Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India | केएल राहुल याची हकालपट्टी, टीममधील उपकर्णधारपद किती महत्वाचं? जाणून घ्या

केएल राहुलची उपकर्णधारपदावरून गच्छंती करण्यात आली आहे. तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात उपकर्णधार कोण असेल याबाबतचा निर्णय कर्णधार रोहित शर्माकडे सोपवला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. खरंच उपकर्णधारपद इतकं महत्त्वाचं असतं का ? जाणून घ्या

Team India | केएल राहुल याची हकालपट्टी, टीममधील उपकर्णधारपद किती महत्वाचं? जाणून घ्या
केएल राहुलला उपकर्णधारपदावरून काढल्यानंतर पदाबाबत रंगली चर्चा, नेमकी काय जबाबदारी असते? जाणून घ्याImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 4:47 PM

मुंबई : बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेत भारतानं 2-0 ने आघाडी घेतली आहे. आता तिसरा कसोटी सामना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. असं असताना गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्मात असलेल्या केएल राहुलची चर्चा रंगली आहे. बॅटमधून धावा येत नसताना संघात स्थान मिळाल्याने टीकेचा धनी ठरला आहे. वेंकटेश प्रसादसह माजी खेळाडूंना त्याच्यावर टीका केली आहे. टीकेचा भडीमार सुरु असताना केएल राहुलची उपकर्णधारपदावरून गच्छंती करण्यात आली आहे. तिसऱ्या आणि चौथ्या कसोटी सामन्यात उपकर्णधार कोण असेल याबाबतचा निर्णय बीसीसीआयनं कर्णधार रोहित शर्माकडे सोपवला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पण आता यामुळे उपकर्णधारपद इतकं महत्त्वाचं असतं का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चला जाणून घेऊयात उपकर्णधारपदाचं महत्त्व

उपकर्णधाराची संघातील भूमिका

इतर खेळाप्रमाणे क्रिकेटमध्येही कर्णधार आणि उपकर्णधार असं पद असते. सामन्यात क्षेत्ररक्षण, गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी कोण उतरणार? याबाबतचा निर्णय कर्णधार घेत असतो. इतकंच काय तर डीआरएस घेण्याचा निर्णयही कर्णधारच घेतो. मग उपकर्णधार काय करतो, असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. कर्णधार काही कारणास्तव संघात खेळू शकला नाही, तर कर्णधाराच्या अनुपस्थितीत उपकर्णधार वरील सर्व निर्णय घेतो.

क्रिकेट, इतर खेळ आणि उपकर्णधारपद

बेसबॉल, फुटबॉल आणि बास्केटबॉलच्या तुलनेत क्रिकेट व्यवसायिकदृष्ट्या मागे पडलं होतं. आयपीएल सुरु होईपर्यंत तरी असंच चित्र होतं. तसं पाहिलं तर बेसबॉलमध्ये 1920 पासून दोन कोच ठेवण्यास सुरुवात झाली. तर 1980 च्या दशकात क्रिकेटमध्ये प्रशिक्षक ठेवण्यास सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियन बॉब सिम्पसन हे क्रिकेटमधील पहिले कोच होते. क्रिकेटमध्ये रणनिती, शारीरिक प्रशिक्षण यांची व्यूहरचना तयार करण्याचं काम कोचकडे असतं. पण त्यापूर्वी कर्णधाराकडे प्रशिक्षक, निवडकर्ता आणि व्यवस्थापकाची भूमिका होती. उपकर्णधार हा सहाय्यक प्रशिक्षक, सहाय्यक निवडकर्ता आणि सहाय्यक व्यवस्थापक होता. त्यामुळे खेळाडूंची निवड करण्यास उपकर्णधाराची मोलाची भूमिका होती.

इतकंच काय तर उपकर्णधार शिस्तीचं पालन करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पडायचा. उदाहरणार्थ, खेळाडूंनी रात्री वेळेत येणं. दुसऱ्या दिवशी हँगओव्हर होणार नाही याची काळजी घेणं. तसेच लांबच्या दौऱ्यात सुविधा आहेत की नाही याबाबत तपासणं, या भूमिका उपकर्णधार पार पाडायचा.

उपकर्णधारपद म्हणजे भविष्यातील कॅप्टन!

उपकर्णधारपदाकडे आता क्रिकेटमध्ये दोन अर्थाने पाहिलं जात. एक म्हणजे, असा खेळाडू ज्याला कर्णधारपदात रस नसतो. पण आवश्यकतेनुसार कर्णधाराला मदत करू शकतो.त्यामुळे कर्णधाराला निर्णय घेणं आणखी सोपं होतं. क्रिकेटमध्ये अॅलन बॉर्डर आणि ज्योफ मार्श ही एक अशीच जोडी होती. त्यामुळे त्यामुळे त्यांना मैदानात निर्णय घेणं सोपं होत होतं. दुसरं, म्हणजे उपकर्णधाराकडे भावी कर्णधार म्हणून पाहिलं जातं. उदाहरणार्थ, इंग्लंडचा जोस बटलर आणि इऑन मॉर्गन हे उत्तम उदाहरण आहे. बटलरला व्हाईट बॉल कर्णधार होणार होता. पण या पदावर येण्यापूर्वी त्याने उपकर्णधारपदाची भूमिका बजावली. त्यामुळे त्याच्या गाठिशी चांगला अनुभव आला. स्टिव्ह वॉ-रिकी पॉटिंग, रिकी पॉटिंग-मायकल क्लार्क आणि एमएस धोनी आणि विराट कोहली ही अशी उदाहरणं आहेतं.

काळानुरूप उपकर्णधारपदाचं महत्त्व झालं कमी

क्रिकेटमध्ये व्यवसायिकरण आलं तसं तसं उपकर्णधारपदाचं महत्त्व कमी झालं.प्रत्येक ठिकाणी प्रशिक्षक, विश्लेषक, निवडकर्ते आले, त्यामुळे उपकर्णधारपदाचं महत्त्व आणखी कमी होत गेलं.तसं पाहिलं तर कर्णधाराच्या अनुपस्थितीशिवाय उपकर्णधाराकडे काही करण्यासारखं नसतं. मैदानातही अनेकदा खेळाडू एकत्र येत निर्णय घेतात. यष्टिरक्षक कधी कधी फिल्डिंग सेट करत असतो. त्यामुळे कर्णधाराला काही गंभीर दुखापत झाली तरच उपकर्णधार त्याची भूमिका बजावतो. पण असं असलं तरी क्रिकेटमध्ये उपकर्णधारपदाची परंपरा तशीच सुरु आहे.

'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा.
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात.
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट.
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?.
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण.
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक.
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्.