MS Dhoni | महेंद्र सिंह धोनीच्या आई-वडिलांना कोरोना, रांचीतील रुग्णालयात दाखल

महेंद्र सिंह धोनी आयपीएलमध्ये व्यस्त असताना त्याचे आई-वडील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. (Dhoni Mother Father COVID)

MS Dhoni | महेंद्र सिंह धोनीच्या आई-वडिलांना कोरोना, रांचीतील रुग्णालयात दाखल
धोनीचे आई-वडील
Follow us
| Updated on: Apr 21, 2021 | 10:13 AM

रांची : टीम इंडियाचा माजी कप्तान आणि चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या (MS Dhoni) आई-वडिलांना कोरोनाची लागण झाली आहे. धोनीचे वडील पान सिंह धोनी आणि मातोश्री देवकी देवी या दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दोघांना झारखंडमधील रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. (Mahendra Singh Dhoni Mother Father found COVID Positive in Ranchi)

स्टार क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी आयपीएलमध्ये व्यस्त असताना त्याचे आई-वडील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. धोनीच्या पालकांना रांचीमधील बरियातू रोडवर असलेल्या पल्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. दोघांची प्रकृती सामान्य असल्याची माहिती आहे. ‘नवभारत टाइम्स’ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

ऑक्सिजन लेव्हलही प्रमाणात

धोनीच्या आई-वडिलांची ऑक्सिजन लेव्हलही प्रमाणात असल्याने काळजीचं कोणतंही कारण नाही. पल्स रुग्णालय प्रशासनाच्या माहितीनुसार सुदैवाने कोरोना दोघांच्याही फुफ्फुसांपर्यंत पोहोचलेला नाही. दोघांच्या प्रकृतीत लवकरच सुधारणा होऊन ते निगेटिव्ह येतील आणि त्यांना डिस्चार्ज मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

झारखंडमध्ये कोरोना संसर्ग वाढता

झारखंडमध्ये मंगळवारी 4 हजार 969 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. यासह राज्यात कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 72 हजार 315 वर गेली आहे. आरोग्य विभागाने काल रात्री जाहीर केलेल्या कोव्हिड बुलेटिननुसार राज्यात उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 37 हजार 590 इतकी आहे. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरी 85.60 टक्क्यांच्या तुलनेत 79.84 टक्क्यांपर्यंत खाली गेले आहे. तर झारखंडमधील मृत्यूचे प्रमाण 0.89 टक्के इतके आहे.

रांची शहरातच सर्वाधिक नवे कोरोनाग्रस्त

झारखंडमधील विविध रुग्णालयात कालच्या दिवसात 45 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोना संसर्गाने मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या 1547 इतकी झाली आहे. तर राज्यातील विविध कोव्हिड रुग्णालये आणि होम आयसोलेशनमध्ये सध्या 33 हजार 178 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. धोनीचे कुटुंबीय राहत असलेल्या रांची शहरातच सर्वाधिक 1703 नवे कोरोनाग्रस्त सापडले.

संबंधित बातम्या 

IPL 2021 : ‘धोनीला म्हातारपणाची जाणीव’, 200 सामने पूर्ण करताच मोठं वक्तव्य, पाहा व्हिडीओ…

(Mahendra Singh Dhoni Mother Father found COVID Positive in Ranchi)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.