Virat Kohli : विराटने मोडला ख्रिसगेलचा रेकॉर्ड, जाणून घ्या…
विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीने सुरुवातीच्या मॅचमध्ये पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केली.
मेलबर्न : आशिया चषकात (Asia Cup 2022) सर्वात अधिक धावा काढण्याचा विक्रम विराट कोहलीच्या (Virat Kohli) नावावर आहे. तेव्हापासून तो चांगली फलंदाजी करीत आहे. मागच्या तीन वर्षात त्याच्याकडून चांगली कामगिरी झाली नव्हती. त्यामुळे त्याच्या निवृत्तीची चर्चा सोशल मीडियावर (Social Media) टीकाकारांनी सुरु केली होती. पण ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका दौऱ्यात चांगली कामगिरी करुन त्याने टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
विश्वचषक स्पर्धेत विराट कोहलीने सुरुवातीच्या मॅचमध्ये पाकिस्तानविरुद्ध चांगली कामगिरी केली. विशेष म्हणजे ज्यावेळी पाकिस्ताविरुद्ध धावांची गरज होती. त्यावेळी विराटने चांगली कामगिरी केली. आजच्या मॅचमध्ये सुद्धा नेदरलॅंडविरुद्ध विराट कोहलीने 44 चेंडून 62 धावा केल्या.
View this post on Instagram
आजच्या मॅचमध्ये जलदगतीने धावा काढून विराट कोहलीने ख्रिस गेलचा रेकॉर्ड मोडला आहे.
विराट कोहलीने टी-20 विश्वचषकात आतापर्यंतच्या कारर्कीदीमध्ये 989 एवढ्या धावा काढल्या आहेत. विशेष म्हणजे यादरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी 89.90 आणि स्ट्राईक रेट 132.04 असा ठेवला आहे. त्यामुळे विराटने आत्तापर्यंत अनेकांचे रेकॉर्ड तोडले आहेत. आत्ता पर्यंत खेळलेल्या 21 डावांमध्ये विराटने 12 अर्धशतके केली आहेत.