कुस्तीपटू विनेशने काँग्रेस पक्षात प्रवेश घेताच महावीर फोगाट भडकले, म्हणाले…

कुस्ती आणि त्याच्या भोवती गेल्या काही वर्षांपासून राजकारण फिरताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय कुस्तीचा आखाडा रंगला होता. आता कुस्तीपटू विनेश फोगाटने एक पाऊल पुढे टाकत थेट काँग्रेसचा हात हाती धरला आहे. मात्र तिच्या या निर्णयामुळे महावीर सिंह फोगाट यांना धक्का बसला आहे. तिच्या निर्णयामुळे त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

कुस्तीपटू विनेशने काँग्रेस पक्षात प्रवेश घेताच महावीर फोगाट भडकले, म्हणाले...
Follow us
| Updated on: Sep 09, 2024 | 4:20 PM

कुस्ती, ऑलिम्पिक आणि विनेश फोगाट असं समीकरण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होतं. त्यात आता आणखी एक अध्याय जोडला गेला आहे. कारण कुस्तीपटू विनेश फोगाट थेट राजकारणाच्या रिंगणात उतरली आहे. काँग्रेस पक्षात एन्ट्री घेत तिने हरियाणा विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. विनेश फोगाट हरियाणाच्या जुलाना विधानसभेसाठी निवडणूक लढवणार आहे. यासाठी विनेशने बक्ता खेडा गावातून प्रचारला सुरुवातही केली आहे. विनेशच्या रोड शोला हजारोंची गर्दी होत असल्याचं दिसत आहे. काँग्रेस पक्षात प्रवेश घेताच विनेश फोगाटने सांगितलं की, ‘भाजपा बृजभूषण शरण सिंह याच्या पाठीशी होती, तर काँग्रेसने कुस्तीपटूंना साथ दिली होती.’ पण तिच्या या निर्णयाने तिचे काका आणि कुस्तीचे गुरू महावीर सिंह फोगाट नाराज झाला आहेत. विनेशने राजकारणात उतरण्याचा निर्णय त्यांना आवडलेला नाही. या संदर्भात त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. महावीर फोगाट यांनी स्पष्टच सांगितलं की, मी विनेशच्या राजकीय प्रवासाच्या विरोधात आहे. मला वाटते की तिने आणखी एक ऑलिम्पिक खेळायला हवं होतं.

महावीर फोगाट यांनी सांगितलं की, ‘मी तिला कुस्ती सुरु ठेवण्याचं आणि चार वर्षानंतर पुन्हा ऑलिम्पिक लक्ष्य ठेवून तयारी करायला सांगितली होती. पण राजकारणात सहभागी होण्याचा निर्णय तिचा स्वत:चा आहे. करिअरच्या प्रवासात राजकारणात सहभागी होणं मला रूचलेलं नाही.’ विनेशचा प्रचार करणार का? या प्रश्नावर महावीर फोगाट यांनी सांगितलं की, मी राजकारणात सहभागी नाही आणि विनेशचा प्रचारही करणार नाही.’ तसेच काँग्रेस विरोधी असल्याचं त्यांनी सांगितलं. जर विनेशला राजकारणात यायचंच होतं तर काँग्रेसऐवजी भाजपाचा हात धरायला हवा होता, असंही ते पुढे म्हणाले. महावीर फोगाट यांची छोटी मुलगी बबीता फोगाट आधीच भाजपाची सदस्य आहे. तिने दादरी विधानसभा जागेसाठी निवडणूक लढवली होती. पण त्यात तिचा पराभव झाला होता.

विनेश फोगाटने काँग्रेस पक्षात प्रवेश घेताच सांगितलं की, ‘मी देशातील लोकांचं आणि मीडियाचे आभार मानते. माझ्या कुस्तीच्या प्रवासात मला साथ दिली. मी काँग्रेस पक्षाचे आभार व्यक्त करते. कठीण प्रसंग तुम्हाला बरंच काही शिकवतो. तुमच्यासोबत कोण आहे? जेव्हा आम्हाला रस्त्यावर खेचत ताणत नेलं तेव्हा भाजपा सोडून इतर सर्व पक्षांना साथ दिली. आता नवीन सुरुवात करत आहे. खेळाडूंच्या वाटेला अशी वेळ येऊ नये हे मला वाटतं. आम्ही या प्रसंगातून गेलो आहोत. आम्ही आधीच सांगितलं आहे की आम्ही घाबरणार नाही आणि मागेही जाणार नाही. आमची कोर्टात केस सुरु आहे आणि आम्ही तीही जिंकणार.’

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.