मुंबईकडून घरच्या मैदानात चेन्नईचा सलग 9 वर्ष पराभव, रोहित ब्रिगेड फायनलमध्ये
CSKvsMI चेन्नई : आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पुन्हा एकदा फायनलमध्ये धडक मारली आहे. मुंबईने चेन्नईच्या घरच्या मैदानात धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) 6 विकेट्सने धुव्वा उडवून, पाचव्यांदा फायनलमध्ये (IPL final) धडक दिली. यापूर्वी मुंबईने 2010, 2013, 2015 आणि 2017 मध्ये फायनलमध्ये धडक दिली होती. त्यापैकी 2010 वगळता तीनही वेळा […]
CSKvsMI चेन्नई : आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या (Rohit Sharma) मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पुन्हा एकदा फायनलमध्ये धडक मारली आहे. मुंबईने चेन्नईच्या घरच्या मैदानात धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) 6 विकेट्सने धुव्वा उडवून, पाचव्यांदा फायनलमध्ये (IPL final) धडक दिली. यापूर्वी मुंबईने 2010, 2013, 2015 आणि 2017 मध्ये फायनलमध्ये धडक दिली होती. त्यापैकी 2010 वगळता तीनही वेळा मुंबईने जेतेपदावर नाव कोरलं होतं.
आता यंदा मुंबईने पुन्हा फायनलमध्ये धडक मारली असून, त्यांचा सामना क्वालिफायर 2च्या विजेत्याशी होईल. त्याआधी चेन्नईचा सामना 10 मे रोजी एलिमनेटर विजेत्याशी होईल. एलिमनेटरमध्ये दिल्ली कॅपिटल विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात लढत होत आहे.
दरम्यान, कालच्या सामन्यात धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र मुंबईच्या भेदक गोलंदाजीसमोर चेन्नईला 20 षटकात केवळ 4 बाद 131 धावाच करता आल्या. चेन्नईचं हे सोपं आव्हान मुंबईने केवळ 18.3 षटकात 4 विकेट्सच्या मोबदल्यात पार केलं. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने सर्वाधिक नाबाद 71 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने 54 चेंडूत 10 चौकार ठोकले. त्याने तिसऱ्या विकेटसाठी ईशान किशनसोबत 80 धावांची भागीदारी केली. त्यामुळे मुंबईला विजयाजवळ पोहोचणे सोपं झालं. किशनने 28 धावा केल्या. तर हार्दिक पंड्या 11 चेंडूत 13 धावा करुन नाबाद राहिला.
चेन्नईचा होमग्राऊंडवर मुंबईकडून सहावा पराभव
दरम्यान, होमग्राऊंडवर मुंबईकडून पराभव होण्याची ही चेन्नईची सहावी वेळ आहे. सलग सहा वेळा मुंबईने चेन्नईचा त्यांच्याच मैदानात पराभव केला. 2010 नंतर चेन्नईला घरच्या मैदानात मुंबईविरुद्ध एकही विजय मिळवता आलेला नाही.