MI vs CSK: प्रेटोरियसची मेहनत आणि श्रेय ऋतुराज गायकवाडला, कसा घेतला स्टब्सचा झेल पाहा Video
मुंबई इंडियन्सला 157 धावांवर रोखण्यात चेन्नई सुपर किंग्सला यश आलं. या सामन्यात दोन अप्रतिम झेल घेतले गेले. त्यामुळे आक्रमक खेळी करणारे दोन खेळाडू तंबूत परतले.
मुंबई – वानखेडे स्टेडियमची सर्वात छोटं मैदान म्हणून गणना होते. याच मैदानावर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात चौकार आणि षटकारांचा वर्षाव पाहायला मिळेल अशी चर्चा होती. पण मुंबईची फलंदाजी सपशेल फेल ठरली. रोहित शर्मा असो की इतर खेळाडू कोणलाच मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे 20 षटकात 8 गडी गमवून 157 धावा करता आल्या. या सामन्यात दोन झेलची चर्चा झाली. एक म्हणजे रवींद्र जडेजा आणि दुसरा ऋतुराज गायकवाड. ऋतुराज गायकवाडने घेतलेला झेल आयत्या पिठावर रेघोट्या असंच म्हणावं लागेलं.
ट्रिस्टन स्टब्सकडून मुंबईला खूपच अपेक्षा होत्या. पण उंच फटका मारल्यानंतर त्याचा अप्रतिम झेलं सीमारेषेवर घेण्यात आला. ड्वेन प्रेटोरियसनं अप्रतिमरित्या चेंडू अडवला आणि सीमारेषेबाहेर जाण्यापूर्वी आत फेकला. मग काय संधीचं सोनं करत ऋतुराज गायकवाडनं त्याचा झेल घेतला. स्टब्स 10 चेंडूत 5 धावा करून बाद झाला. त्यानंतर टीम डेविडने चांगली फटकेबाजी केली. त्याने 22 चेंडूत 31 धावा केल्या. तुषार देशपांडेने त्याला तंबूचा रस्ता दाखवला. सीमारेषेवर अजिंक्य रहाणेने त्याचा झेल घेतला.
Team work at its best ??
Dwaine Pretorius and Ruturaj Gaikwad combine to dismiss Tristan Stubbs ????
WATCH ? #TATAIPL | #MIvCSK pic.twitter.com/Jz3aqLK8yn
— IndianPremierLeague (@IPL) April 8, 2023
सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर संघावर दडपण वाढलं होतं. त्यानंतर लगेचच कॅमरून ग्रीन बाद झाला. रवींद्र जडेजाने त्याचा अप्रतिम झेलं घेतला. चेंडू इतक्या वेगाने होता की पंचही मैदानावर झोपलं. पण डोळ्याची पापणी लवते न लवते तोच झेल जडेजाच्या हातात होता. अर्शद खानही चांगली कामगिरी करू शकला नाही. मिशेल सॅटनरच्या गोलंदाजीवर अर्शद खान एलबीडब्ल्यू झाला.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, ट्रिस्टन स्टब्स, अर्शद खान, हृतिक शोकीन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, दीपक चहर, मिचेल सँटनर, सिसांडा मगला, तुषार देशपांडे