KKR vs CSK, IPL 2021 Match 15 Result | पॅट कमिन्स आणि आंद्रे रसेलची झुंजार खेळी, चेन्नईचा 18 धावांनी विजय

| Updated on: Apr 21, 2021 | 11:38 PM

KKR vs CSK 2021 Live Score Marathi | कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने

KKR vs CSK, IPL 2021 Match 15 Result | पॅट कमिन्स आणि आंद्रे रसेलची झुंजार खेळी, चेन्नईचा 18 धावांनी  विजय
KKR vs CSK 2021 Live Score Marathi | कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने

मुंबई : रंगतदार झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) 18 धावांनी मात केली आहे. चेन्नईने कोलकाताला  विजयासाठी 221 धावांचे तगडे आव्हान दिले होते. मात्र कोलकाताला सर्वबाद 202 धावाच करता आल्या.  कोलकाताकडून पॅट कमिन्सने शानदार नाबाद 66 धावा केल्या. तर आंद्रे रसेलने 54 धावांची झंझावाती खेळी केली. तसेच दिनेश कार्तिकने 40 रन्स केल्या. चेन्नईकडून दीपक चहरने सर्वाधिक 4 तर  लुंगी एन्गिडीने 3 विकेट्स घेतल्या. चेन्नईचा हा सलग तिसरा विजय ठरला. तसेच चेन्नईने पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.  (kkr vs csk live score ipl 2021 match kolkata knight riders vs chennai super kings scorecard online wankhede stadium mumbai in marathi)

Key Events

चेन्नईचा सलग तिसरा विजय

चेन्नईने आजच्या सामन्यातील विजयासह आयपीएलच्या यंदाच्या मोसमातील सलग तिसरा विजय मिळवला आहे. या विजयासह चेन्नई सुपरकिंग्सचे गुणतालिकेत पहिलं स्थान पटकावलं आहे. पहिल्या सामन्यात चेन्नईला दिल्ली कॅपिटल्सने धूळ चारली होती. परंतु त्यानंतर चेन्नईने चांगलं कमबॅक करत पंजाब, राजस्थान आणि आज कोलकाता या तीन संघांना पराभूत केलं आहे.

कमिंसची संघर्षपूर्ण खेळी

112 धावांवर आंद्रे रसल (54) बाद झाल्यानंतर संघाला 8.4 षटकात विजयासाठी 109 धावांची गरज होती. तेव्हा मैदानात आलेल्या पॅट कमिंसने सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार केला. कमिंसने 34 चेंडूत नाबाद 66 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 6 षटकारांची आतषबाजी केली. परंतु त्याला संघाला विजयापर्यंत नेण्यात अपयश आलं.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 21 Apr 2021 11:33 PM (IST)

    चेन्नईचा 18 धावांनी विजय

    रंगतदार झालेल्या सामन्यात चेन्नईने बाजी मारली आहे. चेन्नईने कोलकातावर 18 धावांनी विजय मिळवला आहे. चेन्नईने कोलकाताला विजयासाठी 221 धावांचे आव्हान दिले होते. मात्र कोलकाताला सर्वबाद 202 धावाच करता आल्या. या विजयासह चेन्नईचा हा सलग तिसरा विजय ठरला. तसेच चेन्नईने पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

  • 21 Apr 2021 11:17 PM (IST)

    कोलकाताला विजयासाठी 6 चेंडूत 20 धावांची आवश्यकता

    कोलकाताला विजयासाठी 6 चेंडूत 20 धावांची आवश्यकता आहे. तर चेन्नईला विजयासाठी 1 विकेट्स हवी आहे.

  • 21 Apr 2021 11:14 PM (IST)

    कोलकाताला नववा झटका

    कोलकाताला नववा झटका बसला आहे.  वरुण चक्रवर्ती रन आऊट झाला आहे.

  • 21 Apr 2021 11:10 PM (IST)

    कोलकाताला विजयासाठी 2 ओव्हरमध्ये 28 धावांची आवश्यकता

    कोलकाताला विजयासाठी 2 ओव्हरमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे.  सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे.

  • 21 Apr 2021 11:09 PM (IST)

    शार्दुल ठाकूरचे सलग 3 वाईड

    शार्दुल ठाकूरने 18 व्या ओव्हरमध्ये सलग 3 वाईड बोल टाकले आहेत.

  • 21 Apr 2021 11:05 PM (IST)

    पॅट कमिन्सचे अफलातून अर्धशतक

    पॅट कमिन्सने 23 चेंडूत अफलातून अर्धशतक पूर्ण केलं आहे.

  • 21 Apr 2021 11:01 PM (IST)

    कोलकाताला आठवा झटका

    कोलकाताला आठवा झटका बसला आहे.  कमलेश नागरकोटी आऊट झाला आहे.

