Mohammed Shami and Sania Mirza : सानिया मिर्झा-मोहम्मद शमी एकमेकांना करतायत डेट ? व्हायरल फोटोंनी गदारोळ, पण खरं काय ?
सानिया मिर्झा - मोहम्मद शमी एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दोघांचेही काही फोटो सोशल मीडियावर समोर आल्याने मोठा गदारोळ माजला असून हे खरं आहे का, त्या फोटोंमागचं सत्य काय हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
Mohammed Shami and Sania Mirza : भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमी आणि माजी टेनिसपटू सानिया मिर्झां यांचे फोटो सोशल मीडियावर गेल्या आठवड्याभरापासून फिरत आहेत. ते बरेच व्हायरलही झाले असून ते पाहून अनेक लोक हैराण झाले आहेत. हे फोटो खरे आहेत, ते दोघं एकमेकांना खरंच डेट करतायत का की ते AI ने बनवलेत आहेत, असा सवाल सर्वांच्या मनात असून सत्य काय आहे ते जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. या फोटोंनुसार, ते दोघे एकमेकांच्या क्लोज, जवळचे दिसत आहेत. अशा परिस्थितीत व्हायरल होणाऱ्या या फोटोंमागचं सत्य काय आहे, ते फोटो खरंच खरे आहेत का हे लोकांना सांगणं गरजेचं आहे. या फोटोंचं सत्य काय ते जाणून घेऊया.
खरंच दोघं एकमेकांना डेट करत आहेत का ?
खरंतर, व्हायरल फोटोमध्ये आपण पाहू शकतो की सानिया मिर्झा आणि मोहम्मद शमी हे पूलमध्ये असून ते एकमेकांच्या जवळ उभे आहेत. तर, दुसऱ्या एका फोटोंत सानिया मिर्झा आणि शमी काश्मीरच्या सुंदर खोऱ्यांमध्ये सेल्फी घेताना दिसत आहेत.दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य विलसत आहे, ते पाहून हे फोटो अगदी खरे असल्याचे कोणालाही वाटू शकतं. पण खरं सांगायचं झालं तर हे सगळे फोटो फेक असुन ते AI द्वारे बनवण्यात आले आहेत. म्हणजे तुम्ही त्या दोघांचे आत्तापर्यंत जे जे फोटो पाहिले आहेत ते फेक, खोटे आहेत.
कोणी शेअर केले फोटो ?
सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालेले हे सर्व फोटो फेसबूक युजरने शेअर केले आहेत. मात्र ते फोटो समोर येताच लोकांमध्ये एकच खळबळ माजली. ते फोटो पाहून त्या दोघांचं खरंच काही सुरू आहे, अशी चर्चा लोकांमध्ये सुरू झाली. मात्र याप्रकरणी सानिया किंवा मोहम्मद शमी यांच्यापैकी कोणीच काही बोललं नाहीये, त्यामुळे या सर्व बातम्या म्हणजे केवळ अफवाच असल्याचं स्पष्ट होतं.पण हे फोटो पाहून अनेक लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्सही केल्या आहेत. फोटो खरे की खोटे, हे समजणं खरंच खूप कठीण झाल्याचं, एकाने लिहीलंय. तर हे फोटो नक्कीच फेक आहेत, असं दुसऱ्या युजरने लिहीलंय.
दोघांचाही झालाय डिव्होर्स
सानिया मिर्झाचा घटस्फोट झाला आहे. तिने 2010मध्ये पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक याच्याशी लग्न केलं होतं, मात्र अनेक वर्षांच्या लग्नानंतर ते विभक्त झाले, 14 वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला. मात्र सानियापासून वेगळं होताच शोएबने तिसरं लग्नही केलं. तर मोहम्मद शमीनेही 2018मध्ये त्याच्या पत्नीपासून घटस्फोट घेतला. त्याच्या पत्नीने त्याच्यावर अनेक आरोप लावले होते.
आम्ही कोणालाच Judge करत नाही
मोहम्मद शमीशी नाव जोडलं जात असतानाच आता टेनिसपटू सानियाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती लोकांना जज करण्याबद्दल, त्यांच्याविषयी मत तयार करण्याबद्दल बोलताना दिसत आहे. घटस्फोटानंतर सानिया मिर्झा तिचा सगळा वेळ कुटुंबासोबत घालवत आहे. ती तिचा अर्धा वेळ दुबईमध्ये आणि अर्धा वेळ हैदराबादमध्ये तिच्या पालकांच्या घरी घालवते.
View this post on Instagram
सानिया मिर्झाने तिची बहीण अनम मिर्झाच्या हिच्यासोबत हा व्हिडिओ बनवला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे. हा व्हिडिओ एका इव्हेंटमधला आहे ज्यामध्ये दोन्ही मिर्झा बहिणींनी सोशल मीडियासाठी मजेदार रील बनवलंय. या रीलमध्ये सानिया आणि अनम यांच्यासोबत त्यांची आणखी एक मैत्रीण बसली असून त्यांची मज सुरू आहे. आम्ही कोणालाही जज करत नाही, अशी कॅप्शनही तिने यासोबत लिहीली आहे.