Yuzvendra chahal : घटस्फोटांच्या अफवांदरम्यान चहलला आणखी एक मोठा झटका , आता काय घडलं ?

6-7 महिन्यांपूर्वी युजवेंद्र चहलचं आयुष्य सुरळीत होतं, चांगला वेळ जात होता. टी-20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या टीम इंडियामध्ये त्याचाही समावेश होता. पण गेले 6 महिने त्याच्यासाठी अत्यंत खराब गेले आहेत. तो फक्त भारतीय संघाबाहेर बसलेला नाही तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही वादळ आलं असून पत्नीसोबत घटस्फोट घेत असल्याच्या चर्चाही सुरू आहेत.

Yuzvendra chahal : घटस्फोटांच्या अफवांदरम्यान चहलला आणखी एक मोठा झटका , आता काय घडलं ?
युजवेंद्र चहल
Follow us
| Updated on: Jan 09, 2025 | 1:00 PM

माणसाचं आयुष्य किती अनिश्चित असतं ना ! कधीकधी एकाच वेळी इतका आनंद मिळतो की माणूस थक्क होतो, पण कधीकधी अनेक अडचणी एकामागोमाग एक समोर ठाकतात आणि काहीच सुचेनासं होत.भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू युजवेंद्र चहल सध्या दुसऱ्या परिस्थितीचा सामना करत आहे, त्याच्या आयुष्यातील गोष्टी एकामागून एक अशा एक खराब होत चालल्या आहेत. सुमारे 6-7 महिन्यांपूर्वी चहल टीम इंडियाचा एक महत्वपूर्ण भाग होता आणि T20 विश्वचषक जिंकून परतला होता. पण गेले ६ महिने त्याच्यासाठी खूप वाईट गेले. टीम इंडियामधून त्याचा पत्ता कट झाला, त्याला बाहेर बसावं लागलं. एवढंच नव्हे तर त्याच्या वैयक्तिक आयुष्यातही वादळ आलं असून चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा विभक्त होत असल्याच्या बातम्याी समोर येत आहे. वैयक्तिक आयुष्यात कठीण काळाचा सामना करावा लागणाऱ्या चहलला आता करिअरच्या आघाडीवर आणखी एक धक्का बसला आहे.

हरियाणाच्या संघातून बाहेर

टीम इंडियातून बाहेर बसवण्यात आलेल्या चहलला आता त्याच्या स्टेट टीममधून, हरियाणामधूनही वगळण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी चहल हा सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये संघाचा भाग होता आणि तो सतत खेळत होता, मात्र आता त्याला विजय हजारे ट्रॉफीमध्ये संधी मिळालेली नाही. टूर्नामेंट ग्रुप स्टेज मध्येही चहलचा समावेश झाला नव्हता आणि आता उपांत्यपूर्व फेरीसाठीही त्याची निवड झालेली नाही. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात जी खळबळ माजली आहे, त्यामुळे सध्या त्याला ब्रेक देण्यात आल्याचा अंदाज व्यक्त होत आहे, पण असोसिएशनने या वृत्ताचा इन्कार केला आहे.

क्रिकबझने आपल्या रिपोर्टमध्ये हरियाणा क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटले आहे की, चहलला संघात निवडलं माही, त्याचं कारण वैयक्तिक आयुष्य नसून क्रिकेटशी संबंधित कारणांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यासाठी नवीन फिरकीपटू तयार करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले आणि निवडकर्त्यांनी याबाबत चहलशीही चर्चा केली, तो त्यासाठी तयार होता, असेही त्याने नमूद केलं. हरियाणाने गेल्या वर्षी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते आणि त्यात चहलची विशेष भूमिका होती.

IPL मध्ये दाखवणार दम ?

मात्र, चहल अजूनही क्रिकेटपासून पूर्णपणे दूर झालेला नाही कारण त्याच्याकडे अजूनही आयपीएलची संधी आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात यशस्वी गोलंदाज असलेल्या चहलला नवीन हंगामासाठी आयोजित मेगा लिलावात पंजाब किंग्जने 18 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले. यामुळे तो आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा फिरकी गोलंदाज ठरला. याआधी, चहल सलग 3 सीझनमध्ये राजस्थान रॉयल्सचा भाग होता, तिथे त्याने पर्पल कॅपही जिंकली होती. आयपीएल 2025 चा नवा सीझन हा 15 मार्चपासून सुरू होणार आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.