KL Rahul : बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात केएल राहुलची’हीरोगिरी’, सुनील शेट्टीची मुलगी अथियाला अशी झाली रिअॅक्ट
केएल राहूलच्या खेळीवर सुनील शेट्टीची मुलगी फिदा, सोशल मीडियावर झाली रिअॅक्ट
मेलबर्न : पाकिस्तान (Pakistan), नेदरलॅंड, आफ्रिका टीमच्याविरुद्ध (South Africa) खराब कामगिरी केल्याने टीकेचा धनी ठरलेला केएल राहूलने (KL Rahul) टीकाकारांना काल चोख प्रत्युत्तर दिले. काल बांगलादेशविरुद्धच्या (Bangladesh) मॅचमध्ये त्याने सुरुवातीपासून गोलंदाजांची धुलाई केली. जलद अर्धशतक केले त्यामुळे पुन्हा तो फॉर्ममध्ये आला आहे. विशेष म्हणजे त्याने टाकलेल्या डायरेक्ट थ्रो मुळे बांगलादेशचा पहिला फलंदाज बाद झाला.
कालच्या सामन्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. ठरलेल्या वेळेत पाऊस आला आणि मैदान भिजवून गेला. पावसाच्या आगोदर बांगलादेशची एकही विकेट नव्हती. पण पाऊस गेल्यानंतर जेव्हा मॅच सुरु झाली, तेव्हा डायरेक्ट थ्रो मारुन केएल राहूलने लिटन दासला या महत्त्वाच्या फलंदाजांला बाद केले.
मॅच पाहत असताना सुनील शेट्टीची मुलगी अथिया त्यावेळी तिने काही फोटो काढले आहेत. मॅचची मजा तिने सुद्धा प्रेक्षकांमध्ये बसून घेतली आहे. कालच्या मॅचमध्ये राहूलची चांगली कामगिरी झाल्यानंतर आथियाने तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरती स्टेटस ठेवला आहे. तसेच ती काल मॅच पाहताना सुध्दा अधिक खूष दिसत होती.