IPL ला टक्कर देऊ पाहणाऱ्या श्रीलंकेच्या LPL ला मोठा झटका, गेल-मलिंगासह अनेक दिग्गजांचा खेळण्यास नकार

लंका प्रीमियर लीग स्पर्धेला 26 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

IPL ला टक्कर देऊ पाहणाऱ्या श्रीलंकेच्या LPL ला मोठा झटका, गेल-मलिंगासह अनेक दिग्गजांचा खेळण्यास नकार
Follow us
| Updated on: Nov 19, 2020 | 11:31 PM

कोलंबो : वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल (Chris Gayle) लंका प्रीमियर लीगमध्ये (Lanka Premier League) खेळताना दिसणार नाही. गेलने तडकाफडकी एलपीएलमधून माघार घेतली आहे. गेलने वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली असल्याचं सांगितलं जात आहे. गेलसह श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा (Lasitgh Malinga) आणि इंग्लंडचा जलदगती गोलंदाज लियाम प्लंकेट (Liam plunkett) यांनीदेखील स्पर्धेतून माघार घेतली आहे. (Lanka Premier League 2020 : Chris Gayle, Lasitgh Malinga, Liam plunkett pull out)

कँडी टस्कर्स टीम मॅनेजमेंटने फेसबुक पोस्टद्वारे गेल आणि प्लंकेट यांनी स्पर्धेतून माघार घेतली असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, गेल आणि प्लंकेटच्या जागी कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याबाबत अजून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

ख्रिस गेलने आयपीएलच्या 13 व्या मोसमातील 7 सामन्यात 288 धावा केल्या होत्या. गेलने आयपीएलमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व केलं होतं. गेलला आयपीएलचा पहिला टप्पा संपल्यानंतर संघात स्थान देण्यात आलं होतं. गेलने या 7 सामन्यात चांगलीच फटकेबाजी केली होती. त्यामुळे गेल चाहत्यांना आयपीएलनंतर एलपीएलमध्ये गेलची फटकेबाजी पाहायला मिळणार होती. मात्र आता गेलने माघार घेतली आहे.

दरम्यान, श्रीलंकेच्या टी-20 संघाचा कर्णधार लसिथ मलिंगा गॉल ग्लेडिएटर्स संघाचं नेतृत्व करणार होता. परंतु मलिंगानेही या स्पर्धेतून माघार घेतली आहे. मलिंगाने याबाबत सांगितले की, “मी मार्चपासून कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण घेतलेले नाही, तसेच मी मैदानात सरावदेखील केलेला नाही. अशा परिस्थितीत एका मोठ्या स्पर्धेत एखाद्या संघाचं नेतृत्व करणं माझ्यासाठी अवघड आहे”. वैयक्तिक कारणांमुळे मलिंगाने यंदाच्या आयपीएलमधूनही माघार घेतली होती.

मलिंगा म्हणाला की, “या वर्षाच्या सुरुवातीला वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर मी क्रिकेट खेळलेलो नाही. तसेच गेल्या आठ महिन्यांमध्ये मी कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण घेतलेले नाही. आयपीएलपूर्वी तीन आठवडे मी सराव करणार होतो, त्यानंतर आयपीएल स्पर्धा खेळणार होतो. परंतु तसं होऊ शकलं नाही. या सर्व गोष्टींचा माझ्या परफॉर्मन्सवर परिणाण होऊ शकतो”.

गेल, मलिंगा आणि प्लंकेटप्रमाणेच पाकिस्तानचा खेळाडू सरफराज अहमदनेही नुकतीच या स्पर्धेतून माघार घेतली आहे. सरफराज गॉल ग्लोडिएटर्स संघाकडून खेळणार होता. या स्पर्धेत कॅंडी टस्कर्सकडून अनेक अनुभवी खेळाडू खेळणार आहेत. यामध्ये टीम इंडियाचा माजी खेळाडू इरफान पठाण आणि मुनाफ पटलेचा समावेश आहे. तसेच श्रीलंकेच्या कुशल मेडिंस, नुवान प्रदीपचा समावेश आहे.

स्पर्धेला 26 नोव्हेंबरपासून सुरुवात

एलपीएल स्पर्धेला 26 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत जाफना स्टॅलियन्स, दाम्बुला हॉक्स, कॅंडी टस्कर्स, कोलंबो किंग्स आणि गॉल ग्लेडिएटर्स असे एकूण 5 संघ खेळणार आहेत. कोलंबो, कॅंडी, गॉल, दाम्बुला आणि जाफना 5 जिल्ह्यांच्या नावावरुन 5 संघांचे नाव ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना कॅंडी टस्कर्स विरुद्ध कोलंबो किंग्स यांच्यात खेळला जाणार आहे. यामध्ये एकूण 23 साखळी सामने खेळले जाणार आहेत. साखळीनंतर 13 आणि 14 डिसेंबरला 2 सेमीफायनल सामने खेळण्यात येणार आहे. या सेमीफायनलमध्ये जिंकणारे संघ 16 डिसेंबरला अंतिम सामन्यात आमनेसामने भिडतील.

हे सर्व सामने श्रीलंकेतील एकूण 4 आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर पार पडणार आहेत. आर प्रेमदासा आंतराराष्ट्रीय स्टेडियम कोलंबो, रनगिरी दांबूला आंतराराष्ट्रीय स्टेडियम, पल्लेकेल आंतराराष्ट्रीय स्टेडियम आणि सूर्यावेवा महिंदा राजपक्षे क्रिकेट स्टेडियम या 4 मैदानात हे सामने खेळण्यात येणार आहेत.

संबंधित बातम्या

IPL 2020 | आशिष नेहराची आयपीएल 2020 मधील बेस्ट टीम, विराट-धवनला स्थान नाही

आयपीएलच्या धर्तीवर श्रीलंकेत प्रीमिअर लीग, सलमान-सोहेलकडून ‘क्रिकेट’ संघाची खरेदी!

(Lanka Premier League 2020 : Chris Gayle, Lasitgh Malinga, Liam plunkett pull out)

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.