WPL 2023 स्पर्धेदरम्यान जेमिमा रॉड्रिग्सचा बाँड्री लाईनवर डान्स तडका, Video Viral
वुमन्स प्रीमियर लीग 2023 जेमिमा रॉड्रिग्सचा डान्स तडका प्रेक्षकांना पाहायला मिळाला. आता या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
मुंबई : जेमिमा रॉड्रिग्स हे भारतीय महिला क्रिकेटमधील सध्याचं चर्चेत असलेलं नाव आहे. जेमिमानं टी 20 वुमन्स वर्ल्डकपमध्येही चांगली कामगिरी केली होती. आता वुमन्स प्रीमियर लीगमध्ये जेमिमा दिल्ली कॅपिटल्स खेळत आहे. पण मैदानात तिचा कायमच हटके अंदाज पाहायला मिळतो. जेमिमाला फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाव्यतिरिक्त गाणी म्हणणं आणि सोशल मीडियावर रिल्स बनवण्याची आवड आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या सामन्यातही असाच दिलखुलास अंदाज पाहायला मिळाला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर एक चाहत्याने जेमिमाचा डान्स रेकॉर्ड केला आहे. त्यात तिने एक भांगडा नृत्य देखील केलं आहे.
जेमिमाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहून तिच्या बिनधास्त वागण्याचं कौतुक केलं आहे. युजर्स वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिचा हा व्हिडीओ शेअर करत आहेत. अंबिका कुसुम नावाच्या एका क्रिकेट फॅननं तिचे व्हिडीओ ट्विटरवर शेअर केले आहेत.
@JemiRodrigues I have more girl… ?? #WPL2023 #RCBvsDC pic.twitter.com/eEZ7b7aGf1
— Ambika Kusum (@ambika_acharya) March 5, 2023
@JemiRodrigues Here she goes again…? #WPL2023 #RCBvsDC @wplt20 @IPL pic.twitter.com/c9vmxXvJv0
— Ambika Kusum (@ambika_acharya) March 5, 2023
@JemiRodrigues If anyone dint believe me…?? #WPL2023 #RCBvsDC pic.twitter.com/lNeeAZ1ENc
— Ambika Kusum (@ambika_acharya) March 5, 2023
रॉयल चॅलेंजर्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यात जेमिमाने 15 चेंडूत 22 धावांची नाबाद खेळी केली होती. युपी वॉरियर्स विरुद्धही जेमिमाने 22 चेंडूत 34 धावा करत नाबाद राहिली होती. त्यानंतर मुंबई विरुद्धच्या समन्यात 18 चेंडूत 25 धावा केल्या होत्या.
आयपीएलच्या तीन सामन्यापैकी दोन सामन्यात विजय मिळवत दिल्लीचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या सामन्यात मुंबईकडून 8 विकेट्स आणि 30 चेंडू राखून पराभव सहन करावा लागला. त्यामुळे गुणतालिकेत 4 गुणासह +0.965 धावांच्या सरासरीसह दुसऱ्या स्थानी आहे.
दिल्ली कॅपिटल्सचे पुढचे सामने
11 मार्च GG vs DC संध्याकाळी 7:30 वाजता, डीवाय पाटिल स्टेडियम 13 मार्च DC vs RCB संध्याकाळी 7:30 वाजता, डीवाय पाटिल स्टेडियम 16 मार्च DC vs GG संध्याकाळी 7:30 वाजता, ब्रेबॉर्न स्टेडियम 20 मार्च MI vs DC संध्याकाळी 7:30 वाजता, डीवाय पाटिल स्टेडियम 21 मार्च UPW vs DC संध्याकाळी 7:30 वाजता, ब्रेबॉर्न स्टेडियम
अंतिम फेरीपर्यंतचं गणित कसं असेल
अंतिम फेरीपर्यंत पोहोचण्यासाठी पाच संघ भिडणार आहेत. पण 20 सामन्यानंतर तीन संघांचे सारखेच गुण असतील. तर मात्र रनरेटवर गुणांकन केलं जाईल. ज्या संघाचा रनरेट चांगला आहे तो संघ थेट अंतिम फेरीत जाईल. तर उर्वरित दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघ अंतिम फेरीत जाण्यासाठी लढत करेल. अंतिम फेरीचा सामना अनिर्णित ठरला तर सुपर ओव्हर केली जाईल. पण सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित ठरला तर जिंकेपर्यंत सुपर ओव्हर खेळली जाईल.
दिल्ली कॅपिट्ल्स टीम | मेग लॅनिंग (कॅप्टन), जेमिमाह रोड्रिग्स (उपकर्णधार), शेफाली वर्मा, राधा यादव, शिखा पांडे, मारिजॅन कप्प, तीतस साधु, एलिस कॅप्सी, तारा नॉरिस, लॉरा हॅरिस, जसिया अख्तर, मिन्नू मणि, तानिया भाटिया, पूनम यादव, जेस जोनासन, स्नेहा दीप्ती आणि अरुंधति रेड्डी.