IND Vs SA : सामना कधी, कुठे, कसा पाहायचा जाणून घ्या एका क्लिकवर
उद्याच्या सामन्यात सुद्धा चांगला संघर्ष होण्याची शक्यता आहे. कारण मागच्या सामन्यात केएल राहूल आणि सुर्यकुमार यादव या दोघांनी अधिक चांगली फलंदाजी केली.
उद्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (SA) टीम इंडियाची (Team India) दुसरी मॅच गुवाहाटी (Guwahati) येथे होणार आहे. त्यामुळे चाहत्यांना आत्तापासून सोशल मीडियावर आपले तर्क मांडायला सुरुवात केली आहे. उद्याच्या सामन्यात गोलंदाजी पुन्हा चालणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. कारण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत चांगली गोलंदाजी झाली होती.
उद्याच्या सामन्यात सुद्धा चांगला संघर्ष होण्याची शक्यता आहे. कारण मागच्या सामन्यात केएल राहूल आणि सुर्यकुमार यादव या दोघांनी अधिक चांगली फलंदाजी केली. त्यामुळे टीम इंडियाचा आठ गडी राखूण विजय झाला.
अर्शदीप सिंह, दीपक चाहर, आर अश्विन यांची गोलंदाजी आज पुन्हा चालणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. कारण जसप्रित बुमराहला दुखापत झाल्याने त्याने दौऱ्यातून माघार घेतली.
उद्या दुसरा टी 20 चा सामना गोवाहाटीत होणार आहे. बरसापारा मैदानात हा सामना सायंकाळी साडेसहा वाजता सुरु होईल.