T20 World Cup Live: आर्यलॅंडने टॉस जिंकला, ऑस्ट्रेलिया करणार प्रथम फलंदाजी; पावसाची शक्यता
ऑस्ट्रेलिया टीममध्ये अनेक दिग्गज खेळाडू आहेत. तर आर्यलॅंड टीम मोठ्या टीमचा पराभव केला आहे.
ब्रिस्बेन – आज आर्यलॅंड (Ireland) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात एक महत्त्वपुर्ण मॅच होणार आहे. दोन्ही टीममध्ये ज्या टीमचा विजय होईल, ती टीम सेमीफायनलमध्ये (Semi Finale) प्रवेश करणार आहे. दोन्ही टीमचे गुण सारखे आहेत. ऑस्ट्रेलियात मॅचवेळी पाऊस पडल्याने दोन्ही टीमकडे 3-3 असे गुण आहेत.
आज सुद्धा पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आर्यलॅंडने टॉस जिंकून देखील ऑस्ट्रेलिया टीमला प्रथम फलंदाजी दिली आहे. आज आर्यलॅंड टीमने घेतलेला निर्णय त्यांना फायद्याचा ठरतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.
ऑस्ट्रेलिया टीममध्ये अनेक दिग्गज खेळाडू आहेत. तर आर्यलॅंड टीम मोठ्या टीमचा पराभव केला आहे. त्यामुळे चाहत्यांचं सगळं लक्ष टीमकडे लागलं आहे.
ऑस्ट्रेलिया टीम
डेविड वार्नर, एरोन फिंच (c), मिशेल मार्श, ग्लेन मैक्सवेल, मार्कस स्टोइनिस, टिम डेविड, मैथ्यू वेड (w), पैट कमिंस, एडम ज़म्पा, मिशेल स्टार्क, जोश हेज़लवुड
आर्यलॅंड टीम
पॉल स्टर्लिंग, एंड्रयू बालबर्नी (c), लोर्कन टकर (w), हैरी टेक्टर, कर्टिस कैंपर, जॉर्ज डॉकरेल, गैरेथ डेलानी, मार्क अडायर, बैरी मैकार्थी, फिओन हैंड, जोशुआ लिटिल