Video : पाकिस्तानी गोलंदाजाच्या जबरदस्त चेंडूने किवी फलंदाजाच्या बॅटचे तुकडे झाले, पाहा व्हिडिओ
तो व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.
पाकिस्तान (Pakistan) न्यूझिलंड आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यात सुरु असलेल्या मालिकेत पाकिस्तानचा विजय झाला. आशिया चषकात पाकिस्तानच्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली होती, त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत सुद्धा खेळाडूंनी चांगली कामगिरी केली होती. परंतु अंतिम सामन्यात इंग्लंडने (England) बाजी मारली.
काल झालेल्या सामन्यात न्यूझिलंडचा पाकिस्तानने पराभव केल्यामुळे खेळाडूंचे मनोबल नक्कीचं उंचावले असणार. पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझिलंडची टीम 163 धावसंख्या उभारली. त्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यामुळे धावसंख्येचा सहज पाठलाग केला.
Haris Rauf firing bullets today that was Phillips’ favourite bat apparently ? pic.twitter.com/8WPcVEEi1b
— adi✨|| haris rauf cheerleader (@adidoescricket) October 14, 2022
पाकिस्तानच्या रौफने सहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर 143 किमी प्रतितास वेगाने चेंडू फेकला. त्यावेळी फिलिप्स बॅटिंग करीत होता. ज्यावेळी बॉल त्याच्या बॅटला लागला त्यावेळी बॅटचा मोठा भाग तुटला. तो व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे.
विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानची टीम
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), आसिफ अली, हैदर अली, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद आणि उस्मान कादिर.
विश्वचषक स्पर्धेतील टीम इंडियातील खेळाडूंची नावे
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.