सिडनी : टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (India Tour Australia) सिडनीमध्ये पोहचली आहे. टीम इंडियाच्या या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात एकदिवसीय मालिकेपासून होणार आहे. या एकदिवसीय मालिकेला 27 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडिया नेट्समध्ये सराव करत आहे. दरम्यान टीम इंडियाविरुद्ध एकदिवसीय मालिकेत खेळण्याबाबत पॅट कमिन्सचा (Pat Cummins) निर्णय झालेला नाही. पॅट ऑगस्ट महिन्यात इंग्लंड दौऱ्यासाठी गेला होता. तेव्हापासून तो 3 महिने सुरक्षित वातावरणात राहिला. या वातावरणात राहिल्याने सुरक्षित असल्याची भावना पॅट कमिन्सने व्यक्त केली. दरम्यान पॅट टीम इंडियाविरुद्ध खेळणार की नाही, याबाबत पॅटचा निर्णय झालेला नाही. It is not yet decided whether to play against India,said Pat Cummins
भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत विश्रांती घेणार का, याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना पॅट म्हणाला की “याबाबत माझा अंतिम निर्णय झालेला नाही. ही अभूतपूर्व वेळ आहे. मालिकेत खेळायचं की नाही, याबाबत आम्ही सर्व एकत्र जमल्यावर निर्णय घेऊ.” “उन्हाळ्यात काही खेळाडूंना विश्रांतीची गरज भासेल. याबाबत मला आश्चर्य वाटणार नाही. कारण ऑस्ट्रेलियाचं पुढील काही महिन्याचं शेड्युल ठरलेलं आहे. टीम ऑस्ट्रेलिया फेब्रुवारी-मार्च दरम्यान दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. तसेच इतरही आगामी दौरे आहेत”. अशी माहिती क्रिकेट डॉट कॉम ने पॅटच्या व्हिडिओ कॉन्फरन्सच्या हवाल्याने दिली आहे.
पॅट ऑगस्ट महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर असताना मॅनचेस्टरमध्ये सुरक्षित वातावरणात होता. यानंतर तो आयपीएल खेळण्यासाठी इंग्लंडहून थेट यूएईला रवाना झाला. दरम्यान आयपीएल संपल्यानंतर पॅट सिडनीमध्ये 14 दिवसांसाठी क्वारंटाईन राहणार आहे. पॅटचा 14 दिवसांचा कालावधी 27 नोव्हेंबरला संपणार आहे. 27 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात एकदिवसीय मालिकेला सुरुवात होत आहे.
“साधारणपणे आयपीएल सामन्यांसाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करावा लागतो. मात्र यावेळेस यूएईमध्ये आयपीएल असल्याने आम्हाला फार प्रवास करावा लागला नाही. त्यामुळे हा मोसम फायदेशीर ठरला, असंही पॅट म्हणाला.
“मी भारतीय खेळाडूंना घाबरवण्याच्या हेतून मैदानात उतरणार नाही. मात्र जर मी त्यांच्यावर प्रभाव पाडण्यास यशस्वी ठरलो, तर ही बाब माझ्यासाठी नक्कीच प्रशंसनीय असेल. खेळपट्टीकडून गोलंदाजांना मदत मिळेल अशी आशा आहे”, असा आशावाद पॅटने व्यक्त केली.
टीम इंडियाविरुद्धच्या एकदिवसीय, टी 20 आणि कसोटी मालिकेसाठी पॅटला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. एडिलेडमध्ये 17 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.
एकदिवसीय (वनडे) मालिका
पहिली वनडे – 27 नोव्हेंबर – सिडनी
दुसरी वनडे – 29 नोव्हेंबर – सिडनी
तिसरी वनडे – 1 डिसेंबर – मानुका ओव्हल
भारतीय एकदिवसीय संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमन गिल, केएल राहुल (उपकर्णधार&विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर.
अशी आहे ऑस्ट्रेलियाची एकदिवसीय आणि टी 20 टीम :
एरॉन फिंच (कर्णधार), सीन एबोट, एश्टन एगर, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, मोइजेस हेनरिक्स, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, डेनियल सॅम्स, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ , मिचेल स्टॉर्क, मार्कस स्टोयनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वार्नर आणि अॅडम झॅम्पा
टी-20 मालिका
पहिली T20 – 4 डिसेंबर – मानुका ओव्हल
दुसरी T20 – 6 डिसेंबर – सिडनी
तिसरी T20 – 8 डिसेंबर – सिडनी
टी-20 सीरिजसाठी टीम इंडिया : विराट कोहली (कर्णधार), शिखर, मयांक अग्रवाल, केएल राहुल (उपकर्णधार&विकेटकीपर), श्रेयस अय्यर, मनीष, हार्दिक पांड्या, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चाहर आणि वरुण चक्रवर्ती
कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड
दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड
तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी
चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन
आस्ट्रेलिया टेस्ट टीम : टीम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स (उप कर्णधार), सीन एबोट, जो बर्न्स, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, ट्रेविस हेड, मार्नस लाबुशेन, नॅथन लियोन, मायकल नासिर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोवस्की, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, मॅथ्यू वेड आणि डेव्हिड वार्नर .
भारतीय कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज
संबंधित बातम्या :
INDIA TOUR AUSTRALIA | टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा
INDIA TOUR AUSTRALIA | टीम इंडियाविरुद्धच्या वनडे आणि टी 20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया टीमची घोषणा
It is not yet decided whether to play against India,said Pat Cummins