काका पवारांच्या तालमीचा महाराष्ट्र केसरी स्पर्धेवर बहिष्कार
जालना : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुन्हा एक वाद समोर आलाय. जालन्यातील आझाद मैदानावर सुरू असलेल्या कुस्ती स्पर्धेवर गतवेळचा महाराष्ट्र केसरी काका पवार तालीमने बहिष्कार घातलाय. त्यामुळे काका पवार यांनी जालना शहर सोडलं असून ते पुण्याकडे रवाना झाले आहेत. या स्पर्धेत काका पवार तालमीतील कुस्तीपटू पुन्हा खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. शनिवारी दुपारी 12 […]
जालना : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुन्हा एक वाद समोर आलाय. जालन्यातील आझाद मैदानावर सुरू असलेल्या कुस्ती स्पर्धेवर गतवेळचा महाराष्ट्र केसरी काका पवार तालीमने बहिष्कार घातलाय. त्यामुळे काका पवार यांनी जालना शहर सोडलं असून ते पुण्याकडे रवाना झाले आहेत. या स्पर्धेत काका पवार तालमीतील कुस्तीपटू पुन्हा खेळणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.
शनिवारी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान कुस्तीचे सामने सुरु असलेल्या आझाद मैदानावर काका पवार आणि आयोजक यांच्यात चांगलाच वाद पाहायला मिळाला. कुस्तीपटू अभिजित कटके आणि गणेश जगताप यांच्यात कुस्तीचा सामना सुरु असताना पंचाने वेळ होण्याआधीच व्हीसल वाजवल्याने काका पवार आणि आयोजक यांच्यात वाद झाला.
या वादादरम्यान आयोजक डॉ. दयानंद भक्त आणि आत्माराम भक्त यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप काका पवारांनी केला. हा वाद चांगलाच चिघळल्याने काकासाहेब पवार यांनी सर्वच खेळाडूंसह मैदानाबाहेर ठिय्या दिला. या प्रकारानंतर काका पवार यांनी स्पर्धेवर बहिष्कार टाकत शहर सोडलं. त्यामुळे काका पवार तालमीतील खेळाडू या स्पर्धेत खेळणार की नाही हा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, चांगलं नियोजन केलेलं असतानाही कुणी जाणीवपूर्वक या स्पर्धेला गालबोट लावत असेल तर पोलीस कारवाई करण्याचा ईशारा आयोजक आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिलाय.
गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यातील भूगावमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतही पंचांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोप काका पवारांनी केला होता. पुण्याचा पैलवान अभिजित कटके याने साताऱ्याचा पैलवान किरण भगतवर मात केल्यानंतर काका पवारांनी हा आरोप केला होता. पंचांनी किरणच्या कुस्तीला न्याय दिला नसल्याचं तेव्हा ते म्हणाले होते.