टीम इंडियाचा स्टार जसप्रित बुमराचं या अभिनेत्रीसोबत डेटिंग?
बुमराने अजून कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीला फॉलो केलेलं नाही. पण अनुपमाला त्याने पहिल्यांदाच फॉलो केलं आणि त्यांच्या अपेअरची चर्चा सुरु झाली.
मुंबई : क्रिकेटर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री यांचं अफेअर हे चाहत्यांसाठी नवीन नाही. यावेळी आता टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराचं नाव एका अभिनेत्रीसोबत जोडलं जातंय. दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन बुमराला डेट करत असल्याचं बोललं जातंय. बुमराने अजून कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रीला फॉलो केलेलं नाही. पण अनुपमाला त्याने पहिल्यांदाच फॉलो केलं आणि त्यांच्या अपेअरची चर्चा सुरु झाली.
बुमरा कोणत्याही अभिनेत्रीला फॉलो करत नाही, पण अनुपमाला त्याने फॉलो केलं आणि अफेअरची एकच चर्चा सुरु झाली. दोघं एकमेकांना डेट करत असल्याचंही बोललं जातंय. अनुपमाने 2015 मध्ये मल्याळम सिनेमा ‘प्रेमम’मधून पदार्पण केलं होतं. यानंतर 2016 मध्ये तेलगू सिनेमात छाप सोडली. सध्या ती सहाय्यक दिग्दर्शक म्हणून Dulquer Salmaan च्या प्रोडक्शनमध्ये काम करत आहे.
दरम्यान, बुमराचं नाव एखाद्या अभिनेत्रीशी जोडलं जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही बुमरा अभिनेत्री राशी खन्नासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचं बोललं जात होतं. पण बुमरा फक्त एक चांगला खेळाडू आहे, त्यापलिकडे मी त्याला ओळखत नाही, असं राशी म्हणाली आणि या चर्चांना पूर्ण विराम मिळाला.
बुमराने जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलंय. टीम इंडियाचा तो स्टार गोलंदाज आहे. आयपीएलमध्ये दमदार गोलंदाजी केल्यानंतर हेच प्रदर्शन विश्वचषकातही सुरुच आहे. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांमध्ये बुमराने त्याची कामगिरी दाखवून दिली आहे.