सेहवागने ऑस्ट्रेलियाला डिवचलं, मॅथ्यू हेडनचा तिळपापड
मुंबई: टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाने ऑस्ट्रेलियाला डिवचल्याने कांगारुंचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनचा चांगलाच तिळपापड झाला आहे. स्टार स्पोर्ट्सवरील जाहिरातीत सेहवाग कांगारुंची बेबीसीटिंग करताना दिसतो. तीच जाहिरात पाहून मॅथ्यू हेडन चांगलाच भडकला. 47 वर्षीय हेडनने ट्विट करुन, ऑस्ट्रेलियन संघाला हलक्यावर घेऊ नका, आम्हीच वर्ल्डकप जिंकला होता हे विसरु नका, असं म्हटलं आहे. ऑस्ट्रेलियन […]
मुंबई: टीम इंडियाचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाने ऑस्ट्रेलियाला डिवचल्याने कांगारुंचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनचा चांगलाच तिळपापड झाला आहे. स्टार स्पोर्ट्सवरील जाहिरातीत सेहवाग कांगारुंची बेबीसीटिंग करताना दिसतो. तीच जाहिरात पाहून मॅथ्यू हेडन चांगलाच भडकला. 47 वर्षीय हेडनने ट्विट करुन, ऑस्ट्रेलियन संघाला हलक्यावर घेऊ नका, आम्हीच वर्ल्डकप जिंकला होता हे विसरु नका, असं म्हटलं आहे.
ऑस्ट्रेलियन संघ भारत दौऱ्यावर येत आहे. 24 फेब्रुवारीपासून टी ट्वेण्टी मालिकेला सुरुवात होईल. 24 फेब्रुवारीला पहिला तर 27 फेब्रुवारीला दुसरा टी 20 सामना खेळवला जाईल. त्यानंतर 5 सामन्यांच्या वन डे मालिकेला सुरुवात होईल.
मात्र त्यापूर्वीच स्टार स्पोर्ट्सने या मालिकेशी संबंधित प्रमोशन व्हिडीओ प्रसिद्ध केला. या व्हिडीओत वीरेंद्र सेहवाग ऑस्ट्रेलियन खेळाडूंना टोमणे लगावताना दिसत आहे.
खरं तर गेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टिम पेन आणि ऋषभ पंत यांच्यात भर मैदानात शाब्दिक चकमक रंगली होती. त्यावेळी बेबीसीटिंगचा उल्लेख झाला होता. त्या पार्श्वभूमीवर आता ऑस्ट्रेलियन संघ भारतात येत आहे. या मालिकेच्या प्रमोशन व्हिडीओत सेहवाग ऑस्ट्रेलियन संघाच्या चिमुकल्यांसोबत मस्ती करताना दिसतो. या व्हिडीओत सेहवागने एका ऑस्ट्रेलियन जर्सी घातलेल्या बाळाला आपल्या कवेत घेतल्याचं पाहायलं मिळतं.
या व्हिडीओत सेहवाग म्हणतो, ज्यावेळी आम्ही ऑस्ट्रेलियात गेलो होतो, त्यावेळी त्यांनी विचारलं होतं बेबीसीटिंग करणार का? आम्ही म्हणालो, सगळेच या’. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेनने केलेल्या स्लेजिंगला हे उत्तर आहे.
या व्हिडीओमुळेच हेडनचा तिळपापड झाला. हेडन म्हणाला, “ऑस्ट्रेलियाला मस्करीत घेऊ नको वीरु बॉय, थोडं आठव, आम्ही सध्याचे विश्वविजेते आहोत”
#BeWarned Never take Aussie’s for a joke Viru Boy @virendersehwag @StarSportsIndia Just remember who’s baby sitting the #WorldCup trophy https://t.co/yRUtJVu3XJ
— Matthew Hayden AM (@HaydosTweets) February 11, 2019
ऋषभ पंत आणि टीम पेन यांच्यात नेमका वाद काय?
बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऋषभ पंत फलंदाजीला आला, त्यावेळी विकेटकीपर टीम पेनने पंतला उद्देशून टीपण्णी करण्यास सुरुवात केली. पेन म्हणाला होता “वन डे मालिकेसाठी एम एस धोनीची निवड झाली आहे. या मुलाला (पंत) हरिकेन्स (हॉबर्ट) टीममध्ये घ्यायला हवं. त्यांना एका फलंदाजाची गरज आहे. त्यामुळे तुझी (पंत) ऑस्ट्रेलियातील सुट्टीही वाढेल, हॉबर्ट चांगलं शहर आहे. इथं एक चांगलं घर देऊ”
यापुढे जाऊन पेन पंतला म्हणाला, “तू माझ्या मुलांना खेळवू शकशील का? म्हणजे मला माझ्या पत्नीसोबत सिनेमाला जाता येईल. तू माझ्या मुलांवर लक्ष ठेव”
पंतचं पेनला उत्तर
पेनने केलेल्या टीका टिपण्णीला पंतनेही जशास तसं उत्तर दिलं. दुसऱ्या दिवशी पेन फलंदाजीला आला त्यावेळी, पंत विकेटकीपिंग करत होता. पंत म्हणाला, “आज आमच्याकडे एक खास पाहुणा आहे. मयांक, तू कधी टेंपररी कप्तान (हंगामी कर्णधार) पाहिला आहेस का? या कर्णधाराला आऊट करण्याची गरज नाही. हा केवळ बकबकच करु शकतो”
संबंधित बातम्या
दोन उपकर्णधार घेऊन ऑस्ट्रेलिया भारत दौऱ्यावर, स्टार्क आऊट
टीम पेनने आधी पंतला डिवचलं, आता पेनच्या पत्नीचीही ‘वादात’ उडी