Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KIYG 2021 : 9 सुवर्ण पदकांसह महाराष्ट्र आघाडीवर, हरियाणा 6 सुवर्ण पदकांसह दुसऱ्या क्रमांकावर

महाराष्ट्राच्या काजोल सरगर (महिला 40 किलो) हिने एकूण 113 किलो वजन उचलून खेळातील तिचे पहिले पदक जिंकले. तिची राज्य सहकारी हर्षदा गरुड हिने महिलांच्या 45 किलो गटात युवा राष्ट्रीय विक्रम पुन्हा करून दाखवला. हर्षदा गरुडला उत्तर प्रदेशच्या अंजली पटेलने कडवे आव्हान दिले.

KIYG 2021 : 9 सुवर्ण पदकांसह महाराष्ट्र आघाडीवर, हरियाणा 6 सुवर्ण पदकांसह दुसऱ्या क्रमांकावर
9 सुवर्ण पदकांसह महाराष्ट्र आघाडीवरImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 8:40 AM

हरियाना : खेलो इंडिया युथ खेळात 2021 (Khelo India Games 2021) काल वर्चास्वाची लढाई पाहायला मिळाली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राने (Maharashtra) रविवारी नऊ सुवर्ण पदकांसह लढाईला सुरुवात केली आहे. मात्र, यजमान असलेल्या हरियाणाने (hariyana) शर्यतीत पुनरागमन करत एकूण 6 सुवर्ण पदकांसह दुसरे स्थान पटकावले. त्यांनी आगोदर 23 (5 सुवर्ण, 6 रौप्य, 12 कांस्य) सर्वाधिक पदके मिळवली आहेत, तर महाराष्ट्राने 17 (9 सुवर्ण, 4 रौप्य, 4 कांस्य) पटकावले आहेत. वेटलिफ्टिंगमध्ये दोन नवीन युवा राष्ट्रीय विक्रमही एका दिवसात अ‍ॅक्शन आणि थरारक ट्विस्टने भरलेलेल पाहायला मिळाले. रविवारी झालेल्या खेळाचा आनंद क्रिकेट शौकीनांनी घेतला.

महाराष्ट्र हरियाणामध्ये चुरस

महाराष्ट्राने वेटलिफ्टिंगमध्‍ये 4 पैकी 3 सुवर्ण, योगामध्‍ये 3 आणि सायकलिंगमध्‍ये 1 सुवर्णपदक जिंकले आहे. तर हरियाणाने कुस्‍तीच्‍या मॅटमध्‍ये वर्चस्व कायम ठेवत पाचही सुवर्णपदके मिळवली आणि सायकलिंगमध्‍ये 1 सुवर्णपदक मिळवले. मणिपूर गुणांच्या टेबलमध्ये तिसर्‍या क्रमांकावर पोहोचला आहे, थांग-ता मध्ये 4 सुवर्ण पदकांसह, एक देशी खेळ प्रथमच खेलो इंडिया कार्यक्रमात सहभागी करण्यात आला आहे.

गरुडाने दुसऱ्या प्रयत्नात 83 किलो वजन उचलून रेकॉर्ड बुकमध्ये आपलं नाव कोरलं

महाराष्ट्राच्या काजोल सरगर (महिला 40 किलो) हिने एकूण 113 किलो वजन उचलून खेळातील तिचे पहिले पदक जिंकले. तिची राज्य सहकारी हर्षदा गरुड हिने महिलांच्या 45 किलो गटात युवा राष्ट्रीय विक्रम पुन्हा करून दाखवला. हर्षदा गरुडला उत्तर प्रदेशच्या अंजली पटेलने कडवे आव्हान दिले. दोघींनी क्लीन अँड जर्कमध्ये 80 किलो वजन उचलले. हे सर्व त्यांच्या तिसऱ्या आणि शेवटच्या फेरीमध्ये होते. गरुडाने दुसऱ्या प्रयत्नात 83 किलो वजन उचलून रेकॉर्ड बुकमध्ये आपलं नाव कोरलं. तर अंजली तिसऱ्या प्रयत्नातही अपयशी ठरली

एल धनुषने मुलांच्या 49 किलो वजनी गटात नवीन रेकॉर्ड केला

त्यापूर्वी, तामिळनाडूच्या एल धनुषने मुलांच्या 49 किलो वजनी गटात नवीन रेकॉर्डसह आणि एकूण 190 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. वृंदा यादवने मुलींच्या 7.5 किलो स्क्रॅचच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकल्याने हरियाणाने दिल्लीतील सायकलिंग वेलोड्रोम येथे पदक मोहिमेला सुरुवात केली. यजमानांना कुस्ती मॅटवर सुवर्णपदक जिंकण्याची आशा होती. पण रोनित शर्माने निराश केले नाही कारण त्याने बॉईज ग्रीको-रोमन 51 किलो गटात राज्याचा संघ सहकारी राहुलला हरवून आपले खाते उघडले. फ्री स्टाईल 92 किलोमध्ये साहिल जगलानने पंजाबच्या रॉबिनप्रीत सिंगवर 10-0 असा विजय मिळवला.

मुलींच्या 57 किलो वजनी गटात ज्योतीने तांत्रिक श्रेष्ठतेने महाराष्ट्राच्या प्रगती गायकवाडचा पराभव करून क्लीन स्वीप पूर्ण केला.

मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्..
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्...