महेंद्रसिंह धोनीकडे सचिन-सेहवागला मागे टाकण्याची संधी

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वन डे सामन्यात दमदार कामगिरी करत पुन्हा एकदा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने आपली धडाकेबाज फलंदाजी दाखवून दिली. धोनीच्या जबरदस्त फलंदाजामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका 2-1 अशी जिंकली. आता येत्या बुधवारी धोनी न्यूझीलंडविरुद्ध सुरु होत असलेल्या वन डे मालिकेत खेळणार आहे. यासाठी भारतीय संघाचा सराव सुरु आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच […]

महेंद्रसिंह धोनीकडे सचिन-सेहवागला मागे टाकण्याची संधी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:38 PM

मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वन डे सामन्यात दमदार कामगिरी करत पुन्हा एकदा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने आपली धडाकेबाज फलंदाजी दाखवून दिली. धोनीच्या जबरदस्त फलंदाजामुळे भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन डे मालिका 2-1 अशी जिंकली. आता येत्या बुधवारी धोनी न्यूझीलंडविरुद्ध सुरु होत असलेल्या वन डे मालिकेत खेळणार आहे. यासाठी भारतीय संघाचा सराव सुरु आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच वनडे सामने खेळवले जाणार आहेत.

न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत धोनीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी आहे. न्यूझीलंडमध्ये धोनीने आतापर्यंत 10 वन डे सामन्यात 456 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडमध्ये  सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय क्रिकेटरच्या यादीत धोनी तिसऱ्या स्थानावर आहे. जर धोनीने या मालिकेत 197 धावांचा पल्ला गाठला तर तो सचिन तेंडुलकरला मागे टाकत पहिल्या स्थानावर झेप घेऊ शकतो.

सचिन तेंडुलकरने न्यूझीलंडमध्ये 18 सामन्यांमध्ये सर्वाधिक 652 धावा केल्या आहेत. यानंतर दुसऱ्या स्थानावर भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागचं नाव येतं. सेहवागने 12  सामन्यांमध्ये 598 धावा ठोकल्या  आहेत. तर धोनी 456 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी धोनीच्या खेळावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं.  37 वर्षीय धोनीला आगामी विश्वकप स्पर्धेसाठी कमकुवत समजलं जात होतं. मात्र धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दमदार कामगिरी करुन, विरोधकांना फलंदाजीने उत्तर दिलं.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.