  • 21 Apr 2021 10:59 PM (IST)

    कोलकाताला विजयासाठी 4 ओव्हरमध्ये 45 धावांची आवश्यकता

    कोलकाताला विजयासाठी 24 चेंडूत 45 धावांची आवश्यकता आहे. कोलकाताने 16 ओव्हरनंतर 7 विकेट्स गमावून 176 धावा केल्या आहेत.

  • 21 Apr 2021 10:57 PM (IST)

    16 व्या ओव्हरमध्ये 30 धावा

    पॅट कमिन्सने सामन्यातील 16 व्या ओव्हरमध्ये सॅम करनच्या गोलंदाजीवर 30 धावा चोपल्या आहेत. पॅटने यामध्ये 4 सिक्स आणि 1 फोर लगावला.

  • 21 Apr 2021 10:54 PM (IST)

    पॅट कमिन्सचे सलग 3 सिक्स

    पॅट कमिन्सने 16 व्या ओव्हरमध्ये सॅम करनच्या गोलंदाजीवर सलग 3 चेंडूत 3 सिक्स लगावले आहेत.

  • 21 Apr 2021 10:52 PM (IST)

    कोलकाताला सातवा झटका

    कोलकाताला सातवा झटका बसला आहे.  दिनेश कार्तिक एलबीडबल्यू आऊट झाला आहे. कार्तिकने 40 धावांची खेळी केली.

  • 21 Apr 2021 10:47 PM (IST)

    कमिन्सचा शानदार सिक्स

    पॅट कमिन्सने 15 व्या ओव्हरमध्ये ड्वेन ब्राव्होच्या गोलंदाजीवर शानदार सिक्स लगावला आहे.

  • 21 Apr 2021 10:37 PM (IST)

    आंद्रे रसेल आऊट

    कोलकाताला सहावा धक्का बसला आहे. आंद्रे रसेल आऊट झाला आहे. रसेलने 22 चेंडूत 3 फोर आणि 6 सिक्ससह 54 धावांची खेळी केली.

  • 21 Apr 2021 10:33 PM (IST)

    आंद्रे रसेलचा झंझावात, 21 चेंडूत धमाकेदार अर्धशतक

    आंद्रे रसेलने सिक्स खेचत 21 चेंडूत धमाकेदार अर्धशतक पूर्ण केलं आहे. यामध्ये रसेलने 3 चौकार आणि 6 सिक्स लगावले.

  • 21 Apr 2021 10:27 PM (IST)

    10 व्या ओव्हरमध्ये 3 सिक्ससह 24 धावा

    कोलकाताने 10 व्या ओव्हरमध्ये 3 सिक्स आणि 1 फोरसह 24 धावा कुटल्या. आंद्र रसेल आणि दिनेश कार्तिक जोरदार फटकेबाजी करत आहेत.

  • 21 Apr 2021 10:21 PM (IST)

    कोलकाताचा 9 ओव्हरनंतर स्कोअर

    कोलकाताने 9 ओव्हरनंतर 5 विकेट्स गमावून 73 धावा केल्या आहेत. दिनेश कार्तिक 17 तर आंद्रे रसेल 25 धावांवर नाबाद खेळत आहे. कोलकाताला विजयासाठी 66 चेंडूत 148 धावांची आवश्यकता आहे.

  • 21 Apr 2021 10:14 PM (IST)

    कोलकाताचा पावर प्लेनंतरचा स्कोअर

    कोलकाताने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरनंतर 5 विकेट्स गमावून 45 धावा केल्या आहेत.

  • 21 Apr 2021 10:11 PM (IST)

    कोलकाताला पाचवा झटका

    कोलकाताने पाचवी विकेट गमावली आहे. राहुल त्रिपाठी 8 धावा करुन आऊट झाला आहे.

  • 21 Apr 2021 10:09 PM (IST)

    कोलकाताला चौथा धक्का

    कोलकाताने चौथी विकेट गमावली आहे. सुनील नारायण 4 धावा करुन माघारी परतला आहे. कोलकाताने 5 व्या ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावले आधी. दीपक चाहरने आधी कर्णधार इयोन मॉर्गन आणि त्यानंतर सुनील नारायणला आऊट केलं.

  • 21 Apr 2021 10:04 PM (IST)

    कोलकाताला तिसरा धक्का

    कोलकाताला तिसरा धक्का बसला आहे. कर्णधार इयोन मॉर्गन 7 धावा करुन तंबूत परतला आहे.

  • 21 Apr 2021 09:51 PM (IST)

    कोलकाताला दुसरा धक्का

    कोलकाताने दुसरी विकेट गमावली आहे. नितीश राणा आऊट झाला आहे.  नितीशने 9 धावा केल्या.

  • 21 Apr 2021 09:40 PM (IST)

    चेन्नईची शानदार सुरुवात, कोलकाताला पहिला धक्का

    चेन्नईची शानदार सुरुवात झाली आहे. दीपक चाहरने सामन्यातील पहिल्या ओव्हरमध्येच कोलकाताला पहिला धक्का दिला आहे. शुबमन गिल कॅच आऊट झाला आहे. गिलला भोपळाही फोडता आला नाही.

  • 21 Apr 2021 09:35 PM (IST)

    कोलकाताच्या बॅटिंगला सुरुवात

    कोलकाताच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे.  शुबमन गिल-नितीश राणा सलामी जोडी मैदानात खेळत आहे. कोलकाताला  विजयासाठी 221 धावांची आवश्यकता आहे.

  • 21 Apr 2021 09:28 PM (IST)

    कोलकाताला विजयासाठी 221 धावांचे आव्हान

    चेन्नईने कोलकाताला विजयासाठी 221 धावांचे मजबूत आव्हान दिले आहे. चेन्नईने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 220 धावा के्लया. चेन्नईकडून फॅफ डु प्लेसीसने सर्वाधिक नाबाद 95 धावांची खेळी केली. तर ऋतुराज गायकवाडने 64 धावांची खेळी केली.

  • 21 Apr 2021 09:15 PM (IST)

    चेन्नईला तिसरा धक्का, महेंद्रसिंह धोनी आऊट

    चेन्नईला तिसरा धक्का बसला आहे.  महेंद्रसिंह धोनी आऊट झाला आहे. धोनीने 17 धावांची खेळी केली.

  • 21 Apr 2021 09:13 PM (IST)

    चेन्नईच्या 200 धावा पूर्ण

    चेन्नईच्या 200 धावा पूर्ण झाल्या आहेत. फॅफ ड्यु प्लेसिसने एक धावा घेतली. यासह चेन्नईने 200 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.

  • 21 Apr 2021 09:12 PM (IST)

    फॅफ डु प्लेसीससचे सलग 3 चौकार

    फॅफ डु प्लेसीसने आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर सामन्यातील 19 व्या ओव्हरमध्ये सलग 3 चौकार लगावले आहेत.

  • 21 Apr 2021 09:09 PM (IST)

    धोनीचा क्लास सिक्स

    महेंद्रसिंह धोनीने सामन्यातील 18 व्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर सिक्स खेचला आहे. यासह चेन्नईचा स्कोअर 186 वर पोहचला आहे.

  • 21 Apr 2021 09:03 PM (IST)

    चेन्नईचा 17 ओव्हरनंतरचा स्कोअर

    चेन्नईने 17 ओव्हरनंतर 2 विकेट्स गमावून 172 धावा केल्या आहेत. कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि फॅफ डु प्लेसिस मैदानात खेळत आहेत.

  • 21 Apr 2021 09:00 PM (IST)

    चेन्नईला दुसरा धक्का

    चेन्नईला दुसरा धक्का बसला आहे. मोईन अली आऊट स्टंपिंग आऊट झाला आहे. मोईन अलीने 25 धावा केल्या.

  • 21 Apr 2021 08:52 PM (IST)

    चेन्नईचा 15 ओव्हरनंतरचा स्कोअर

    चेन्नईने 15 ओव्हरनंतर 1 विकेट्स गमावून 144 धावा केल्या आहेत. फॅफ डु प्लेसीस आणि मोईन अली मैदानात खेळत आहेत.

  • 21 Apr 2021 08:36 PM (IST)

    फॅफ डु प्लेसिसचे अर्धशतक

    फॅफ डु प्लेसिसने अर्धशतक लगावलं आहे. फॅफने 35 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.

  • 21 Apr 2021 08:34 PM (IST)

    चेन्नईला पहिला धक्का

    चेन्नईला पहिला धक्का बसला आहे. शानदार खेळीनंतर ऋतुराज गायकवाड आऊट झाला आहे. गायकवाडने 42 चेंडूत 6 फोर आणि 4 सिक्ससह 64 धावांची खेळी केली.

  • 21 Apr 2021 08:27 PM (IST)

    चेन्नईची शानदार सुरुवात, सलामी शतकी भागीदारी

    ऋतुराज गायकवाड आणि फॅफ डु प्लेसिस या सलामी जोडीने शतकी भागीदारी केली आहे. चेन्नई मजबूत स्थितीत आहे.

  • 21 Apr 2021 08:22 PM (IST)

    ऋतुराज गायकवाडचे शानदार अर्धशतक

    ऋतुराज गायकवाडने शानदार अर्धशतक झळकावलं आहे. ऋतुराजने 33 चेंडूत अर्धशतक लगावलं.

