धोनीचे इंस्टाग्रामवर दीड कोटी फॉलोअर्स, पण धोनी केवळ ‘या’ दोघांनाच फॉलो करतो
धोनीला सामन्यादरम्यान भेटण्यासाठी त्याचे अनेक चाहते गर्दी करत असतात. असे असले तरी धोनी हा इंस्टाग्रामवर केवळ 2 जणांनाच फॉलो करतो. हे ऐकून नक्कीच तुम्हाला नवलं वाटलं असेल, पण हे खरं आहे.
मुंबई : क्रिकेट म्हणजे अनेकांचा आवडता खेळ. भारतात क्रिकेटचे सर्वाधिक चाहते आहेत. तसेच क्रिकेटपटूंचेही अनेक चाहते आहेत. आपण बऱ्याचदा या क्रिकेटपटूंच्या लाईफस्टाईल, कुटुंब, हेअरस्टाईल यांसह अनेक गोष्टी फॉलो करतो. टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार अशी महेंद्रसिंह धोनीची ओळख आहे. धोनीचे भारत आणि भारताबाहेर मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. धोनीला सामन्यादरम्यान भेटण्यासाठी त्याचे अनेक चाहते गर्दी करत असतात. असे असले तरी धोनी हा इंस्टाग्रामवर केवळ 2 जणांनाच फॉलो करतो. हे ऐकून नक्कीच तुम्हाला नवलं वाटलं असेल, पण हे खरं आहे.
उत्तम यष्टीरक्षक, मॅच फिनीशर अशी क्रिकेट जगतात धोनीची ओळख निर्माण झाली आहे. धोनी हा सोशल मीडियावर फार कमी अॅक्टीव्ह असतो. एकट्या इंस्टाग्रामवर धोनीचे 1 कोटी 46 लाख म्हणजेच 14.6 मिलीयन चाहते आहे. तर ट्विटरवर 75 लाख 51 हजार 007 चाहते आहे. यावरुन तुम्ही धोनीच्या खऱ्या आयुष्यात त्याचे किती चाहते असतील याचा तुम्ही नक्कीच अंदाज लावू शकता. लाखोंच्या घरात चाहतावर्ग असलेला धोनीही हा इंस्टाग्रामवर मात्र केवळ 2 जणांना फॉलो करतो. तर ट्विटरवर तो फक्त 34 जणांनाच फॉलो करतो.
यावरुन तुम्हाला तो त्याची बायको साक्षीला आणि एखाद्या क्रिकेटपटूला फॉलो करत असावा असे तुम्हाला वाटलं असेल. पण, धोनीच्या इंस्टाग्रामवरील फॉलोवर्समधील पहिले नाव म्हणजे त्याची लाडकी मुलगी झीवा आणि दुसरे नाव म्हणजे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन या दोघांचे आहे.
टीम इंडियाचा विजय होवो अथवा पराभव धोनी हा कायम शांत असतो, म्हणूनच त्याला कॅप्टन कूल या नावाने विशेष ओळखलं जातं. 2007 मधील टी 20 विश्वचषक, 2011 मधील वन डे विश्वचषक आणि त्यानंतर चॅम्पियन ट्रॉफीचे विजेतेपद हे सर्व विश्वकप धोनीच्या काळात टीम इंडियाला मिळाले आहे. अशा या कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने काल (7 जुलै) आपला 38 वा वाढदिवस साजरा केला.