Happy Birthday Dhoni : 38 वर्षीय धोनीविषयी 38 गोष्टी

कल्पक नेतृत्व, तडाखेबाज फलंदाजी आणि वेगवान यष्टीरक्षण या तिन्ही गोष्टींचे मिलन असलेला खेळाडू म्हणजे महेंद्रसिंह धोनी...टीम इंडियाचा विजय होवो अथवा पराभव धोनी हा कायम शांत असतो, म्हणूनच त्याला कॅप्टन कूल या नावाने विशेष ओळखलं जातं.

Happy Birthday Dhoni : 38 वर्षीय धोनीविषयी 38 गोष्टी
credit : ICC twitter
Follow us
| Updated on: Jul 07, 2019 | 12:12 PM

मुंबई : कल्पक नेतृत्व, तडाखेबाज फलंदाजी आणि वेगवान यष्टीरक्षण या तिन्ही गोष्टींचे मिलन असलेला खेळाडू म्हणजे महेंद्रसिंह धोनी…टीम इंडियाचा विजय होवो अथवा पराभव धोनी हा कायम शांत असतो, म्हणूनच त्याला कॅप्टन कूल या नावाने विशेष ओळखलं जातं. 2007 मधील टी 20 विश्वचषक, 2011 मधील वन डे विश्वचषक आणि त्यानंतर चॅम्पियन ट्रॉफीचे विजेतेपद हे सर्व विश्वकप धोनीच्या काळात टीम इंडियाला मिळाले आहे. अशा या कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा आज 38 वा वाढदिवस. त्याच्या वाढदिवसानिमित्त चला जाणून त्याच्याबद्दलच्या 38 रंजक गोष्टी…

  • झारखंडमधील रांची शहरात 7 जुलै 1981 रोजी महेंद्रसिंह धोनीचा जन्म झाला.
  • धोनीचे कुटुंब मूळचे उत्तराखंड अल्मोरा गावातील आहे. मात्र त्याच्या जन्मापूर्वी त्याचे वडील नोकरीनिमित्त रांचीला स्थायिक झाले.
  • रांचीच्या DAV जवाहार विद्या मंदिर या शाळेत त्याचे शिक्षण पूर्ण झाले. मात्र लहानपणापासून धोनीचा अभ्यासापेक्षा खेळण्यातच जास्त रस होता. त्याची आई, बहिण आणि मित्र त्याला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. मात्र त्याचे वडील त्याच्या खेळण्याच्या विरोधात होते.
  • क्रिकेटला आपले सर्वस्व बनवण्यापूर्वी धोनीला फुटबॉल आणि बॅटमिंटन खेळात जास्त रस होता. विशेष म्हणजे त्याने क्लब आणि जिल्हा पातळीवर फुटबॉल आणि बॅटमिंटनच्या स्पर्धा खेळल्या आहेत.

  • शाळेत असताना धोनीने जिल्हास्तरीय फुटबॉल सामन्यात उत्कृष्ट गोलकीपर म्हणून कामगिरी केली आहे.  त्याचे हीच कामगिरी त्याचे प्रशिक्षक केशव बॅनर्जी यांनी योग्य पद्धतीने हेरली आणि त्याला क्रिकेटच्या संघात सहभागी करुन यष्टीरक्षण करण्यास सांगितले.
  • क्रिकेटमध्ये प्रचंड मेहनत करणारा धोनीने 2000 ते 2003 पर्यंत खारगपूर रेल्वे स्टेशनवर तिकीट तपासनीस (T.C) म्हणून नोकरी केली.
  • 2004 मध्ये देवधर ट्रॉफी जिंकणाऱ्या इस्ट झोन संघाने धोनीला संघात घेण्यास मनाई केली होती. धोनी हा अपारंपारिक शैलीत खेळत असल्याचे त्या संघाने सांगितले होते.
  • सेंट्रल कोल फिल्ड्स लिमिटेड यांच्याकडून शिशमहल टुर्नामेंट खेळताना धोनीला एका षटकारामागे प्रशिक्षक धवल सहाय्य हे प्रत्येकी 50 रुपये द्यायचे.

