IND vs AUS : दुसऱ्या टेस्टपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, भारतीय क्रिकेटपटूंची दाणादाण उडवणारा तो खेळाडू बाहेर

ॲडलेडमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. भेदक गोलंदाजीने पहिल्या कसोटीत भारतीय खेळाडूंची दाणादाण उडवणारा मुख्य गोलंदाज जखमी झाला आहे. त्यामुळे पिंक बॉल कसोटीमध्ये तो खेळू शकणार नाही. कोण आहे हा खेळाडू ?

IND vs AUS : दुसऱ्या टेस्टपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, भारतीय क्रिकेटपटूंची दाणादाण उडवणारा तो खेळाडू बाहेर
दुसऱ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाला धक्का
Follow us
| Updated on: Nov 30, 2024 | 11:17 AM

पर्थ टेस्टमधील पराभवानंतर ऑस्ट्रेलियन संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच आता ॲडलेडमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. टीमचा मुख्य गोलंदाज जॉश हेचलवुड हा जखमी झाला असून त्यामुळे आता तो भारताविरुद्ध पिक बॉल कसोटी सामना खेळू शकणार नाहीय. आता त्याच्या जागी संघात सीन एबॉट आणि ब्रेंडन डॉगेट या दोन नव्या गोलंदाजांचा समावेश करण्यात आला आहे. या दोघांनी आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियन संघासाठी टेस्टमध्ये पदार्पण केलेलं नाही.

पॅट कमिन्सच्या अडचणी वाढल्या

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 6 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या डे-नाईट टेस्टमधून जोश हेझलवूडला वगळल्यामुळे कॅप्टन पॅट कमिन्सच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण पहिल्या सामन्यात हेजलवूड वगळता एकही गोलंदाज प्रभावी नव्हता. हेजलवूड हा पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम गोलंदाज ठरला होता. त्याने पहिल्या डावात 29 धावांत 4 बळी घेतले आणि भारताचा डाव 150 धावांत गुंडाळण्यास मदत केली. तर दुसऱ्या डावात त्याने 21 ओव्हर्स टाकत फक्त 28 धावा दिल्या आणि 1 बळी टिपला.

एवढेच नाही तर हेझलवूड हा तोच गोलंदाज आहे ज्याच्यामुळे भारतीय संघ आपल्या शेवटच्या दौऱ्यात ॲडलेडमधील डे-नाईट कसोटीत अवघ्या 36 धावांत ऑलआऊट झाला होता. यादरम्यान त्याने 5 षटकात केवळ 8 धावा देत 5 बळी घेतले होते. त्याच्या भेदक गोलंदाजीसमोर टीम इंडियाने शरणागती पत्करली. त्यातच ऑस्ट्रेलियाने त्यांचा महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनला दुखापतीमुळे या मालिकेतून आधीच वगळले आहे.

दुसऱ्या टेस्टपूर्वी भारतीय संघाची कसोटी

जॉश हेजलवूडला वगळल्यामुळे टीम इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, ॲडलेडमध्ये होणाऱ्या गुलाबी चेंडूच्या कसोटीपूर्वी त्यांना कॅनबेरामध्ये परीक्षा द्यावी लागणार आहे. वास्तविक, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या प्राईम मिनिस्टर्स इलेव्हन विरुद्ध दोन दिवसांचा दिवस-रात्र सराव सामना खेळणार आहे, जो 30 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात रोहित शर्मा पहिल्यांदाच फलंदाजी करण्यास उतरणार आहे. यशस्वी जयस्वालसह संघातील अनेक खेळाडू प्रथमच अशा स्पर्धेत उतरणार आहेत. या सामन्यातून टीम इंडियाचे फलंदाज आणि गोलंदाज दुसऱ्या कसोटीसाठी किती तयार आहेत हे स्पष्ट होईल.

धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण..
धामोरी गावात भुताची अफवा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पण...
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात
'बूंद से गयी वो हौद से नही आतीं' गुलाबराव पाटलांचा ठाकरेंवर घणाघात.
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर
मुंबईत हवेची गुणवत्ता ढासळली, श्वसनाच्या आजारांनी त्रासले मुंबईकर.
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...