विराट कर्णधार, मग धोनीने सर्वांना आर्मी कॅप का वाटल्या?

रांची: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वन डे सामना आज धोनीच्या झारखंडमधील रांची इथं होत आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आजच्या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय संघ आज आर्मी कॅप घालून मैदानात उतरली. पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून कॅप्टन कोहली ब्रिगेड आर्मी कॅपसह मैदानात उतरली. रांचीच्या मैदानात माजी कर्णधार महेंद्रसिंह […]

विराट कर्णधार, मग धोनीने सर्वांना आर्मी कॅप का वाटल्या?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

रांची: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वन डे सामना आज धोनीच्या झारखंडमधील रांची इथं होत आहे. या सामन्यात भारताने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आजच्या सामन्याचं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय संघ आज आर्मी कॅप घालून मैदानात उतरली. पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून कॅप्टन कोहली ब्रिगेड आर्मी कॅपसह मैदानात उतरली. रांचीच्या मैदानात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने सर्व खेळाडूंना कॅप वाटल्या.

कोहली कर्णधार, मग धोनीने कॅप का वाटल्या? या सामन्यापूर्वी भारताच्या सर्व खेळाडूंना धोनीने आर्मी कॅप वाटल्या. भारताचा कर्णधार विराट कोहली असतानाही, धोनीने कॅप दिल्या. त्याचं कारण म्हणजे टीम इंडियाचा माजी कर्णधार धोनीला भारतीय सैन्यदलाने लेफ्टनंट कर्नल ही मानद पद दिलं आहे. नोव्हेंबर 2011 मध्ये धोनी टीम इंडियाचा कॅप्टन होता. त्याआधी भारताने 28 वर्षांनी वन डे विश्वचषक जिंकल्यामुळे भारतीय सैन्याने धोनीचा मानद लेफ्टनंट कर्नल पदाने गौरव केला. त्यावेळी धोनीसोबत सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रालाही आर्मीने लेफ्टनंट कर्नल पद दिलं होतं.

म्हणूनच लेफ्टनंट कर्नल असलेल्या धोनीने भारतीय संघातील खेळाडूंना आर्मी कॅप वाटल्या.

विराट कोहलीचं देशवासियांना आवाहन टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला आजच्या सामना दरम्यान आर्मी कॅप घालण्याचं औचित्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी विराट म्हणाला, “ही एक विशेष कॅप आहे. पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी ही कॅप घालण्यात आली आहे. सर्व खेळाडूंनी या सामन्याची मॅच फी डिफेन्स फंड अर्थात संरक्षण निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाचा कर्णधार म्हणून माझं देशवासियांना आवाहन आहे की तुम्हाला शक्य होईल तितकी मदत संरक्षण निधीला समर्पित करा. जेणेकरुन हल्ल्यात शहीद होणाऱ्या जवानांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासह कुटुंबाला आधार मिळेल”

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.