IndvsNZ : जुना पांड्या परतला, हवेत सूर मारुन झेल टिपला

IndvsNz 3rd ODI Live माऊंट मौनगुई (न्यूझीलंड) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या वन डे सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दणक्यात सुरुवात केली. न्यूझीलंडच्या सलामीवीरांना अवघ्या 26 धावांत माघारी पाठवलं. त्यामुळे या सामन्यातही भारताने न्यूझीलंडवर सुरुवातीपासूनच दबाव टाकला. भारताने आजच्या सामन्यासाठी विजय शंकरऐवजी हार्दिक पांड्याला  (Hardik Pandya) संधी दिली आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे निलंबनाची कारवाई झालेला हार्दिक पांड्या […]

IndvsNZ : जुना पांड्या परतला, हवेत सूर मारुन झेल टिपला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:34 PM

IndvsNz 3rd ODI Live माऊंट मौनगुई (न्यूझीलंड) : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या वन डे सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दणक्यात सुरुवात केली. न्यूझीलंडच्या सलामीवीरांना अवघ्या 26 धावांत माघारी पाठवलं. त्यामुळे या सामन्यातही भारताने न्यूझीलंडवर सुरुवातीपासूनच दबाव टाकला. भारताने आजच्या सामन्यासाठी विजय शंकरऐवजी हार्दिक पांड्याला  (Hardik Pandya) संधी दिली आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे निलंबनाची कारवाई झालेला हार्दिक पांड्या आज एखाद्या गुणी खेळाडूप्रमाणे मैदानात उतरला.

वाचा: INDvsNZ : मालिका विजयासाठी ‘टीम विराट’ सज्ज

हार्दिक पांड्यामध्ये आज खूपच बदल जाणवला. पांड्याने कोणतीही हुल्लडबाजी, अतिजल्लोष न करता संयतपणे क्षेत्ररक्षण केलं. शिवाय एकाग्रतेने गोलंदाजीही केली. पांड्याने केलेल्या फिल्डींगने हा तोच पांड्या आहे का, जो करण जोहरच्या कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य करताना दिसला होता, असा प्रश्न पडावा. कारण पांड्याने यजुवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनचा हवेत सूर मारुन टिपलेला झेल, एखाद्या सुपरमॅनची आठवण करुन देणार होता. पांड्याने 17 व्या षटकात मिड विकेट परिसरात हवेत सूर मारुन विल्यमसनचा जबरदस्त झेल टिपला. त्यामुळे जुना पांड्या टीममध्ये परतला असं दिसून आलं. विल्यमसनने 48 चेंडूत 28 धावा केल्या.

पांड्याने टिपलेल्या या झेलचं सर्वत्र कौतुक होत आहे. टीम इंडियाचा माजी जबरदस्त फिल्डर मोहम्मद कैफनेही ट्विट करुन पांड्याचं कौतुक केलं.

हार्दिक पांड्या हा कॉफी विथ करणमधील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून निलंबित झाला होता. तर न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन वन डे सामन्यातही त्याचा संघात समावेश केला नव्हता. सध्या हार्दिक पांड्या आणि के एल राहुल या दोघांचं निलंबन मागे घेतलं असलं, तरी चौकशी सुरु आहे. निलंबन मागे घेतल्यानंतर हार्दिक पांड्या दोन दिवसांपूर्वी न्यूझीलंडमध्ये दाखल झाला.

संबंधित बातम्या 

पंड्या आणि केएल राहुलवरील निलंबन मागे  

निर्लज्जपणाचं वक्तव्य भोवलं, हार्दिक पंड्या-केएल राहुल आऊट  

केएल राहुल आणि पंड्याच्या वक्तव्यावर विराट म्हणतो…  

पंड्या म्हणतो, पहिल्यांदा शारीरिक संबंधानंतर घरी सांगितलं की…  

लाज, शरम आणि अपमान, हार्दिक पंड्या घराबाहेर येईना, फोन उचलेना  

BCCI झटका देण्याच्या तयारीत, पंड्या-राहुल वर्ल्डकपमधूनही आऊट? 

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.