3 बॅट्समन 99 रन्सवर आऊट, नर्व्हस नाईन्टीजचा ‘नकोसा रेकॉर्ड’!, पाहा एकाच मॅचमध्ये काय काय घडलं…?
एकाच मॅचमध्ये तीन बॅट्समन 99 रन्सवर आऊट झाले होते ज्यामुळे त्यांना आपलं शतक पूर्ण करता आलं नव्हतं. 1973 सालची ही मॅच... बरोबर आजच्याच दिवशी या नकोशा रेकॉर्डची नोंद झाली. (Pakistan Vs England Test Match )
मुंबई : प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या मैदानात हेल्मेट काढून दोन्ही हात आणि डोळे आकाशाकडे करत शतक झालेला आनंद व्यक्त करण्याचा मोह प्रत्येक खेळाडूला असतो. असा क्षण पुन्हा पुन्हा यावा यासाठी प्रत्येक खेळाडू जीवाचा आकांत करत असतो, प्रयत्नांची पराकष्ठा करत असतो. पण ज्यावेळी फक्त एक रन्समुळे शतक चुकतं, तेव्हा त्याला होणारं दु:ख हे कशाच्याही पलीकडचं असतं. आज आम्ही तुम्हाला अशाच एका मॅचची गोष्ट सांगणार आहोत की ज्या मॅचमध्ये तीन बॅट्समन 99 रन्सवर आऊट झाले होते ज्यामुळे त्यांना आपलं शतक पूर्ण करता आलं नव्हतं. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 1973 सालची ही मॅच… बरोबर आजच्याच दिवशी या नकोशा रेकॉर्डची नोंद झाली. (Majid khan Mushtaq Mohammad Dennis Miss hundred by 1 Runs Pakistan Vs England Test Match )
24 ते 29 मार्चदरम्यान ही मॅच कराची येथे खेळली गेली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली. 6 विकेट गमावून 445 धावांवर त्यांनी पहिला डाव घोषित केला. सलामीवीर सादिक मोहम्मद 89 धावांवर बाद झाला. 11 धावांनी त्याचं शतक हुकलं. आता ही कसर भरुन काढण्याची जबाबदारी तिसर्या क्रमांकावर आलेल्या कॅप्टन माजिद खान आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज मुश्ताक मोहम्मदकडून होती. ही आशा यासाठी होती की, दोघेही कमालीची फलंदाजी करत होते.
पाकिस्तानच्या माजीद आणि मुश्ताकचं शतक हुकलं
पण माजीद खान 99 धावांवर बाद झाला. त्याने पोकोकच्या चेंडूवर अमिसच्या हाती कॅच दिला. माजिद खान आऊट झाल्यानंतर आता नजरा होत्या त्या मुश्ताक मोहम्मदवर… परंतु मुश्ताकनेही माजिदपेक्षा जास्त रन्स करणार नाही, अशी जणू शपथ घेतली होती. तो ही 99 रन्स काढून आऊट झाला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तो क्रिकेटमध्ये आत्महत्या गणल्या जाणाऱ्या रन्सआऊट पद्धतीने तो बाद झाला. इंग्लंडने 386 रन्स केले.
इंग्लंडचा बॅट्समनचंही शतक हुकलं
यामध्ये इंग्लंडच्या डेनिसने पाकिस्तानच्या माजिद आणि मुश्ताकचं अनुकरण केलं. डेनिस 99 धावांवर असताना इंतियाब आलमच्या बोलिंगवर सरफराज नवाजच्या हाती कॅच देऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. अशा प्रकारे एकाच मॅचमध्ये तीन फलंदाज 99 रन्सवर आऊट झाले.
(Majid khan Mushtaq Mohammad Dennis Miss hundred by 1 Runs Pakistan Vs England Test Match)
हे ही वाचा :
तब्बल आठ वर्षांनंतर भारत-पाक क्रिकेट मालिका, ICC च्या बैठकीकडे नजरा
Shreyas Iyer Injury : ना रहाणे, ना स्मिथ, ‘हा’ असेल दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार