केएल राहुल-अथियाच्या लग्नाची तारीख आली समोर, BCCI अधिकाऱ्याने उघड केले गुपित!
न्यूझिलंड दौऱ्यात त्याला आराम देण्यात आला आहे.
मुंबई : टीम इंडियाचा खेळाडू केएल राहूल (KL Rahul) आणि सुनिल शेट्टी (Suniel Shetty) यांची मुलगी अथिया (Atiya Shetty) मागच्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करीत आहेत. केएल राहूल सोबत अनेक दौऱ्यात अथिया दिसली आहे. विश्वचषक स्पर्धेत केएल राहूलने खराब कामगिरी केल्यानंतर त्याच्यावर चाहत्यांनी जोरदार टीका केली. तसेच न्यूझिलंड दौऱ्यात त्याला आराम देण्यात आला आहे.
काल सुनिल शेट्टी यांनी तुम्हाला लग्नाची तारिख स्थळ याची माहिती लवकरचं समजेल. दोघांच्या सुट्ट्या पाहून लग्नाचं नियोजन सुरु असल्याचं वक्तव्य सुनिल शेट्टी यांनी केलं आहे.
पुढच्यावर्षी श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी टीम इंडियाचा खेळाडू केएल राहूल याने सुट्टी मागितली आहे. घरगुती कारण असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे त्यावेळी तो लग्न करणार असल्याची सगळीकडे चर्चा सुरु झाली आहे. ही माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिल्याचं एका वेबसाईटने म्हटलं आहे.
मागच्या काही दिवसांपासून केएल राहूलचा फॉर्म अधिक चांगला राहिलेला नाही. विश्वचषक स्पर्धेत त्याला चांगली कामगिरी करता आली नाही, म्हणून चाहत्यांनी त्याला चांगलेचं ट्रोल केले होते.
बीसीसीआय सध्या टीम इंडियामध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी देत असून पुढच्या काही दिवसात टीममध्ये मोठा बदल दिसणार आहे.