नाशिकची खेळाडू लईभारी ! 19 वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेटचे नेतृत्व करणार

नवनियुक्त महाराष्ट्राची कर्णधार असलेल्या ईश्वरी सावकार ची चॅलेंजर ट्रॉफी साठी महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात देखील निवड झालेली होती.

नाशिकची खेळाडू लईभारी ! 19 वर्षाखालील महाराष्ट्र क्रिकेटचे नेतृत्व करणार
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Sep 28, 2022 | 9:21 PM

नाशिक : राज्यातील क्रिकेटप्रेमींसाठी (Nashik) आनंदाची (Good News) आणि नाशिकच्या (Nashik) शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी एक आनंदाची बातमी आहे. नाशिकमधील ईश्वरी सावकार हिची 19 वर्षांखालील महाराष्ट्र क्रिकेट (Cricket) टीमच्या कॅप्टनपदी (Captain) निवड झाली आहे. याशिवाय नाशिकची अष्टपैलु शाल्मली क्षत्रियची देखील महाराष्ट्र क्रिकेट टिममध्ये निवड झाली आहे. त्यामुळे नाशिकच्या क्रीडा विश्वास आनंदाचे वातावरण असून ईश्वरी आणि शाल्मली वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ, बीसीसीआय आयोजित, राष्ट्रीय पातळीवरील महिला टी-ट्वेंटी सामन्यांच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडून ही निवड झाली आहेत. पुणे येथे याबाबतची घोषणा करण्यात आली असून 01 ते 08 ऑक्टोबर दरम्यान चंदिगड येथे होणार्‍या क्रिकेट स्पर्धेसाठी ही निवड करण्यात आली आहे.

ईश्वरीला हुतात्मा अनंत कान्हेरे मैदाना वरील नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या प्रशिक्षण वर्गात सुरुवातीपासूनच प्रशिक्षक मंगेश शिरसाट यांचे मार्गदर्शन लाभत असते.

नवनियुक्त महाराष्ट्राची कर्णधार असलेल्या ईश्वरी सावकार ची चॅलेंजर ट्रॉफी साठी महाराष्ट्राच्या वरिष्ठ महिला क्रिकेट संघात देखील निवड झालेली होती .

हे सुद्धा वाचा

सुरत येथे झालेल्या राज्यस्तरीय महिला ५० षटकांच्या स्पर्धेत महाराष्ट्र क्रिकेट संघातर्फे सलामीवीर म्हणुन खेळताना ईश्वरी सावकार ने फलंदाजीचे जोरदार प्रदर्शन केले होते .

आंध्र विरूद्ध ८६ तर चंदिगड विरूद्ध धडाकेबाज ७३ धावा केल्या. ह्या कामगिरीच्या जोरावरच ईश्वरी सावकारची चॅलेंजर ट्रॉफी साठी देखील निवड झाली होती.

विजयवाडा येथे झालेल्या सामन्यांत ईश्वरीने दोन नाबाद शतके व दोन अर्धशतकांसह सर्वाधिक ५०९ धावा केल्या.

याशिवाय महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झालेली नाशिक जिल्हा क्रिकेट संघ सदस्य अष्टपैलु शाल्मली क्षत्रिय उदयोन्मुख जलदगती गोलंदाज आणि सलामीवीर आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने वेळोवेळी झालेल्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेत या केलेल्या लक्षणीय कामगिरी केली आहे.

सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला नाशिक येथे पार पडलेल्या १९ वर्षांखालील राज्यस्तरीय स्पर्धेत शाल्मलीने सर्वोच्च ५७ धावसंख्येसह ३ डावात एकूण ८७ धावा केल्या होत्या.

या निवडी बद्दल नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा, सचिव समीर रकटे , पदाधिकारी , सदस्य व प्रशिक्षक यांनी ईश्वरी सावकार व शाल्मली क्षात्रियचे अभिनंदन केले आहे.

हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले..
हत्या प्रकरणातील आरोपींवर MCOCA ; ज्येष्ठ वकील माजिद मेमन म्हणाले...
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी
Santosh Deshmukh Murder : विष्णू चाटेला 2 दिवसांची सीआयडी कोठडी.
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?
Santosh Deshmukh Murder : MCOCA लागल्यानं काय होणार ?.
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?
संतोष देशमुख हत्याकांडात सात जणांवर MCOCA , वाल्मिक कराडचं काय ?.
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.