मुंबई : अनेक खेळाडू शतक झळकावल्यानंतर आनंद अनोख्या पद्धतीने साजरा करतात. ऑस्ट्रेलियाचा (AUS) आघाडीचा फलंदाज मार्नस लाबुशेन (Marnus Labuschagne) याने ज्यावेळी द्विशतक झळकावले, त्यावेळी त्याच्या पत्नीने सुद्धा आनंद साजरा केला आहे. त्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सध्या ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज (WI) यांच्यात कसोटी मालिका सुरु आहे. मार्नस लाबुशेनने काल 350 चेंडूत 204 धावांची तुफानी खेळी केली.
ज्यावेळी मार्नस लाबुशेन यांचं द्विशतक झालं त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी देखील आनंद साजरा केला. त्यावेळी मार्नस लाबुशेन याची पत्नी रिबेका छोटाशा बाळाला घेऊन मॅच पाहत होती. तिने सुद्धा बाळाला कुशीत घेऊन आनंद साजरा केला. दुसरं शतक पुर्ण झाल्यानंतर मार्नस लाबुशेन लगेच आऊट झाला.
मार्नस लाबुशेन याने आदल्या दिवशी सांगितलं होतं. माझी आणि मुलगी हे पहिल्यांदा पर्थमध्ये सामना पाहायला आल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर मला मोठी खेळी करता आल्यामुळे मी खूप आनंदी आहे.
मार्नस लाबुशेन याने रिबेका हीच्यासोबत 2017 मध्ये लग्न केलं आहे. दोघांची भेट एका चर्चमध्ये झाली होती. त्यानंतर दोघांची मैत्री झाली,मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यांना हैली नावाची एक मुलगी आहे.