IPL 2021 : राजस्थान रॉयल्सला मोठा झटका, प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर

आयपीएल 2021 मध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाची सुरुवात खराब झाली आहे. अशातच संघाला अजून एक वाईट बातमी मिळाली आहे.

IPL 2021 : राजस्थान रॉयल्सला मोठा झटका, प्रमुख गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर
Jofra Archer Rajasthan Royals
Follow us
| Updated on: Apr 23, 2021 | 10:06 PM

मुंबई : आयपीएल 2021 मध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाची सुरुवात खराब झाली आहे. अशातच संघाला अजून एक वाईट बातमी मिळाली आहे. राजस्थानचा स्टार गोलंदाज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) सध्याच्या आयपीएलच्या मोसमातून बाहेर पडला आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) शुक्रवारी याबाबतची माहिती जाहीर केली आहे. (Jofra Archer ruled out of entire IPL 2021, Rajasthan Royals)

गेल्या महिन्यात आर्चर भारत दौर्‍यावर आला होता. इंग्लंडचा संघ यावेळी भारत दौऱ्यावर कसोटी, टी-20 आणि एकदिवसीय मालिका खेळला होता. यावेळी आर्चरने कसोटी आणि टी -20 मालिकेत सहभाग घेतला होता. त्यानंतर, एकदिवसीय मालिका न खेळता तो मायदेशी परतला, कारण जानेवारीत हाताच्या दुखापतीमुळे त्याला शस्त्रक्रिया करावी लागली. 29 मार्च रोजी आर्चरच्या हातावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे तो आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यात सहभागी होऊ शकणार नाही.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, “जोफ्रा आर्चर आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळू शकणार नाही. या आठवड्यात तो गोलंदाजीसाठी मैदानात परतला. ईसीबी आणि ससेक्स मेडिकल टीम त्याच्यावर, त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहे. आर्चरने पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या ट्रेनिंग प्रोग्रामवर लक्ष केंद्रित केलं आहे. कोणत्याही दुखण्याविना त्याने त्याचं ट्रेनिंग आणि तयारी पूर्ण केली तर दोन आठवड्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करण्याची अपेक्षा त्याच्याडून केली जाऊ शकते.

राजस्थानच्या अडचणी वाढल्या

आर्चरची अनुपस्थिती राजस्थानसाठी मोठा धक्का आहे. मागील वर्षी राजस्थानसाठी खेळताना आर्चरने 14 सामन्यांमध्ये 20 बळी घेतले होते. विशेष म्हणजे स्पर्धेत त्याचा इकोनॉमी रेट केवळ 6.55 इतका होता. फलंदाजीतही त्याने योगदान दिलं होतं. त्याने स्पर्धेत 113 धावाही केल्या होत्या. क्रिकबझने जारी केलेल्या अहवालानुसार आर्चर आयपीएलमध्ये परतला तरी त्याला आठ दिवस विलगीकरण कक्षात राहावे लागेल. त्याचा त्याच्या गोलंदाजीवर आणि प्रशिक्षणावर परिणाम झाला असता त्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि आर्चरने एकमेकांच्या सहमतीने हा निर्णय घेतला आहे.

आर्चरच्या कमबॅकबाबतची माहिती येत्या काही दिवसांत ईसीबी स्पष्ट करेल. अशी अपेक्षा आहे की ससेक्सबरोबरच्या सामन्यात तो त्याच्या दुखापतीची स्थिती पारखेल. जर सर्व काही ठीक झाले तर तो मेच्या मध्यात ससेक्सकडून खेळू शकतो.

राजस्थानचा संघर्ष

राजस्थान रॉयल्सची टीम या मोसमातही धडपडताना दिसत आहे. नवीन कर्णधार संजू सॅमसनच्या आगमनानंतरही परिस्थिती बदलली नाही. राजस्थानने आयपीएल -2021 मध्ये आत्तापर्यंत चार सामने खेळले आहेत आणि त्यात त्यांना केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे, तर तीन सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. मात्र आयपीएलच्या सुरुवातीच्या टप्प्यातील संघाची ही परिस्थितीही नंतर बदलू शकते.

इतर बातम्या

VIDEO | मला टॉस जिंकण्याची सवय नाही, त्यामुळे गडबड झाली, टॉसदरम्यान विराट कोहलीचा गोंधळ

IPL 2021 : VIDEO वाईडच्या आशेने बॉल सोडला, चेंडू थेट स्टम्प्समध्ये घुसला

(Jofra Archer ruled out of entire IPL 2021, Rajasthan Royals)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.