अबुधाबी: आयपीएल (IPL 2020) मध्ये आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाबवर 7 विकेटसने दणदणीत विजय मिळवला. राजस्थानच्या फलंदाजानी 186 धावांचे आव्हान पूर्ण करताना सुरूवातीपासूनच जोरदार फलंदाजी केली. सलामीवीर रॉबिन उथाप्पा, बेन स्टोक्स आणि संजू सॅमसनने राजस्थानच्या विजयाचा पाया रचला. राजस्थानकडून सर्वाधिक 50 धावा बेन स्टोक्सने केल्या. संजू सॅमसनने 48 धावा केल्या तर रॉबिन उथाप्पाने 30 धावा केल्या. राजस्थाननं हा सामना 18 व्या षटकामध्ये जिंकला. (Kings Eleven Punjab vs Rajsthan Royals live update)
राजस्थान रॉयल्सने पंजाबचा पराभव केल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये 12 गुण जमा झाले आहेत. यंदाच्या हंगामातील राजस्थानचा हा 6 विजय होता. आजच्या विजयासह राजस्थान गुणतालिकेत 5 व्या स्थानावर पोहोचला आहे. प्ले ऑफमध्ये जाण्याच्या राजस्थानच्या आशा कायम आहेत. दुसरीकडे पंजाबचा हा 13 सामन्यामधील 7 वा पराभव ठरला. 6 विजयांसह पंजाब चौथ्या स्थानावर कायम आहे. राजस्थानने केलेल्या पराभवामुळे पंजाबची विजयाची मालिका खंडित झाली आहे.
[svt-event title=”राजस्थाननं पंजाबचा विजयी रथ रोखला, 7 विकेटस राखून मिळवला दणदणीत विजय” date=”30/10/2020,11:21PM” class=”svt-cd-green” ]
IPL 2020, KXIPvsRR Update : राजस्थान रॉयल्सचा पंजाबवर 7 विकेटसने दणदणीत विजय
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 30, 2020
किंग्ज इलेव्हन पंजाबनं राजस्थान रॉयल्ससमोर 186 धावांचे आव्हान ठेवले होते. कर्णधार के.एल.राहुल आणि ख्रिस गेल या दोघांनी पजांबचा डाव सावरला. ख्रिस गेलने 99 तर के.एल. राहुलनं 46 धावा केल्या. निकोलस पुरन यानं देखील 22 धावांची खेळी केली. के.एल.राहुलनं यंदाच्या मोसमातील 600 धावा तर आयपीएलमधील 2000 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. ग्लेन मॅक्सवेलच्या आयपीएलमधील 1500 धावा पूर्ण झाल्या आहेत.
[svt-event title=”नाणेफेक जिंकत राजस्थानचा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय” date=”30/10/2020,7:03PM” class=”svt-cd-green” ]
Match 50. Rajasthan Royals win the toss and elect to field https://t.co/gs2aOMtnpb #KXIPvRR #Dream11IPL #IPL2020
— IndianPremierLeague (@IPL) October 30, 2020
किंग्ज इलेव्हन पंजाबने यापूर्वी सलग 5 सामन्यात विजयाची नोंद केल्याने त्यांना प्ले ऑफमध्ये जाण्याची संधी निर्माण झाली आहे. पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यावर विजय मिळवला. के. एल. राहुलच्या नेतृत्वातील पंजाबनं 12 पैकी 6 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. आजचा सामना जिंकून पंजाबचा प्ले ऑफमध्ये स्थान निश्चित करण्याचा प्रयत्न राहील.
स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्सने 12 पैकी 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. बेन स्टोक्सच्या शतकाच्या जोरावर आणि संजू सॅमसनच्या अर्धशतकी खेळीमुळे राजस्थाननं यापूर्वी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 8 गडी राखून पराभव केला होता.
पंजाब आणि राजस्थान यांच्या यापूर्वी झालेल्या सामन्यात राजस्थाननं पंजाबचा पराभव केला होता. पंजाबनं के.एल.राहुलच्या शतकाच्या जोरावर 223/2 धावा केल्या होत्या. राजस्थानच्या संजू सॅमसन आणि राहुल तेवतियाच्या यांच्या खेळीमुळे पंजाबला पराभव स्वीकारावा लागला. के.एल.राहुलच्या नेतृत्वातील पंजाबचा संघ राजस्थानकडून झालेल्या पराभावाची परतफेड करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
केएल राहुल (कर्णधार), हरप्रीत बरार, ईशान पोरेल, मनदीप सिंह, जेम्स नीशाम, तजिंदर सिंह, ख्रिस जॉर्डन, करुण नायर, दीपक हुड्डा, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, ग्लेन मॅक्सवेल, मुजीब उर रहमान, सरफराज खान, शेल्डन कॉट्रेल, मयंक अग्रवाल, मोहम्मद शमी, दर्शन नालकंडे, निकोलस पूरन, ख्रिस गेल, मुरुगन अश्विन, जगदीश सुचित, कृष्णप्पा गौतम, हार्डस विलोजेन आणि सिमरन सिंह.
जॉस बटलर, बेन स्टोक्स, संजू सॅमसन, अंड्रयू टाय, कार्तिक त्यागी, स्टीव स्मिथ (कर्णधार), अंकित राजपूत, श्रेयस गोपाळ, राहुल तेवतिया, जयदेव उनादकट, मयंक मार्कंडेय, महिपाल लोमरुर, ओशेन थॉमस, रियान पराग, यशस्वी जयस्वाल, अनुज रावत, आकाश सिंह, डेव्हिड मिलर, मनन वोहरा, शशांक सिंह, वरुण अॅरोन, टॉम करन, रॉबिन उथप्पा, अनिरुद्ध जोशी आणि जोफ्रा आर्चर.
संबंधित बातम्या :
IPL 2020 : 800 सामने आणि 12 वर्षांच्या इतिहासात न घडलेली गोष्ट यंदा घडली
(Kings Eleven Punjab vs Rajsthan Royals live update)