धोनी नाही तर कुलदीपची जादू काही चालेना, आकडेवारीच सगळं सांगते…

जेव्हा धोनी टीममध्ये होता तेव्हा कुलदीप आणि चहलची जोडी सुपरहिट ठरायची. किंबहुना धोनी या जोडीकडून पाहिजे तेव्हा विकेट्स काढून घ्यायचा आता मात्र तसं होताना दिसून येत नाही. | Kuldeep yadav MS Dhoni

धोनी नाही तर कुलदीपची जादू काही चालेना, आकडेवारीच सगळं सांगते...
कुलदीप यादव
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 10:10 AM

पुणे : भारत आणि इंग्लंड (India vsEngland) यांच्यातील दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने 6 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारतीय फिरकी गोलंदाजांनी भरपूर मार खाल्ला. अगदी एवढा मार खाल्ला की 336 धावाही भारतीय गोलंदाजांना वाचवता आल्या नाही. क्रुणाल पांड्या (Krunal pandya) आणि कुलदीप यादवचे (Kuldeep yadav) चेंडू इंग्लिश फलंदाजांनी भराभर सीमारेषेच्या बाहेर फेकले. अशात लोक पुन्हा एकदा कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीची (MS Dhoni) आठवण जागवू लागले आहेत. कारण जेव्हा धोनी टीममध्ये होता तेव्हा कुलदीप आणि चहलची जोडी सुपरहिट ठरायची. किंबहुना धोनी या जोडीकडून पाहिजे तेव्हा विकेट्स काढून घ्यायचा आता मात्र तसं होताना दिसून येत नाही. (Kuldeep yadav And Yuzvendra Chahal bad Performance After MS Dhoni Retirement)

दुसऱ्या वनडेत कुलदीपची पिटाई

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाच्या बोलर्सची खराब बोलिंग भारताच्या पराभवाला जबाबदार ठरली. भारतीय बॅट्समननी धावांचा डोंगर उभा करुन दिलेला असतानाही बोलर्सचा विशाल धावाही वाचवता आल्या नाही. फिरकीपटू कुलदीप यादव आणि क्रुणाल पांड्याने तर अक्षरश: धावांची खिरापत वाटली. कुलदीपने 10 ओव्हर्समध्ये 84 रन्स दिले. त्यालाही 84 धावांच्या मोबदल्यात एकही विकेट्स मिळवता आली नाही. इंग्लंडच्या फलंदाजांनी कुलदीपला जोरदार लक्ष्य केलं. त्याच्या बोलिंगवर एकूण आठ षटकार इंग्लिश फलंदाजांनी लगावले. हे एकदिवसीय सामन्यातील कोणत्याही भारतीय गोलंदाजाला मारलेले सर्वांत जास्त षटकार आहेत.

धोनी नसल्याचा परिणाम दिसला, पाहा आकडेवारी

एमएस धोनी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यापासून कुलदीप आणि चहल यांची आकडेवारी तितकीशी चांगली नाहीय. धोनीसह कुलदीप यादव 47 सामने खेळला. या सामन्यांत त्याने 91 बळी मिळवले. त्याच्या उलट धोनी निवृत्त झाल्यानंतर कुलदीपने 16 सामन्यांत केवळ 14 विकेट घेतल्या आहेत.

चहलच्याही बाबतीत असाच परिणाम जाणवतो आहे. चहलने धोनीबरोबर खेळताना 46 सामन्यांत 81 बळी घेतले. धोनी रिटायर झाल्यापासून चहलने एकूण 8 सामने खेळले आहेत, ज्यात त्याच्या नावावर फक्त 11 विकेट आहेत. म्हणजेच धोनीच्या निवृत्तीनंतर कुलदीप चहलची सुपरहिट जोडी चालेनाशी झाली आहे. संघाला पाहिजे तेव्हा विकेट्स मिळवून देणारे हे फिरकीपटू सध्या शांत आहेत.

मालिका विजयाचं भारताचं लक्ष्य

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या वन डे मालिकेचा तिसरा आणि निर्णायक सामना (India vs England 3rd ODI) आज म्हणजेच रविवारी खेळला जाईल. पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे मैदानावर (MCA Cricket Ground) हा सामना खेळवला जाणार आहे. इंग्लंडने दुसरा एकदिवसीय सामना जिंकत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. ही मालिका जिंकण्यासाठी भारताला तिसरा सामना जिंकावाच लागणार आहे. हा सामना जिंकण्याच्या दृष्टीने भारत मैदानात उतरेल.

(Kuldeep yadav And Yuzvendra Chahal bad Performance After MS Dhoni Retirement)

हे ही वाचा :

हिटमॅन रोहित शर्माने इंग्लंडविरुद्ध टी ट्वेन्टीत केला होता रेकॉर्ड, किवी फलंजादाने महिनाभरही टिकू दिला नाही !

India Vs England 3rd ODI Live Streaming : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तिसरा वन डे सामना, कुठे, कधी, केव्हा सामना?

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.