पालघर विभागातून केळवा फुटबॉल क्लबची कमाल, विभागवार फेरीत मारली धडक
पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने एफसी बायर्न पालघर जिल्यातील 8 शाळा व क्लब सहभागी झाले होते. ह्या स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविण्यात आल्या.
पालघर : महाराष्ट्र सरकार आणि जर्मनीतील एफसी बायर्न म्युनिक क्लब यांनी संयुक्तपणे महाराष्ट्र फुटबॉल स्पर्धेचं आयोजन केलं आहे. जिल्ह्याजिल्ह्यात या स्पर्धेचं मोठ्या धुमधडक्यात आयोजन करण्यात आलं आहे. 14 वर्ष वयोगटाखालील खेळाडूंसाठी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेतून 20 सर्वोत्तम खेळाडूंना जर्मनीत एफसी बायर्न क्लबकडून प्रशिक्षण दिलं जाणार आहे. पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने एफसी बायर्न पालघर जिल्यातील 8 शाळा व क्लब सहभागी झाले होते. ह्या स्पर्धा साखळी पद्धतीने खेळविण्यात आल्या. या स्पर्धेतील विजयी संघ हा विभागीय स्पर्धेत पालघर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल. अंतिम सामन्यात तारापूर विद्यामंदिर आणि केळवा फुटबॉल क्लब यांच्यात चुरशीचा सामना झाला. त्यात केळवा फुटबॉल संघाने तारापूर विद्यामंदिर संघाचा 1-0 असा पराभव करत अंतिम सामना जिंकला. यात अमन तांडेल याने अंतिम गोल करून केळवा संघाला विजयी केले.
महाराष्ट्र फुटबॉल कप पालघर जिल्हा
- येशुआ एफसी (2) विरुद्ध इंटर इंडिया फुटबॉल अकादमी (0)
- टीव्हीएम (0) विरुद्ध केळवा फुटबॉल असोशिएशन (1)
- येशुआ एफसी (0) विरुद्ध केळवा फुटबॉल असोसिएशन (3)
- केसी फुटबॉल क्लब (2) विरुद्ध आयआयएफए (0)
- आयआयएफए (0) विरुद्ध टीव्हीएम (5)
- येशुआ एफसी (0) विरुद्ध टीव्हीएम (4)
- केसी एफसी (0) विरुद्ध टीव्हीएम (1)
- केसी एफसी (0) विरुद्ध केळवा एफसी (2)
- आयआयएफए (0) विरुद्ध केळवा फुटबॉल (3)
- केसी फुटबॉल क्लब (3) विरुद्ध येशुआ (0)
यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने,तालुका क्रीडा अधिकारी प्रकाश वाघ,श्री. पळसुळे, श्री. मितेश पटेल (पालघर जिल्हा फुटबॉल असो )पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यात फुटबॉल खेळाच्या विकास आणि प्रसारासाठी क्लब बायर्न म्युनिक यांच्यासोबत क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने करारनामा झाला आहे. यामुळे राज्यात फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढीला लागेल. तसेच फुटबॉल खेळातील तांत्रिक प्रशिक्षण,क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी चालना मिळणार आहे.