  • 21 Apr 2021 08:17 PM (IST)

    चेन्नईच्या 10 ओव्हरनंतरचा स्कोअर

    चेन्नईच्या 10 ओव्हरनंतर बिनबाद 82 धावा झाल्या आहेत. फॅफ डु प्लेसीस आणि ऋतुराज गायकवाड सलामी जोडी मैदानात खेळत आहेत. चेन्नई मजबूत स्थितीत आहे.

  • 21 Apr 2021 08:06 PM (IST)

    ऋतुराज गायकवडाचा शानदार सिक्स

    ऋतुराज गायकवाडने 8 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर आंद्रे रसेलच्या गोलंदाजीवर सिक्स  लगावला आहे.

  • 21 Apr 2021 08:04 PM (IST)

    चेन्नईचा पावर प्लेमधील स्कोअर

    चेन्नईने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये बिनबाद 54 धावा केल्या आहेत. फॅफ डु प्लेसिस 30 तर ऋतुराज गायकवाड 23 धावांवर नाबाद खेळत आहेत.

  • 21 Apr 2021 07:59 PM (IST)

    चेन्नईच्या सलामी जोडीची अर्धशतकी भागीदारी

    ऋतुराज गायकवाड आणि फॅफ डु प्लेसिस सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली आहे. 

  • 21 Apr 2021 07:46 PM (IST)

    डुप्लेसीचा शानदार सिक्स

    फॅफ डु प्लेसीसने चौथ्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर वरुण चक्रवर्थीच्या गोलंदाजीवर 80 मीटर लांब सिक्स लगावला.

  • 21 Apr 2021 07:40 PM (IST)

    दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 धावा

    चेन्नईने दुसऱ्या ओव्हरमध्ये 15 धावा केल्या आहेत. या ओव्हरमध्ये चेन्नईने 2 फोर आणि 1 सिक्स लगावला आहे. फॅफ डु प्लेसीसने 1 चौकार तर ऋतुराज गायकवाडने 1 सिक्स आणि 1 फोर लगावला.

  • 21 Apr 2021 07:32 PM (IST)

    चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात

    चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे.  ऋतुराज गायकवाड आणि फॅफ डु प्लेसिस सलामी जोडी मैदानात खेळत आहेत. 
     
     
  • 21 Apr 2021 07:21 PM (IST)

    दोन्ही संघात बदल

    कोलकातामध्ये बदल करण्यात आले आहेत. पहिल्या 3 सामान्यात अपयशी ठरलेल्या हरभजन सिंहच्या जागी युवा वेगवान गोलंदाज कमलेशन नागरकोटीला संधी देण्यात आली आहे. तसेच सुनील नारायणचेही संघात पुनरागमन झाले आहे.

    तसेच चेन्नईमध्ये 1 बदल करण्यात आला आहे. अष्टपैलू खेळाडू डवेन ब्राव्होऐवजी लुंगी एन्गिडीलाचा समावेश करण्यात आला आहे.

  • 21 Apr 2021 07:13 PM (IST)

    चेन्नई सुपर किंग्सचे शिलेदार

    एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), फॅफ डु प्लेसीस, ऋतुराज गायकवाड, सुरेश रैना, अंबाती रायुडू, मोईन अली, सॅम करन, रवींद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर आणि लुंगी एनगिडी.

  • 21 Apr 2021 07:13 PM (IST)

    कोलकाता नाईट राइडर्सची प्लेइंग इलेव्हन

    इयॉन मॉर्गन (कर्णधार), शुबमन गिल, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, दिनेश कार्तिक, आंद्रे रसल, सुनील नरेन, कमलेश नागरकोटी, पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती आणि प्रसिद्ध कृष्णा.

  • 21 Apr 2021 07:09 PM (IST)

    कोलकाताने टॉस जिंकला

    कोलकाताने टॉस जिंकला आहे. नाणेफेक जिंकून कर्णधार इयोन मॉर्गनने चेन्नईला फलंदाजीसाठी भाग पाडले आहे.

  • 21 Apr 2021 06:55 PM (IST)

    टॉसचा बॉस कोण?

    अवघ्या काही मिनिटांमध्ये टॉस उडवण्यात येणार आहे. यामुळे टॉस कोण जिंकणार याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

  • 21 Apr 2021 06:53 PM (IST)

    कोलकाता विरुद्ध चेन्नई आमनेसामने

    आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 15 वा सामना कोलकाता विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला अवघ्या काही मिनिटांमध्ये मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सुरुवात  होणार आहे.

Published On - Apr 21,2021 11:33 PM

Follow us
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.