200 षटकार ठोकणारा धोनी पहिला भारतीय, दुसरा कोण?

बंगळुरु : आयपीएलच्या 12 व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 200 षटकार मारण्याचा नवा विक्रम नोंदवला आहे. धोनीने आतापर्यंत आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात धमाकेदार खेळी केली आहे. आयपीएलच्या इतिहासात 200 षटकार मारणारा धोनी पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. धोनीच्या या कामगिरीने त्याचा चाहतावर्गही सोशल मीडियावरुन त्याला शुभेच्छा देत आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा पहिला […]

200 षटकार ठोकणारा धोनी पहिला भारतीय, दुसरा कोण?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

बंगळुरु : आयपीएलच्या 12 व्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 200 षटकार मारण्याचा नवा विक्रम नोंदवला आहे. धोनीने आतापर्यंत आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात धमाकेदार खेळी केली आहे. आयपीएलच्या इतिहासात 200 षटकार मारणारा धोनी पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. धोनीच्या या कामगिरीने त्याचा चाहतावर्गही सोशल मीडियावरुन त्याला शुभेच्छा देत आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू म्हणून धोनीने मान मिळवला असला, तरी आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांच्या यादीत धोनी तिसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या क्रमांकावर 323 षटकारांसह किंग्ज इलेव्हन पंजाबचा ख्रिस गेल, तर दुसऱ्या नंबरवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा ए बी डिव्हिलियर्स आहे. डिव्हिलियर्सने 204 षटकार ठोकत दुसरं स्थान पटकावलं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध धोनीने धमाकेदार अशी खेळी केली. धोनीने 48 चेंडूत नाबाद 84 धावा केल्या. धोनीने  पाच चौकार आणि सात षटकार ठोकले. आतापर्यंत आयपीएलमध्ये धोनीने 203 षटकार मारले आहेत.

कालच्या  सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्समध्ये अटीतटीची लढत झाली. यावेळी धोनीने शानदार कामगिरी करत नाबाद 84 धावांची खेळी केली. मात्र तरीही चेन्नई सुपर किंग्जला एका धावाने पराभव पत्कारावा लागला.

महेंद्रसिंह धोनी अशा वेळी मैदानात उतरला, जेव्हा चेन्नईची सहाव्या षटकात अवस्था चार बाद 28 अशी होती. धोनीने यानंतर शानदार खेळ करत संघाला विजयी मार्गावर नेलं. मात्र चेन्नईला तो विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला.

चेन्नईला शेवटच्या षटकात 26 धावांची गरज होती. धोनीने उमेश यादवच्या पहिल्या पाच चेंडूवर – पहिला चौकार, मग दोन षटकार, नंतर दोन धावा आणि पुन्हा एक षटकार मारला. मात्र शेवटचा चेंडू हुकल्यामुळे चेन्नईचा पराभव झाला.

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणार फलंदाज

  • ख्रिस गेल, 120 डाव – 323 षटकार
  • एबी डिव्हिलियर्स, 138 डाव – 204 षटकार
  • महेंद्रसिंह धोनी, 165 डाव – 203 षटकार
  • रोहित शर्मा, 177 डाव – 190 षटकार
  • सुरेश रैना, 182 डाव – 190 षटकार
  • विराट कोहली, 165 डाव – 186 षटकार
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.