  • धोनीने 1999-2000 या काळात रणजी ट्रॉफीपासून क्रिकेट विश्वात पदार्पण केले. त्यावेळी धोनी बिहारच्या टीमकडून आसामविरुद्ध खेळला होता. त्यावेळी पहिल्या सामन्यात त्याने नाबाद 68 धावा केल्या होत्या. तर पाच सामन्यात त्याने 283 धावा केल्या होत्या.
  • धोनी हा क्रिकेटसोबतच लहानपणांपासून बाईक शौकीनही आहे. जुन्या बाईकपासून नवीन लेटेस्ट मॉडेलच्या सर्व बाईक त्याच्याकडे आहेत.
  • धोनीकडे Yamaha RD350, Harley Davidson Fatboy, Ducati 1098, Kawasaki Ninja H2  आणि super exclusive Confederate Hellcat X132 या काही खास बाईक्स आहे. विशेष म्हणजे दक्षिण पूर्व आशियातील अशाप्रकाराच्या दुर्मिळ बाईक असणार तो एकमेव भारतीय कर्णधार आहे.
  • एम. एस. धोनी हा त्याच्या उत्कृष्ट helicopter shot साठी ओळखला जातो. हा शॉट त्याला त्याचा मित्र संतोष दलाल याने टेनिस बॉल टुर्नामेंटमध्ये शिकवला आहे.

  • धोनीने त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना 2004 मध्ये बांग्लादेशविरुद्ध खेळला. या सामन्यात तो फलंदाजीसाठी 7 व्या क्रमांकावर उतरला. मात्र पहिल्याच चेंडूवर एकही धाव न घेता तो बाद झाला.
  • एम.एस.धोनीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 131 सामने खेळलेत. त्यात त्याने 9 शतकं 47 अर्धशतकांच्या जोरावर 7038 धावा केल्या.
  • त्याने 296 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने 10 शतकं आणि 64 अर्धशतकांच्या जोरावर 9 हजार 496 धावा केल्यात. त्याशिवाय एकदिवसीय आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टिरक्षक म्हणून सर्वोच्च धावसंख्या करणारा खेळाडू म्हणून तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
  • 30 डिसेंबर 2014 रोजी धोनीने तडकाफडकी कसोटी क्रिकेटला अलविदा केला होता. कसोटी क्रिकेटमध्ये धोनीने 90 सामन्यात 4 हजार 876 धावा केल्या आहेत. त्यात 6 शतक आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि टी 20 स्पर्धेमधून धोनी जानेवारी 2017 मध्ये निवृत्त झाला होता. तो निवृत्त झाल्यानंतर विराट कोहलीकडे कर्णधारपदाची धुरा सांभाळली.

  • महेंद्र सिंह धोनी आजपर्यंत क्रिकेट इतिहासात यशस्वी कर्णधार म्हणून मानले जाते. त्याच्याच कारकिर्दीत भारताने 2007 टी 20 विश्वचषक, 2011 चा वर्ल्डकप आणि 2013 ची चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती. महत्त्वाचे तीन विश्वचषक मिळवणारा तो एकमेव कॅप्टन आहे.
  • राहुल द्रविडनंतर टेस्ट क्रिकेटच्या कर्णधारपदाची धुरा एम.एस. धोनीकडे देण्यात आली. टेस्ट क्रिकेटचा कर्णधारपदी असताना धोनीने 27 सामने जिंकले आहेत. यात त्याने सौरव गांगुलीचा रेकॉर्ड मोडला आहे. सौरव गांगुलीच्या नावे 21 सामने जिंकण्याचा रेकॉर्ड होता. तसेच एकदिवसीय क्रिकेट आणि टी 20 स्पर्धेत त्याने प्रत्येकी 100 आणि 41 सामन्यात विजय मिळवला आहे.
  • 100 पेक्षा अधिक एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने जिंकवून देणारा एम.एस. धोनी हा तिसरा कर्णधार आहे. तर ऑस्ट्रेलिया रिकी पॉन्टिंग आणि अलन बॉर्डर हे दोघेही यात अग्रगण्य आहेत.

