विषप्रयोगानंतर क्रिकेटपटूची मोठी हेल्थ अपडेट, आता कशी आहे तब्येत ? मॅच खेळणार की नाही?

Mayank Agarwal : बराच काळ भारतीय संघाबाहेर असलेला सलामीवीर फलंदाज आणि कर्नाटकचा कर्णधार मयंक अग्रवालची प्रकृती अचानक बिघडली. आगरतळाहून सामना खेळून परतत असताना, विमानात चढताच त्याची प्रकृती खालावली, त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. त्याच्या प्रकृतीबाबत मोठे अपडेट्स समोर आले आहेत.

विषप्रयोगानंतर क्रिकेटपटूची मोठी हेल्थ अपडेट, आता कशी आहे तब्येत ? मॅच खेळणार की नाही?
Follow us
| Updated on: Feb 01, 2024 | 7:24 AM

Mayank Agarwal latest health update : काल संध्याकाळी एक विचित्र घटना घडली. टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज आणि कर्नाटक संघाचा कर्णधार मयंक अग्रवाल हा आगरतळा येथून सामना खेळून परत जाण्यासाठी विमानात चढला. पण अचानक त्याची तब्येतच बिघडली. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आता त्याचे हेल्थ अपडेट्स समोर आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. आपल्याविरोधात कट रचण्यात आल्याचा आरोप करत मयंकने पोलिसांकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. विमानात चढल्यावर त्याने त्याच्या सीटवर ठेवलेल्या एका पाऊचमधील द्रवपदार्थ प्यायला, मात्र त्यानंतरच त्याची प्रकृती बिघडली आणि तो जबर आजारी पडला.

मयंकने दाखल केली तक्रार

मयंकने त्याच्या मॅनेजरमार्फत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पश्चिम त्रिपुराचे पोलीस अधिकारी किरण कुमार म्हणाले, ‘मयांक अग्रवाल हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे. आता त्याची प्रकृती स्थिर आहे, परंतु त्यांच्या मॅनजरने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी NCCPS (न्यू कॅपिटल कॉम्प्लेक्स पोलिस स्टेशन) मध्ये तक्रार दाखल केली आहे.’ मॅनेजरच्या सांगण्यानुसार, मयंक जेव्हा इंडिगोच्या विमानात चढला, तेव्हा त्याच्या सीटवर एक पाऊच ठेवला होता. त्याने त्यामधील लिक्विड प्यायले, मात्र ते थोडेसे लिक्विड पिताच त्याला त्रास होऊ लागला. तोंडात जळजल झाली आणि त्याला बोलताही येत नव्हते. त्याची प्रकृती बिघडल्याचे दिसताच त्याला तातडीने आयएलएस रुग्णालयात आणण्यात आले. त्याच्या तोंडाला सूज आली होती आणि व्रणही दिसत होते. मात्र, आता त्याची प्रकृती स्थिर आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

डॉक्टर्सचे आहे लक्ष

‘पोलिसांनी याप्रकरणी तक्रार नोंदवली असून आम्ही या प्रकरणाची चौकशी करू, असे राज्याच्या आरोग्य सचिवांनी सांगितली. मयंकच्या मॅनेजरच्या म्हणण्यानुसार, उद्या तो बंगळुरू येथे परत जाईल मात्र तो जोपर्यंत आगरतळा येथे आहे, तोपर्यंत त्याला उत्तम उपचार देऊ, असे त्यांनी नमूद केले. मयंकला रुग्णालयात दाख करण्यात आल्यावर डॉक्टरांचे एक पथक त्याच्यावर संपूर् लक्ष ठेवून आहे. त्याच्या तोंडात थोडी जळजळ झाली आणि त्याचे ओठही सुजले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी आपत्कालीन विभागात त्याची तपासणी केल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्याची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत.

प्रकृती स्थिर, पण 2 मॅच खेळणार नाही मयंक

32 वर्षीय मयंकने भारतासाठी 21 कसोटी सामने खेळले आहेत. सोमवारी त्रिपुराविरुद्ध 29 धावांनी विजय मिळवणाऱ्या कर्नाटक संघाचे तो नेतृत्व करत होता. या प्रकरणाबाबत कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) च्या अधिकाऱ्याने अधिक माहिती दिली. ‘ आता मयंकला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. तो सध्या आगरतळा येथील रुग्णालयात निरीक्षणाखाली आहे आणि डॉक्टरांकडून अपडेट मिळाल्यानंतर आम्ही त्याला बंगळुरूला परत नेऊ. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. मात्र आता तो कर्नाटकच्या संघाकडून पुढचे दोन सामने तरी खेळू शकणार नाही.

विमानात अनेकदा झाली उलटी

मयंकने त्रिपुराविरुद्धच्या दोन्ही डावात 51 आणि 17 धावा केल्या होत्या. संघाच्या पुढील सामन्यासाठी तो दिल्लीमार्गे सुरतला रवाना झाला होता. त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले की, ‘संघ फ्लाइटमध्ये होता आणि मयंकला अस्वस्थ वाटू लागले आणि फ्लाइटमध्ये अनेक वेळा उलट्या झाल्या. त्यानंतर त्याला फ्लाइटमधून उतरवण्यात आले आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.