Champions trophy 2025 : चँपियन्स ट्रॉफीचं भविष्य काय ? अखेर आज लागणार निकाल, जय शाह…

चँपियन्स ट्रॉफी 2025 वरून भारत-पाकिस्तानमध्ये सुरू असलेला वाद हळूहळू मिटताना दिसतोय. आज होणाऱ्या आयसीसीच्या मीटिंगमध्ये या स्पर्धेबाबत अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे. आज काय निकाल लागतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Champions trophy 2025 : चँपियन्स ट्रॉफीचं भविष्य काय ? अखेर आज लागणार निकाल, जय शाह...
champions trophyImage Credit source: ट्विटर
Follow us
| Updated on: Dec 07, 2024 | 8:51 AM

चँपियन्स ट्रॉफी 2025 ही आयसीसीची पुढील स्पर्धा असून पाकिस्तान त्याचे आयोजन करणार आहे. 2025 च्या सुरुवातीला खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. पण या स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाण्यास भारतीय संघाने नकार दर्शवल्याने याबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. मात्र हळूहळू या मुद्यावर सुरू असलेला वाद मिटताना दिसतोय. इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिल (ICC) कडून चँपियन्स ट्रॉफी 2025 च्या मुद्यावरून सतत मीटिंग्स आयोजित केल्या जात असून रिपोर्ट्सनुसार, आजा या टूनार्मेंटबद्दल अखेरचा निर्णय येऊ शकतो.

चँपियन्स ट्रॉफी 2025 वर आज येणार निकाल

15 सदस्यांसह 5 डिसेंबर रोजीआयसीसीची बैठक झाली, परंतु त्यावेळीही चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत कोणताही निर्णय होऊ शकला नाही. यानंतर ही बैठक 5 डिसेंबरवरून 7 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली, म्हणजेच आजच याबाबत बैठक होणार असून चॅम्पियन्स ट्रॉफीचे भविष्य स्पष्ट होईल.आयसीसीने चँपियन्स ट्रॉफी 2025 वर शेवटचा निर्णय घेतला असून आज त्यासंबंधी अंतिम निकाल जाहीर होईल अशी माहिती समोर येत आहे.

हायब्रिड मॉडेलवर खेळवण्यात येणार चँपियन्स ट्रॉफी ?

पुढील वर्षी होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित करण्याबाबत आयसीसीच्या सदस्यांमध्ये एकमत झाले आहे, ज्यामुळे भारतीय संघ त्यांचे सामने दुबईत खेळणार आहे.रिपोर्ट्सनुसार, आयसीसीचे नवे अध्यक्ष जय शाह आणि पाकिस्तानसह संचालक मंडळ यांच्यात दुबईमध्ये झालेल्या अनौपचारिक बैठकीत हा निर्णय झाला. मात्र, एका अटीवर पाकिस्तानने या हायब्रीड मॉडेलला होकार दिला आहे.

खरंतर, 2027 पर्यंत आयसीसी टूर्नामेंटमध्ये हायब्रीड मॉडेलचा वापर केला जाईल. या कालावधीत, भारत पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये महिला वनडे वर्ल्डकप आणि 2026 मध्ये श्रीलंकेसोबत पुरुषांचा T20 वर्ल्डकप संयुक्तपणे आयोजित करेल. पाकिस्तानने 2031 पर्यंत स्वतःसाठी अशा व्यवस्थेची मागणी केली होती, परंतु आयसीसीने 2027 पर्यंत सर्व स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवण्यासाठी सहमती दर्शवली आहे.

भारताचे सामने कुठे होणार ?

UAE मधील फायनलसह भारतीय संघाच्या सर्व सामन्यांचे वेळापत्रक ICC ने ठरवले आहे. भारतीय संघाचे ग्रुप स्टेजचे सर्व सामने दुबईत खेळवले जातील. त्याचबरोबर एक उपांत्य फेरीचा सामना हा पाकिस्तानविरुद्ध होईल आणि जर टीम इंडिया फायनलमध्ये पोहोचली तर फायनल मॅचही दुबईतच होईल. ड्राफ्ट शेड्युलनुसार, 19 फेब्रुवारी रोजी ही स्पर्धा सुरू होणार असून 9 मार्चला अंतिम सामना अर्थात फायनल होईल. ड्राफ्ट शेड्यूलमध्ये भारताचे सर्व सामने हे लाहोरमध्ये खेळवण्यात येणार होते, मात्र आता त्यात बदल होणं अटळ आहे. याच विवादवरून शेड्यूलची घोषणा सातत्याने लांबणीवर पडत आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.