  • धोनीच्या कारकिर्दीतील पाचव्या आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसीठी पाठवण्यात आले. त्यानेही टीमचा विश्वास सार्थकी लावत 123 चेंडूत 148 धावा केल्या. हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक होते. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय यष्टीरक्षक म्हणून त्याचे हे सर्वात वेगवान शतक आहे.
  • एम.एस.धोनीने 4 जुलै 2010 ला साक्षी सिंग रावत हिच्यासोबत विवाहबद्ध झाला. साक्षी ही उत्तराखंडमधील डेहराडून येथून आहे. तिने हॉटेल मॅनेजमेंटचे संपूर्ण शिक्षण घेतले असून लग्नापूर्वी ती प्रशिक्षणार्थी म्हणून कोलकाताच्या ताजमध्ये कामाला होती.
  • धोनीने आपले लग्न अगदी गुपचूप पद्धतीने केले. धोनीच्या लग्नात केवळ त्याचे काही जवळचे मित्र आणि कुटुंबीय सहभागी झाले होते. विशेष म्हणजे जॉन अब्राहम आणि बिपाशा बासू यांनीही या लग्नात हजेरी लावली.
  • धोनी आणि साक्षी या दोघांना 6 फेब्रुवारी 2015 ला एक गोंडस मुलगी झाली. त्या दोघांनी तिचे नाव झिवा असे ठेवले.
  • धोनी हा सर्वोत्कृष्ट आणि वीजेपेक्षाही जलद गतीने यष्टीरक्षण करणारा खेळाडू आहे. त्याने तिन्ही प्रकारात आतापर्यंत 155 खेळाडूंना यष्टीरक्षणाद्वारे बाद केलं आहे.
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा कर्णधार म्हणूनही त्याची ओळख आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 342 षटकार ठोकले आहेत. सर्वाधिक षटकारांच्या यादीत पाकिस्तानचा कर्णधार 476 षटकारांसह पहिल्या क्रमांकावर असून धोनी पाचव्या क्रमांकावर आहे.
  • विशेष म्हणजे कर्णधार म्हणून सर्वाधिक सामने खेळलेला धोनी हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. धोनीने आतापर्यंत 349 सामने खेळले आहे.
  • धोनी हा टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनी कर्णधारपदी असताना टीम इंडियाने परदेशात 15 कसोटी सामन्यात पराभवाला सामोरी जावं लागलं होतं.

  • 2017 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध खेळताना त्याने 114 चेंडूत 54 धावा केल्या होत्या. यामुळे त्याच्या नावाची नोंद सर्वात धीम्या गतीने अर्धशतकी खेळी करणारा भारतीय खेळाडू म्हणूनही करण्यात आली.
  • जयपूरमध्ये 2005 साली श्रीलंकेविरुद्ध खेळताना धोनीने नाबाद 183 धावा केल्या होत्या. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावाची नोंद आहे.
  • 2013 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये खेळताना धोनीने 224 धावासंख्या उभारली. टीम इंडियाचा कर्णधार म्हणून दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड केला. त्याशिवाय या धावसंख्येमुळे त्याने यष्टीरक्षक म्हणून बुद्धी कुंदरेन यांचा 192 धावांचा रेकॉर्ड मोडून सर्वाधिक धावा केल्या.
  • गेल्या काही वर्षाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचा इतिहास पाहता एम.एस. धोनी हा  ठराविक षटकांत सर्वोत्कृष्ट मॅच फिनिशर म्हणून ओळखला जातो.
  • क्रिकेटपटू होण्यापूर्वी महेंद्रसिंग धोनीला लष्करी अधिकारी व्हायची इच्छा होती. काही वर्षांपूर्वी त्याची ही इच्छा पूर्ण झाली होती. १ नोव्हेंबर २०११ रोजी भारतीय लष्कराने त्याला लेफ्टनंट कर्नल पद देऊन गौरवले होते. त्यावेळी त्याने माझे भारतावर प्रचंड प्रेम आहे. तसेच देश, कुटुंब यानंतर माझी बायको ही माझ्या आयुष्यातील तिसरी महत्त्वाची व्यक्ती आहे. असे सांगितले होते.

  • धोनीचे भारत आणि भारताबाहेर मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. धोनीला सामन्यादरम्यान भेटण्यासाठी त्याचे अनेक चाहते गर्दी करत असतात. काही वर्षांपूर्वी अशाच एका चाहतीसोबत रांचीच्या विमानतळावर धोनीने सेल्फी काढला होता.
  • धोनी आतापर्यंत आठवेळा आयपीएल स्पर्धा खेळली आहे. त्यात सलग तीन वेळा त्यान चेन्नई सुपर किंग्स संघाला विजय मिळवून दिला आहे. चेन्नई सुपर किंग्सचा धोनी हा कर्णधार आहे.
  • धोनीने गेल्यावर्षी फेब्रुवारी 2018 मध्ये यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेणारा विक्रमही त्याने आपल्या नावे केला आहे.
  • धोनी हा बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमचा चाहता आहे. त्यामुळेच धोनीने आपले केस त्याच्याप्रमाणे लांब वाढवले होते. पण काही काळाने धोनीने आपले वाढवलेले केस कापून टाकले.
  • गेल्यावर्षी धोनीच्या वाढदविसापूर्वी धोनीला मोठं गिफ्ट मिळाले होते. धोनीने आतापर्यंत 500 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एवढे सामने खेळणारा तो सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडच्यानंतर तिसरा भारतीय तर पहिला विकेटकीपर ठरला आहे.
  • प्रत्येक सामना जिंकल्यानंतर धोनी मैदानातील स्टम्प आठवण म्हणून घेतो. हा त्याचा एकप्रकारचा छंद आहे.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.