LPL 2020 स्पर्धा अर्ध्यावर सोडून पाकिस्तानात परतलेला शाहिद आफ्रिदी म्हणतो ‘मी पुन्हा येईन’
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी लंका प्रीमियर लीग स्पर्धा अर्ध्यावर सोडून पाकिस्तानात परतला आहे.
मुंबई : पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) लंका प्रीमियर लीग (Lanka Premier League) स्पर्धा अर्ध्यावर सोडून मायदेशी परतला आहे. लंका प्रीमियर लीगमध्ये तो गॉल ग्लॅडिएटर्स (Galle Gladiators) संघाचा कर्णधार आहे. एलपीएलमध्ये आतापर्यंत तो केवळ तीन सामने खेळला आहे. बुधवारी आफ्रिदीने एक ट्विट करत आपण मायदेशी परतल्याचे सांगितले. (Galle Gladiators captain Shahid Afridi return home due to personal emergency)
LPL मधील पहिल्याच सामन्यात तूफानी खेळी करणाऱ्या आफ्रिदीच्या गैरहजेरीमुळे संघाचं नुकसान होणार आहे. गॉल ग्लॅडिएटर्स संघाने एलपीएलच्या यंदाच्या हंगामात एकही सामना जिंकलेला नाही. आफ्रिदीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या या संघाला एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यातच आता कर्णधार स्पर्धेतून माघारी फिरल्याने संघाच्या अडचणी वाढल्या आहेत.
पाकिस्तानच्या या माजी खेळाडूने बुधवारी एक ट्विट केलं, त्यामध्ये त्याने म्हटलं आहे की, “दुर्दैवाने काही वैयक्तिक कारणांमुळे मला घरी परत यावे लागले आहे. येथील परिस्थिती सुरळीत झाल्यावर मी पुन्हा एलपीएलमध्ये माझ्या संघात सामील होण्यासाठी परत येईन.”
आफ्रिदीचे एलपीएलमध्ये पुनरागमन झाल्यास पुन्हा श्रीलंकेत त्याला तीन दिवस क्वारन्टाईन राहावे लागेल. असं म्हटलं जातंय की, त्याला 3 दिवसांपेक्षा जास्त काळ क्वारन्टाईन ठेवले जाणार नाही, कारण त्याला यापूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला आहे. श्रीलंकेत दाखल होण्यापूर्वी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती, तेव्हा त्याच्या शरीरात कोरोनाच्या अॅन्टीबॉडीज आढळल्या होत्या.
ख्रिस गेल-मलिंगासह अनेक दिग्गजांचा एलपीएलमध्ये खेळण्यास नकार
एलपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने (Chris लंका प्रीमियर लीगमधून (Lanka Premier League) माघार घेतली आहे. त्याने वैयक्तिक कारणं देत स्पर्धेतून काढता पाय घेता आहे. गेलसह श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगा (Lasitgh Malinga) आणि इंग्लंडचा जलदगती गोलंदाज लियाम प्लंकेट (Liam plunkett) यांनीदेखील स्पर्धेतून माघार घेतली आहे.
ख्रिस गेलने आयपीएलच्या 13 व्या मोसमातील 7 सामन्यात 288 धावा केल्या होत्या. गेलने आयपीएलमध्ये पंजाबचे प्रतिनिधित्व केलं होतं. गेलला आयपीएलचा पहिला टप्पा संपल्यानंतर संघात स्थान देण्यात आलं होतं. गेलने या 7 सामन्यात चांगलीच फटकेबाजी केली होती. त्यामुळे गेल चाहत्यांना आयपीएलनंतर एलपीएलमध्ये गेलची फटकेबाजी पाहायला मिळणार होती. मात्र आता गेलने स्पर्धेतून माघार घेतली आहे.
दरम्यान, श्रीलंकेच्या टी-20 संघाचा कर्णधार लसिथ मलिंगा गॉल ग्लेडिएटर्स संघाचं नेतृत्व करणार होता. परंतु मलिंगानेही या स्पर्धेतून माघार घेतली. मलिंगाने याबाबत सांगितले की, “मी मार्चपासून कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण घेतलेले नाही, तसेच मी मैदानात सरावदेखील केलेला नाही. अशा परिस्थितीत एका मोठ्या स्पर्धेत एखाद्या संघाचं नेतृत्व करणं माझ्यासाठी अवघड आहे”. वैयक्तिक कारणांमुळे मलिंगाने यंदाच्या आयपीएलमधूनही माघार घेतली होती. मलिंगाने स्पर्धेतून काढता पाय घेतल्यानंतर गॉल ग्लेडिएटर्स संघाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी शाहिद आफ्रिदीवर सोपवण्यात आली होती.
16 डिसेंबरला अंतिम थरार
एलपीएल स्पर्धेला 26 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत जाफना स्टॅलियन्स, दाम्बुला हॉक्स, कॅंडी टस्कर्स, कोलंबो किंग्स आणि गॉल ग्लेडिएटर्स असे एकूण 5 संघ खेळणार आहेत. कोलंबो, कॅंडी, गॉल, दाम्बुला आणि जाफना 5 जिल्ह्यांच्या नावावरुन 5 संघांची नावं ठेवण्यात आली आहेत.या स्पर्धेत एकूण 23 साखळी सामने खेळवले जाणार आहेत. साखळीनंतर 13 आणि 14 डिसेंबरला 2 सेमीफायनल सामने खेलवले जातील. या सेमीफायनलमध्ये जिंकणारे संघ 16 डिसेंबरला अंतिम सामन्यात आमनेसामने भिडतील.
हे सर्व सामने श्रीलंकेतील एकूण 4 आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरु आहेत. आर प्रेमदासा आंतराराष्ट्रीय स्टेडियम कोलंबो, रनगिरी दांबूला आंतराराष्ट्रीय स्टेडियम, पल्लेकेल आंतराराष्ट्रीय स्टेडियम आणि सूर्यावेवा महिंदा राजपक्षे क्रिकेट स्टेडियम या 4 मैदानात हे सामने खेळवले जात आहेत.
इतर बातम्या
Rohit Sharma | एकही सामना न खेळता हिटमॅन रोहित शर्माचा विक्रम
India vs Australia 2020, 3rd ODI | वेगवान विराट, विश्वविक्रमाला गवसणी, सचिनचा विक्रम मोडित
(Lanka Premier League 2020 : Galle Gladiators captain Shahid Afridi return home due to personal emergency)