…नाहीतर बुमराह पूर्णपणे संपून जाईल, दिग्गजाच्या दाव्याने क्रिकेट विश्वात खळबळ

बुमराह या दुखापतीमुळे आशिया कप आणि टी-20 सारख्या मोठ्या स्पर्धांपासून दूर राहिला याचा मोठा फटका भारतीय संघाला बसत आहे. याच पार्श्वभूमीवर एका दिग्गज खेळाडूने मोठी भीती व्यक्त करत बुमराहच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

...नाहीतर बुमराह पूर्णपणे संपून जाईल, दिग्गजाच्या दाव्याने क्रिकेट विश्वात खळबळ
Follow us
| Updated on: Feb 04, 2023 | 5:06 PM

मुंबई : भारतीय संघाचा स्ट्राईक बॉलर जसप्रीत बुमराह गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याच्यासोबत स्टार अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाही दुखापतीमुळे बाहेर होता. बुमराह या दुखापतीमुळे आशिया कप आणि टी-20 वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धांपासून दूर राहिला याचा मोठा फटका भारतीय संघाला बसला. बुमराहच्या क्वालिटीचा म्हणजे त्याची जागा भरून काढणारा दुसरा कोणी मोठा पर्यायी बॉलर नाही. याचाच धागा पकडत एका दिग्गज खेळाडूने मोठी भीती व्यक्त करत बुमराहच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

जसप्रीत बुमराहने त्याला क्रिकेटचा एक कोणता तरी फॉरमॅट ठरवायला हवा. एकतर कसोटी क्रिकेट नाहीतर मर्यादित षटकांचं क्रिकेट कोणता तरी निर्णय घ्यायला हवा. जर मी आता खेळत असतो तर मला वाटतं की माझ्यासाठी कसोटी क्रिकेट खेळणं हे खूप कठीण गेलं असतं. मात्र आता छोट्या फॉरमॅटमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसे मिळत आहेत. पैशामुळे तुमचं आयुष्य सेट होतं. आम्ही मात्र पैशाचा विचार केला नाही कारण आमच्या काळात पैसाच नव्हता. आता हा मोठा व्यवसाय झाला असून तुमच्या हातात आहे की निर्णय काय घ्यायचा, असं ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज जेफ थॉमसन यांनी म्हटलं आहे.

आता मोठ्या प्रमाणात क्रिकेट खेळलं जात आहे. आम्ही सीझननुसार क्रिकेट खेळायचो. हिवाळ्यासाठी इंग्लंडला जायचो आणि तिथे जवळपास साडे चार महिने क्रिकेट खेळायचो. हा दौरा मोठा असायचा मात्र याचा फायदा असा व्हायचा की आम्ही ख्रिसमसमध्ये आराम करायचो. बुमराहला जास्तकाळ क्रिकेट खेळायचं असेल तर त्याने क्रिकेटमधील एक फॉरमॅट खेळायचा याबाबत निर्णय घ्यायला हवा, असंही जेफ थॉमसन म्हणाले.

दरम्यान, जसप्रीत बुमराह हा सप्टेंबर महिन्यापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. दुखापतीमुळे त्याला मोठ्या स्पर्धांना मुकावं लागलं. पाठीच्या दुखण्यामुळे बुमराह त्रस्त असून श्रीलंकेच्या दौऱ्यामध्ये तो पुनरागमन करणार होता. परत एकदा दुखापतग्रस्त झाल्याने त्याने माघार घेतली होती. बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेच्या पहिल्या दोन कसोटीसाठी तो संघात नसणार आहे मात्र टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला आशा आहे की तो उर्वरित सामन्यांपर्यंत फिट होऊन संघात परतेल.

दरम्यान, जसप्रीत बुमराहने आतापर्यंत 30 कसोटी सामने खेळले आहेत. यामधील 58 डावांमध्ये त्याने 128 विकेट्स घेतल्या आहेत. कसोटीमध्ये 34 हा बुमराहचा सर्वाधिक स्कोर आहे. बुमराह संघातील महत्त्वाचा खेळाडू असून आणखी किती दिवस त्याला दुखापतीमुळे बाहेर बसावं लागणार याबाबत अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडले आहेत.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.