म्हणजे हा झटका चाहत्यांनीच दिला आहे. बीसीसीआय लवकरच 2023-27 सीझनपर्यंत आयपीएलचे मीडिया हक्क विकणार आहे. अशा स्थितीत बीसीसीआयसाठी हा मोठा धक्का असू शकतो.

टीव्ही रेटिंग सलग दुसऱ्या वर्षी घसरले

बीएआरसीने 26 मार्च ते 1 एप्रिलपर्यंतची आकडेवारी सादर केली आहे. आयपीएल 2022 च्या मोसमात 8 सामने झाले. आकडेवारीत दिल्याप्रमाणे 8 सामन्यांमध्ये टीव्हीचे रेटिंग 2.52 आहे. मागील हंगामाशी तुलना केल्यास,आयपीएलच्या पहिल्या आठवड्यात टीव्ही रेटिंग 3.75 होते. अशा परिस्थितीत, यावेळी टीव्ही रेटिंगमध्ये 33% घट झाली आहे. यापूर्वी, 2020 सीझनच्या पहिल्या आठवड्यात, टीव्ही रेटिंग 3.85 होते. म्हणजेच सलग दुसऱ्यांदा मानांकनात घसरण झाली आहे.

सीजन टक्केवारी IPL 2021 – 3.85 IPL 2021 – 3.75 IPL 2022 – 2.52

चाहत्यांनी फिरवली आयपीएलकडे पाठ

केवळ टीआरपी नाही, तर चाहत्यांच्या संख्येत सुध्दा मोठी घट झाली आहे. पहिल्या आठवड्यात 14% कमी म्हणजेच 229.06 दशलक्ष चाहत्यांनी सामने पाहिले आहेत. तर गेल्या वर्षी 267.7 दशलक्ष चाहत्यांना आयपीएल सामन्यांना प्रवेश दिला होता. आयपीएल सुरू झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात टूर्नामेंट दाखवणारे चॅनल BARC च्या यादीमध्ये रेटिंगच्या बाबतीत नंबर-1 वर पोहोचते. यंदा मात्र तसं काही घडताना दिसत नाही. स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी वाहिनी सध्या नंबर-3 वर आहे.

दोन षटकार खेचल्याने साई सुदर्शन चर्चेत; जाणून घ्या त्याची कौटुबिंक पार्श्वभूमी

महाराष्ट्र केसरीत गतविजेता नाशिकच्या सदगीरचा धक्कादायक पराभव; एकेरी पटावर पुण्याच्या कोकाटेची बाजी

Video : रनआउट झाल्यानंतर हार्दिक पांड्या रागावला, त्यामुळे डेव्हिड मिलर हैराण

वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.