फुटबॉलच्या सामन्यान खेळाडूचा हिजाब सुटला आणि…
जॉर्डन येथे महिलांचा फुटबॉल सामना सुरु होता (players huddle around Hijabi footballer). या दरम्यान एका महिला खेळाडूचा हिजाब सुटला. यानंतर जे झालं ते पाहून मैदानात उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवल्या.
अम्मान : जॉर्डन येथे गेल्या आठवड्यात फुटबॉलच्या सामन्यादरम्यान माणुसकीची परिभाषा शिकवणारा एक किस्सा घडला. जॉर्डन येथे महिलांचा फुटबॉल सामना सुरु होता (players huddle around Hijabi footballer). या दरम्यान एका महिला खेळाडूचा हिजाब सुटला. यानंतर जे झालं ते पाहून मैदानात उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवल्या.
जगात ज्या देशांमध्ये शरिया कायदा (sharia law) आहे, तिथे इस्लामच्या मान्यतेनुसार, मुस्लीम महिलांनी डोकं नेहमी झाकून ठेवलं पाहिजे . याचा संबंध त्यांच्या सन्मानाशी असल्याचं सांगितलं जातं. गेल्या आठवड्यात जॉर्डन येथे महिलांचं फुटबॉल चषक सुरु होतं. या दरम्यान, शबाब अल ऑरडन क्लब आणि अरब ऑर्थोडॉक्स क्लब यांच्यामध्ये फुटबॉलचा सामना खेळवला जात होता.
JUST BEAUTIFUL.
Opponents huddle up around a Hijabi footballer in order to protect her from showing her hair. pic.twitter.com/O5aC84AhmN
— Shuaib Ahmed (@Footynions) October 13, 2019
या सामन्यादरम्यान धावत असताना एका महिला खेळाडूचा हिजाब सुटला. त्यानंतर लगेच तिला विरोधी संघातील खेळाडूंनी घेरलं आणि तिने तिचा हिजाब व्यवस्थित केला (players huddle around Hijabi footballer). या मुलींची खिलाडूवृत्ती पाहून मैदानात उपस्थित प्रत्येकजण अवाक झाला. तिथे उपस्थित सर्वांनी या खेळाडूंसांठी टाळ्या वाजवल्या.
या चषक स्पर्धेत जॉर्डन, फिलिस्तीन, लेबनान, बहरीन आणि यूएईच्या संघांनी सहभाग घेतला होता. जॉर्डनच्या शबाब अल ऑरडन क्लबने हे चषक जिंकलं. या संघातील खेळाडूंनी ऑर्थोडॉक्स क्लबविरुद्धच्या सामन्यात जे केलं त्यासाठी आज सर्वत्र त्यांचं कौतुक केलं जात आहे.