T20 World Cup : ऑस्ट्रेलियातील टीम इंडियाचे सराव सामने कधी आणि कुठे पहायचे, जाणून घ्या एका क्लिकवर
पहिला सराव सामना टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आरामात जिंकला.
ऑस्ट्रेलियात (Australia) येत्या रविवारपासून T20 विश्वचषक स्पर्धा (T20 World Cup) सुरु होत आहे. जगभरातील सोळा टीम (Cricket Team) तिथं मागच्या आठदिवसांपुर्वी दाखल झाल्या आहेत. तिथं सगळ्या टीम कसून सराव करीत आहेत. त्याचबरोबर वातावरणाशी जुळवून घेत, खेळाचे डावपेच आखत आहे. त्यामुळे यंदाचा विश्वचषक कोण जिंकेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
पहिला सराव सामना टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आरामात जिंकला. कारण फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. विराट कोहली मागच्या सामन्यात खेळला नव्हता. तो आजच्या सामन्यात खेळण्याची शक्यता अधिक आहे.
आज टीम इंडियाचा अकरा वाजता दुसरा सराव सामना होणार आहे. आजचा सराव सामना वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.
हा सामना कोणत्याही चॅनेलवरती तुम्हाला पाहायला मिळणार नाही.
ऑस्ट्रेलियाच्या एखाद्या युट्यूब चॅनेलवरती हा सामना तुम्हाला पाहायला मिळू शकतो. त्यासाठी तुम्हाला मॅचचं युट्यूब चॅनेल शोधावं लागेल.
टीम इंडियातील खेळाडूंची नावे
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
स्टँडबाय खेळाडू: मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर.