Test captain: या कारणामुळे सोडले कसोटी कर्णधारपद, आता या खेळाडूकडे टीमची जबाबदारी
या खेळाडूकडे टीमची जबाबदारी
मुंबई : एखाद्या कर्णधारासाठी (captain) ते पद सोडणं सगळ्यात अवघड असतं, पण ते पद सुद्धा एखाद्या दिवशी सोडावं लागणार असतंच. प्रत्येक कर्णधाराला आपला काळ चांगला जावा असही वाटतं असतं. त्याचबरोबर त्या काळात अनेक मालिका (Series) जिंकण्याचं त्याचं टार्गेट असतं. सध्या न्यूझिलंडचा (NZ) कर्णधार कसोटी क्रिकेटचं (Test Cricket) कर्णधारपद सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे. जेव्हा त्याने कर्णधारपद सोडण्याचं जाहीर केलं, त्यावेळी त्याचा चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
न्यूझिलंड टीमचा कर्णधार केन विल्यमसन याने कसोटीचं कर्णधारपद सोडण्याचं जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे एकदिवसीय आणि टी 20 फॉरमॅटमधील कर्णधारपद त्याच्या राहणार असल्याची माहिती एका वेबसाईटने दिली आहे. केन विल्यमसन याने न्यूझिलंड टीमला विश्वचषक जिंकून दिला आहे.
विल्यमसन हा तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर एकदिवसीय आणि टी 20 कर्णधारपद देखील संभाळणार आहे. न्यूझिलंड टीमचं कसोटीचं कर्णधारपद मिळणं हे माझ्यासाठी अभिमानास्पद होतं असं विल्यमसन याने सांगितलं.
तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार अधिक व्यस्त शेड्यूल आहे, मैदान आणि बाहेरच्या कामाचं ओझं अधिक वाढत जात आहे. त्यामुळे मला कर्णधारपदं सोडण्याची ही योग्यवेळ आहे असं जाहीर केलं आहे. पुढच्यावर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी विल्यमसनला वेळ सुद्धा हवा आहे. टिम साउदी या न्यूझिलंडच्या दिग्गज गोलंदाजाकडे टीमचं कर्णधार पद देण्यात येणार आहे.