IPL 2020, CSK vs RR : ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनीचे भन्नाट ‘द्विशतक’, ठरला आयपीएलमधील पहिला खेळाडू

| Updated on: Oct 20, 2020 | 12:16 AM

महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्जसचे 2008 पासून नेतृत्व करत आहे.

IPL 2020, CSK vs RR : कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचे भन्नाट द्विशतक, ठरला आयपीएलमधील पहिला खेळाडू
उर्वरीत आयपीएल सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान युएईत होणार असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केले. त्यामुळे धोनीदेखील आयपीएलसाठी युएईला जाणार असून तो उर्वरीत सामन्यांत चेन्नईचे नेतृत्त्व करणार आहे.
Follow us on

अबुधाबी : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील 37 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) चेन्नई सुपर किंग्जसवर (Chennai Super Kings) 7 विकेटने मात केली. चेन्नईने विजयासाठी दिलेले 126 धावांचे आव्हान राजस्थानने 15 चेंडूआधी पूर्ण केले. राजस्थानकडून जोस बटलरने नाबाद 70 धावांची खेळी केली. या विजयासह राजस्थानने प्लेऑफसाठीचे आव्हान कायम ठेवले आहे. चेन्नईकडून धोनीने 26 धावांची खेळी केली. दरम्यान ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनीने ऐतिहासिक कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा आयपीएलमधील पहिलाच खेळाडू ठरला. Mahendra Singh Dhoni became the first player to play 200 matches in IPL 2020

धोनीची ऐतिहासिक कामगिरी

महेंद्रसिहं धोनीने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात बॅटिंगला येताच ही ऐतिहासिक कामगिरी केली. धोनीने आयपीएलमध्ये 200 सामने खेळण्याची असाधारण कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा धोनी एकमेव खेळाडू ठरला. धोनीनंतर सर्वाधिक सामने खेळण्याच्या यादीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माचा दुसरा नंबर लागतो. रोहितने आतापर्यंत आयपीएलमध्ये 197 सामने खेळले आहेत. तर सुरेश रैना 193 सामन्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

धोनीची आयपीएल कारकिर्द

धोनीने आयपीएलच्या 200 सामन्यात 137 च्या स्ट्राईक रेटने 4 हजार 596 धावा केल्या आहेत. यामध्ये 23 अर्धशतकांचा समावेश आहे. यामध्ये धोनीने 308 चौकार 215 सिक्सर लगावले आहेत.

यशस्वी कर्णधार

महेंद्रसिंह धोनी आयपीएलमधील यशस्वी कर्णधार आहे. धोनीने आपल्या नेतृत्वात चेन्नईला 3 वेळा आयपीएल विजेतपद मिळवून दिलं आहे. धोनीने 2010 आणि 2011 मध्ये सलग 2 वेळा चेन्नईला आयपीएल विजेतेपद मिळवून दिलं होतं. तर यानंतर धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने 2018 मध्ये तिसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद पटकावलं होतं.

धोनी आयपीएलच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत 2016 आणि 2017 चा अपवाद वगळता चेन्नईचे नेतृत्व करत आहे. चेन्नई संघावर 2016 आणि 2017 मध्ये बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे धोनीने या 2 वर्षात रायझिंग पुणे सुपर जायंट्सचे प्रतिनिधित्व केलं होतं.

आयपीएलच्या इतिहासात धोनीने सर्वाधिक वेळा प्लेऑफमध्ये (बाद फेरी) पोहचण्याची धडक कामगिरी केली आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने सलग 10 वर्ष प्लेऑफमध्ये धडक मारली आहे. चेन्नईवर बंदी घातल्याने धोनीने 2016 मध्ये पुण्याचे नेतृत्व केलं होतं. त्यावेळेस धोनीच्या नेतृत्वात पुण्याला प्लेऑफमध्ये पोहचता आले नव्हते. पुण्याचा संघ 2016 मध्ये पॉइंट्स टेबलमध्ये 7 व्या क्रमांकावर होता. पुण्याच्या नेतृत्वाची जबाबदारी 2017 मध्ये स्टीव्ह स्मिथकडे दिली होती. त्यामुळे धोनीने आयपीएलमध्ये फक्त 2017 मध्येच कर्णधारपद भूषवलं नव्हतं.

कर्णधार म्हणून 4 हजार धावा

चेन्नईकडून खेळताना कर्णधार म्हणून 4 हजार धावांचा टप्पाही धोनीने पूर्ण केला आहे. धोनीने ही कामगिरी राजस्थानविरुद्धच्या आजच्या सामन्यात केली.

संबंधित बातम्या :

IPL 2020 |दुखापतग्रस्त दिल्लीला दिलासा, अमित मिश्राच्या जागी नव्या फिरकीपटूला संधी

IPL 2020 | MIvKXIP : सचिन तेंडुलकरमुळे मुंबई सुपर ओव्हरमध्ये हरली?

Mahendra Singh Dhoni became the first player to play 200 matches in IPL 2020