यॉर्कर किंग लसिथ मलिंगाचा शेवटचा सामना ठरला!

श्रीलंकेचा अनुभवी गोलंदाज आणि यॉर्करचा बादशाह लसिथ मलिगांने (Lasith Malinga retire)  एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

यॉर्कर किंग लसिथ मलिंगाचा शेवटचा सामना ठरला!
Follow us
| Updated on: Jul 23, 2019 | 11:07 AM

Lasith Malinga retire कोलंबो : श्रीलंकेचा अनुभवी गोलंदाज आणि यॉर्करचा बादशाह लसिथ मलिगांने (Lasith Malinga retire)  एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. बांगलादेशविरुद्ध पहिला वन डे सामना खेळून मलिंगा (Lasith Malinga) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला गुडबाय करणार आहे. श्रीलंका आणि बांगलादेश (Sri Lanka vs Bangladesh) यांच्यात तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला 26 जुलैपासून सुरुवात होत आहे.  मलिंगाने 2011 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

श्रीलंकेच्या घरच्या मैदानात होणाऱ्या या मालिकेसाठी 22 सदस्यीय संघाची घोषणा केली होती. त्यामध्ये मलिंगाचंही नाव आहे.

मलिंगाच्या निवृत्तीबाबत श्रीलंकेचा कर्णधार करुणारत्ने म्हणाला, “माजी कर्णधार आणि अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा बांगलादेशविरुद्ध आपला शेवटचा वन डे सामना खेळणार आहे. त्यानंतर तो वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे. मलिंगाने निवड समितीला नेमकं काय सांगितलं हे माहित नाही, पण त्याने मला बांगलादेशविरुद्ध शेवटचा वन डे असल्याचं कळवलं”

लसिथ मलिंगाने 225 वन डेमध्ये 335 विकेट्स घेतल्या आहेत. श्रीलंकेकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांमध्ये मुथय्या मुरलीधरन 534 आणि चमिंडा वास 400 यांच्यानंतर मलिंगाचा नंबर लागतो.

मलिंगाने 2011 मध्येच कसोटीतून निवृत्ती घेतली होती. 2010 मध्ये भारताविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. मलिंगाने 30 कसोटी सामन्यात 101 विकेट्स घेतल्या आहेत. तर 73 टी 20 सामन्यात त्याच्या नावावर 97 विकेट्स आहेत.

संबंधित बातम्या 

ICC World Cup 2019 : मुंबई इंडियन्सकडून एकत्र खेळले, आता बुमराहबद्दल मलिंगा म्हणतो….  

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.