Match fixing : क्रिकेटमध्ये पुन्हा मॅच फिक्सिंग, या खेळाडूवर 14 वर्षांची बंदी
संयुक्त अरब अमीरातमधील हा खेळाडू आहे.
क्रिकेट (Cricket News) विश्वात खळबळ माजवणारी एक घटना घडली आहे, क्रिकेटमध्ये पुन्हा मॅच फिक्सिंग (Match fixing) उघडकीस आले आहे. त्यामुळे क्रिकेटला पुन्हा एकदा काळाडाग लागला आहे. विशेष म्हणजे जो खेळाडू (Cricket Player) या प्रकरणात सापडला आहे. त्याला 14 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे त्याचं करिअर संपल्यात जमा झालं आहे.
संयुक्त अरब अमीरातमधील हा खेळाडू आहे. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
मेहर छायाकर असं त्या खेळाडूचं नाव आहे. 2019 मध्ये त्याच्यावर आरोप लावले होते. परंतु त्याने त्या आरोपाचं खंडन देखील केलं होतं. पण तो दोषी आढळल्यानंतर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात आली. त्यामुळे क्रिकेटविश्वात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.
मेहर छायाकर या खेळाडूवर याच्या आगोदर सुद्धा दोन वेळा मॅच फिक्सिंगचे आरोप करण्यात आले होते.
क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत मॅच फिक्सिंगच्या अनेक घटना घडल्या आहेत. ज्यावेळी एखादी घटना उघडकीस आली आहे, त्यावेळी त्या खेळाडूवर कारवाई झाली आहे.