T20 WC: जॉस बटलरने सेलिब्रेशन दरम्यान 2 खेळाडूंना स्टेजवरून खाली उतरवले, व्हिडिओ व्हायरल
पाकिस्तानच्या टीमने 138 धावाचं लक्ष्य इंग्लंडच्या टीमला दिलं होतं.

मुंबई : पाकिस्तान (Pakistan) आणि इंग्लंड (England) यांच्यात काल मेलबर्नच्या मैदानात विश्वचषक स्पर्धेतील (T20 WC) अंतिम मॅच झाली. इंग्लंड टीमच्या गोलंदाजांनी आणि फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे इंग्लंड टीमने विश्वचषक जिंकला, इंग्लंडच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केल्यामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंना मोठे फटके मारता आले नाहीत. तसेच कालच्या मॅचमध्ये जॉस बटलरने अर्धशतकी नाबाद खेळी करुन इंग्लंड टीमला विजय मिळवून दिला. विश्वचषक स्पर्धेत इंग्लंड टीमचा फक्त आर्यलॅंड टीमने पराभव केला आहे.
पाकिस्तानचे खेळाडू अधिक ट्रोल होत आहेत. काल झालेल्या लाजीरवाण्या पराभवामुळे पाकिस्तानच्या खेळाडूंचे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पाकिस्तानच्या गोलंदाजांना आणि फलंदाजांना चांगली खेळी करता आली नाही. त्याचबरोबर चुकीचे निर्णय घेतल्याची चाहत्यांमध्ये चर्चा होती.



England’s captain reminded Adil Rashid to leave and checked to see that he and Moeen Ali had left before they celebrated with champagne. Respect. pic.twitter.com/y30bGRFyHG
— ilmfeed (@IlmFeed) November 13, 2022
पाकिस्तानच्या टीमने 138 धावाचं लक्ष्य इंग्लंडच्या टीमला दिलं होतं. इंग्लंडच्या टीमने ते लक्ष्य 19 ओवरमध्येचं पुर्ण केलं. सॅम कुरेन या इंग्लंडच्या गोलंदाजाने कालच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली. चार ओव्हरमध्ये 12 धावा देऊन, तीन विकेट घेतल्या. ज्यावेळी इंग्लंड टीमचा विजय झाला, त्यावेळी इंग्लंड टीममधील सगळे खेळाडू मैदानात धावत आले आणि जल्लोषाला सुरुवात झाली.
ज्यावेळी जॉस बटलरच्या हातात ट्रॉफी आली, त्यावेळी त्याने दोन खेळाडूंना स्टेजवरुन खाली जाण्यास सांगितले. त्याचं कारण असं होतं की, इंग्लंडच्या टीमला शॅम्पेन उडवत आनंद साजरा करायचा होता. आदिल रशीद आणि मोईन अली ज्यावेळी स्टेजवरुन खाली उतरले का ? हे चेक केल्यानंतर जॉस बटलरने शॅम्पेन उडविण्यास परवानगी दिली. दोन्ही खेळाडूंची काळजी घेतल्यामुळे जगभरातून जॉस बटलरचं कौतुक होतं आहे.