Neeraj Chopra : नीरज चोप्राने पुन्हा सोनं लुटलं! फिनलँडमध्ये वर्ल्ड चॅम्पियनवर मात करत गोल्ड मेडलवर नाव कोरलं

भारताचा स्टार अॅथलीट नीरज चोप्राने पुन्हा एकदा सोनं लुटलं आहे. ऑलिम्पिकनंतरच्या आपल्या पहिल्या स्पर्धेत त्याने नॅशनल रेकॉर्ड स्थापित केलं. त्यानंतर दुसऱ्या स्पर्धेत त्याने पुन्हा गोल्ड मेडल प्राप्त केलं आहे. फिनलँडमध्ये सुरु असलेल्या कुओर्ताने स्पर्धेत गोल्ड मेडलवर नाव कोरत आपला शानदार फॉर्म कायम राखलाय.

Neeraj Chopra : नीरज चोप्राने पुन्हा सोनं लुटलं! फिनलँडमध्ये वर्ल्ड चॅम्पियनवर मात करत गोल्ड मेडलवर नाव कोरलं
Follow us
| Updated on: Jun 18, 2022 | 11:51 PM

नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमधील गोल्ड मेडलिस्ट आणि भारताचा स्टार अॅथलीट नीरज चोप्राने (Neeraj Chopra) पुन्हा एकदा सोनं लुटलं आहे. ऑलिम्पिकनंतरच्या आपल्या पहिल्या स्पर्धेत त्याने नॅशनल रेकॉर्ड स्थापित केलं. त्यानंतर दुसऱ्या स्पर्धेत त्याने पुन्हा गोल्ड मेडल प्राप्त केलं आहे. फिनलँडमध्ये सुरु असलेल्या कुओर्ताने स्पर्धेत (Kuortane Games 2022) गोल्ड मेडलवर नाव कोरत आपला शानदार फॉर्म कायम राखलाय. त्याने 86.89 मीटर लांब भाला फेकत गोल्ड मेडल (Gold Medal) आपल्या नावे केलं. नीजरच्या फॅन्सची अपेक्षा होती की तो 90 मीटरचा मार्क पार करेल, पण तसं होऊ शकलं नाही. नीरजने मागील आठवड्यात तुर्कुमध्ये 89.30 मीटर पर्यंत भाला फेकत पावो नुरमी स्पर्धेत रजत पदक पटकावलं होतं. तो 90 मीटरपासून केवळ 70 सेंटीमीटरने चुकला होता. तर फिनलँडच्या ऑलिव्हर हेलांडेरने 89.83 मीटरचा थ्रो करत सूवर्ण पदक पटकावलं होतं.

पहिल्याच प्रयत्नात नीरजने जिंकल गोल्ड मेडल

नीरजने आपल्या पहिल्याच प्रयत्नात 86.89 मीटरचा थ्रो केला. त्यानंतर त्याचा पुढचा प्रयत्न फाईल ठरला आणि तिसऱ्या प्रयत्नात तो भाला फेकताना घरसला. त्यानंतर त्याने पुन्हा धोका पक्तरला नाही. यापूर्वी 2012 ऑलिम्पिक टोबॅगोचया केशॉर्न वालकॉटने 86.64 मीटरसह सिल्व्हर मेडल आपल्या नावे केलं. तर विद्यमान विश्व चॅम्पियन एंडरसन पीटर्सने 84.75 मीटरसह ब्रॉन्झ मेडलची कमाई केली. ऑलिम्पिक रजत पदक विजेता चेक गणराज्यचा जाकूब वालेश आणि पाचव्या स्थानावर राहिलेला ज्यूलियन वेबर हे खेळत नाहीत. जर्मनीचा जोहानेस वेटरही या स्पर्धेत सहभागी नाही. नीरज चोप्रा मागील वर्षी 86.79 मीटरचा थ्रो करत तिसऱ्या स्थानावर राहिला होता. नीरज आता 30 जून पासून डायमंड लीगच्या स्टॉकहोम मध्ये सहभागी होईल.

नीरज चोप्राने स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला

नीरज चोप्राने 15 जून रोजी तुर्कू, फिनलँड येथे झालेल्या पावो नूरमी गेम्समध्ये रौप्य पदक जिंकले, त्यादरम्यान त्याने स्वतःचा राष्ट्रीय विक्रमही मोडला आहे. नीरजने येथे 89.30 मीटर अंतरावर भाला फेकला. याआधी नीरज चोप्राच्या नावावर असलेला राष्ट्रीय विक्रम मार्च 2021 मध्ये झाला होता. जेव्हा त्याने 88.07 मीटर अंतरावर भाला फेकला होता. याशिवाय टोकियो ऑलिम्पिक-2020 मध्ये नीरज चोप्राने 87.58 मीटर अंतरावर भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. 24 वर्षीय नीरजला 7 ऑगस्ट 2021 रोजी सुवर्णपदक मिळाले, त्यानंतर तो प्रथमच एका स्पर्धेत भाग घेत होता आणि त्याने थेट राष्ट्रीय विक्रम केला. नीरजने सुमारे 10 महिन्यांची विश्रांती घेतली होती.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.