नवऱ्यावर बेछूट आरोप लावणाऱ्या नेटकऱ्यांना इरफानच्या बायकोचं रोखठोक प्रत्युत्तर!
इरफानची बायको सफाने नवऱ्यावर बेछूट आरोप करणाऱ्या नेटकऱ्यांना रोखठोक उत्तर दिलं आहे. (Irfan Pathan Wife Safa Baig Answer Who troll Irfan)
मुंबई : भारताचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणच्या (Irfan pathan) पत्नीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तिचा चेहरा ब्लर असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे नेटकरी इरफानला प्रश्न विचारुन बायकोला सामनतेची वागणूक देण्याविषयी सांगत आहेत. तसंच बायकोला चेहरा लवपण्यामागचं कारण काय, असे सवालही विचारत आहेत. बायकोचा चेहरा लपवल्याप्रकरणी नेटकऱ्यांनी इरफान आरोपींच्या पिंजऱ्यात उभं केलंय. आता इरफानची बायको सफाने (Safa Baig) नवऱ्यावर बेछूट आरोप करणाऱ्या नेटकऱ्यांना रोखठोक उत्तर दिलं आहे. (Irfan Pathan Wife Safa Baig Answer Who troll Irfan)
इरफानच्या बायकोचं नेटकऱ्यांना रोखठोक प्रत्युत्तर
“मी माझा मुलगा इमरान याचं इंस्टाग्राम अकाउंट तयार केलं आहे. जेव्हा तो मोठा होईल तेव्हा तो हे सगळे फोटो पाहिल आणि त्याच्या बालपणीच्या आठवणीत रमेल. याच कारणासाठी मी त्याचं सोशल मीडिया अकाउंट तयार केलंय. हे सोशल मीडिया अकाउंट मीच सांभाळते. त्याच्यावर फोटो पोस्ट करत असते. माझे चेहरा छापलेले फोटो मीच पोस्ट केले आहेl. याचा सर्वस्वी निर्णय माझा होता. इरफानचा यात काहीही संबंध नव्हता”, असं सफा म्हणाली.
मला वाटलं नव्हतं की माझ्या या फोटोंवरुन एवढा मोठा वाद निर्माण होईल. मला सेंटर ऑफ अट्रॅक्शन पसंत नाही, असं रोखठोक उत्तर इरफानची पत्नी सफाने नेटकऱ्यांना दिलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत तिने रोखठोक भाष्य केलं.
नेमकं प्रकरण काय?
इरफान पठाणच्या पत्नीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तिचा चेहरा ब्लर केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या फोटोंवरुन नेटकरी इरफानला प्रश्न विचारतायत. या फोटोवरुन पहिल्यांदा इरफान मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाला. सोशल मीडियावर खास करुन ट्विटटवर अनेक नेटकऱ्यांनी इरफानला या फोटोवर सुनावलं.
मी तिचा पती आहे, मालक नाहीय, इरफानचं नेटकऱ्यांना उत्तर
नंतर याचं उत्तर देणं इरफानला भाग पडलं. हा फोटो माझ्या पत्नीने मुलाच्या अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. या फोटोवरुन आम्हाला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. माझ्या पत्नीने तिच्या मर्जीने स्वत:चा चेहरा ब्लर केला आहे. मी तिचा मालक नाही तर जोडीदार आहे, असं उत्तर इरफानने नेटकऱ्यांना दिलं आहे.
इरफान आणि सफाच्या नात्याविषयी थोडंसं…..
भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण यांने आपली पत्नी सफा बेग हिच्यासोबतचे बरेचसे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये जवळपास ती बुर्ख्यातच दिसून येते. इरफान आणि सफा 2016 साली लग्नाच्या बेडीत अडकले.
इरफानची ओळख सगळ्या जगाला आहे. पण त्याच्या पत्नीविषयी फार कमी लोकांना माहितीय. सफाचे वडील मिर्झा फारूक बेग हे सौदी अरेबियाचे बिझनेसमॅन आहेत. सफा आणि इरफान यांची दुबईमध्ये पहिली भेट झाली. सफाचा जन्म 28 फेब्रुवारी 1994 रोजी झाला. ती सौदी अरेबियाच्या जेद्दामध्ये वाढली आणि इंटनॅशनल इंडियन स्कूलमध्ये तिचं शिक्षण झालं.
27 वर्षांची सफा खूप सुंदर आहे. ती मध्य पूर्व आशियातील एक प्रसिद्ध मॉडेल आहे आणि तिने अनेक नामांकित मासिकांमध्ये तिची छायाचित्रे प्रकाशित केली आहेत. लग्नानंतर सफाने तिचे आयुष्य खाजगी ठेवणे पसंत केले.
हे ही वाचा :
Photo : ‘अरे बाबांनो मी तिचा मालक नाहीय’, इरफान खान बायकोच्या त्या फोटोवरुन ट्रोलर्सवर भडकला