विश्वचषकात निवड झालेली असताना दुखापत, केदार जाधव आयपीएलमधून बाहेर
मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवला दुखापतीमुळे पुन्हा एकदा आयपीएलमधून बाहेर व्हावं लागलंय. स्नायू दुखावल्यामुळे त्याला गेल्या मोसमात सर्व सामन्यांतून बाहेर रहावं लागलं होतं. यावेळी आता खांद्याच्या दुखापतीमुळे चिंता वाढली आहे. जाधवची निवड विश्वचषकासाठी निवडलेल्या भारतीय संघातही झालेली आहे. त्यामुळे ही दुखापत चिंतेची बाब बनली आहे. रविवारी चेन्नई सुपरकिंग्जकडून किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळताना […]
मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवला दुखापतीमुळे पुन्हा एकदा आयपीएलमधून बाहेर व्हावं लागलंय. स्नायू दुखावल्यामुळे त्याला गेल्या मोसमात सर्व सामन्यांतून बाहेर रहावं लागलं होतं. यावेळी आता खांद्याच्या दुखापतीमुळे चिंता वाढली आहे. जाधवची निवड विश्वचषकासाठी निवडलेल्या भारतीय संघातही झालेली आहे. त्यामुळे ही दुखापत चिंतेची बाब बनली आहे. रविवारी चेन्नई सुपरकिंग्जकडून किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळताना केदारला दुखापत झाली.
दुखापतीमुळे केदारला बाहेर जावं लागलं होतं, पण ही दुखापत जास्त गंभीर नसल्याचं बोललं जातंय. त्यामुळे त्याच्या विश्वचषकातील सहभागावर अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पुढच्या दोन आठवड्यात त्याची दुखापत ठिक होईल, अशी माहिती आहे. 30 मेपासून विश्वचषकाची सुरुवात होत आहे. तर भारताचा पहिला सामना 5 जून रोजी होणार आहे. चेन्नईकडून केदारला पुढील सामन्यांमध्ये खेळता येणार नाही.
केदार जाधवच्या दुखापतीवर सूत्रांनी सांगितलं, की ही किरकोळ दुखापत असून सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं असतं. खांदा दुखावल्यामुळे ही ग्रेड वन ट्रॉमाची दुखापत आहे. किरकोळ दुखापत असली तरी तिला दुर्लक्ष करुन चालत नाही, पण केदार पुढच्या दोन आठवड्यात फिट होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
विश्वचषक लक्षात घेत केदार जाधवने आता फिट होण्याकडे लक्ष केंद्रित केलंय. त्यामुळेच तो आता प्लेऑफ सामन्यांमध्ये खेळणार नाही. त्याच्यावर उपचार करण्यात आले असून तो लवकरच फिट होणार असल्याचं बोललं जातंय. यापूर्वी दुखापतीमुळे केदार जाधवला अनेक महत्त्वाच्या संधी गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे विश्वचषकापूर्वी त्याची दुखापत नीट होणं भारतीय संघासाठीही महत्त्वाचं आहे.
— Maqbool (@im_maqbool) May 6, 2019